Submitted by एम.कर्णिक on 28 November, 2011 - 13:41
आई, आता बस्स तुझा खिमटेवाला भात
तोंडामधे माझ्या आले आहेत सोळा दात
भाज्यांचंही करतेस गुर्गुट वरण भातामध्धे
ओळखता पण येत नाही काय काय आहे त्यात.
कधी म्हणतेस चिकन तर कधी मासाबाऊ
सगळंच लागतंय सारखं मग सांग कसं खाऊ?
माहिताय न तुला सगळं चावता येतंय मला
वेगळंवगळं दे नं भाजी, चपाती नि भात.
आणि हो, ते बस्स तुझं बाऊलमध्धे देणं
चमच्या चमच्याने माझ्या तोंडात भरवणं
आता जेवू दे नं डायनिंग टेबलखुर्चीवर
आजोबांनी दिलेल्या त्या पाच खणी ताटात.
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा. आमच्या बाळाला पण
अरे वा.
आमच्या बाळाला पण चांगले वीस दात आलेत. तो ही असंच म्हणतो.
खूप आवडली कविता.
छान. खरच असच म्हणत असतील
छान. खरच असच म्हणत असतील बाळं.
अरे वा बंटी बराच मोठा झालेला
अरे वा बंटी बराच मोठा झालेला दिसतोय, बंटीची ताई काय म्हणतेय, तिच्यावर नाही केली का कविता आजोबांनी.
अरे वा! बंटीबाबा मोठे झाले
अरे वा! बंटीबाबा मोठे झाले वाटतं
बनुताई काय म्हणतायेत सध्या?
छान.
छान.
वा मस्तच.. बर्याच दिवसांनी
वा मस्तच.. बर्याच दिवसांनी वाचली तुमची कविता
वा कर्णिकसाहेब - कित्ती
वा कर्णिकसाहेब - कित्ती दिवसांनी कविता वाचली तुमची......
तुम्ही केलेल्या कविता सुंदर असतातच, त्यामुळे वाटच पहात असतो - नवनवीन कवितांची......
नेहमीप्रमाणेच मस्त तुम्ही
नेहमीप्रमाणेच मस्त
तुम्ही केलेल्या कविता सुंदर असतातच, त्यामुळे वाटच पहात असतो - नवनवीन कवितांची..>>>>+१
कित्ती क्युट! आजोबा आणि
कित्ती क्युट! आजोबा आणि नातवाची मज्जाय बॉ!
मस्त कविता !
मस्त कविता !
मस्त .. बंटीबाबाचे खरे आहे.
मस्त .. बंटीबाबाचे खरे आहे.
फोटो दाखवा की एखादा बंटीबाबा अन बनूताईचा? 
वा! आज बर्याच दिवसांनी
वा! आज बर्याच दिवसांनी बंटीबाबा तुमच्या कवितेतून पुन्हा भेटल्यावर छान वाटलं.
खुप छान
खुप छान
कित्ती गोड.
कित्ती गोड.
मस्त
मस्त
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.