उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

Submitted by जिप्सी on 15 November, 2011 - 23:25

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

===============================================
===============================================
बेळगाव जिल्ह्यापासुन साधारण ७०-७५ किमी अंतरावरील सौंदत्ती तालुक्यात श्री यल्लमा (रेणुका) मातेचे मंदिर आहे. कन्नड भाषेत "यल्ला" म्हणजे "सर्व" आणि "अम्मा" म्हणजे "आई" यल्लमा म्हणजे "सर्वांची आई" :-). देवीच्या शक्तीपीठांपैकी एक मानले गेलेले हे मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याला यल्लमाचा डोंगर असे म्हटले जाते. बहुतेक लोकांची कुलदेवत असलेल्या या देवीच्या मंदिरात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला येथे भाविकांची खुप गर्दी असते.

श्री यल्लम्मा देवी मंदिर आणि परीसर
प्रचि ०१
रेणुकासागर जलाशय
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
अरीषण कुंड
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

===============================================
===============================================

सौंदत्तीजवळच "हुळी" या गावात "पंचलिंगेश्वराचे" अतिशय देखणे आणि पुरातन मंदिर आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. याच परीसरात अजुन दहा एक पुरातन मंदिर भग्न अवस्थेत आहे.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
(क्रमश:)

गुलमोहर: 

सुंदर प्रचि... नेहमीप्रमाणे Happy

रच्याकने... २र्‍या प्रचिमध्ये वॉमा. Neon Sign असल्यासारख वाट्ट्य.. मस्तंच Happy

वा !! सुन्दर प्रचि!!! विहीर काय सीमेट्रिक आहे. छान आले आहेत. मला ते कोलाज प्र चि १७ फार आवडले.

वाह्...काय सुंदर प्रचि आहेत!! पंचलिंगेश्वराचं मंदिर आणि तिथला परिसर रमणिय.
भग्नावस्थेतील मंदिरं बघितली की मन विषण्ण होतं!!

प्रचि ९ आवडला........

बाकी या वेळी सुरुवातीपासुन प्रचिंच्या क्वालीटीमध्ये फरक झाल्या सारखा वाटत आहे......कॅमरा सेंटींग गडबडली असावी...

पण....मंदीरांचे सर्व प्रची छान आलेत..
ती मंदीरे अखंड शिळेत आहेत न?

३०नं प्रचि मधला मंदीर दगडावर दगड वरचेवर ठेउन बनवलेले वाटत आहे....किंवा सर्वच तशी असावित.... (काय जिप्स्या न सांगता लिहले पाहीजे होतेस न)

हुळीचे फोटो आवडले Happy
यल्लमा आणि जोगतिणी ह्या समीकरणामुळे ते स्थान मनातून उतरले आहे. फोटोही विशेष नाही आवडले. प्रचि १७ पाहून शहारा आला अंगावर.
( जोगतिणी इतर देवस्थानांमध्ये वाहण्याची पद्धतही असेल पण मी मुख्यत्वे यल्लम्मा देवीच्या संदर्भातच वाचले आहे त्यामुळे असे होणे अपरिहार्य आहे माझ्यासाठी ! )

खरं आहे अगोचं - ते देवदासी, जोगतिणी प्रकार काटा आणतो अंगावर........ देवाच्या नावाखाली माणूसच माणसावर अत्याचार करतो हे अगदी ओंगळवाणे, विषण्ण, उदास करणारे.......
बाकी ते मंदीर (भग्न असूनही)..... फोटो सुंदरच......

छान आहेत रे फोटो.

संपुर्ण कर्नाटकात सॅंडस्टोन्स आहेत? वरची काही मंदिरे त्या दगडातली वाटतात. तु गोकाकचे वेगळे फोटो टाकलेस तर त्यात तिथल्या दगडांचेही फोटो टाक. रस्त्याच्या इतक्या जवळ इतके प्रचंड मोठे दगड 'आता कलंडताहेत की अजुन ५ मिनिटांनी' ह्या अवस्थेत उभे असलेले पाहुन खुप भिती वाटते. Happy

अगो +१
यल्लम्मा चे देऊळ बघताना देवदासी प्रथेच्या नावाखाली कुस्करलेल्या कळ्यांची आठवण होउन अस्वस्थ होते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

रस्त्याच्या इतक्या जवळ इतके प्रचंड मोठे दगड 'आता कलंडताहेत की अजुन ५ मिनिटांनी' ह्या अवस्थेत उभे असलेले पाहुन खुप भिती वाटते.>>>>>अगदी अगदी Happy

Pages