प्रसंगावधान

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अँजेलो मॅथ्यूज आणि जयवर्धने यांच्या संयुक्त विद्यमाने/उद्यमाने वॉर्नर आउट झाला.
केवढे ते प्रसंगावधान! स्वत:च बघा

या आधीचे अशाच स्वरूपाचे काही झेल.

ICL ,

अँड्रू बिशेल ,

हरभजन ,

Doug Bollinger,

सचिन १ ,
सचिन २,

पॉल , कोलिंगवूड,, रिकी पाँटिंग ,
सिंक्लेअर आणि मनिष पांडेचे हे काही लक्षात राहिलेले झेल.

तुमच्या लक्षात असलेले इतर झेल बघायला आवडेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त रे!

कॉलींगवूड बॅट्समनच्या जवळचे कॅचेस जबरी घेतो, अक्षरशः झाडावर उडी मारून फळ ओढल्यासारखे. हा बघा २००५ मधे हेडनचा घेतलेला. असे स्लिप्स मधेही त्याचे बरेच आहेत.
http://www.youtube.com/watch?v=3_69iSfwx0Y

कॉली - पॉईंटचा बेष्ट फिल्डर. तुझा विडीओ इथून दिसेना. पण मी वर दिलेला पॉल शब्दावरचा दुवा तोच आहे बहुतेक.

वरचा पाँटींगचा झेलदेखील झबर्दस्त आहे. तसाच एक गंगूजनी पकडला होता. मिळाला की लिंक देतो इथे.
कधीकाळी वायूराज देखील झेल चांगले टिपायचा. आता 'हव्वा आने दे!' कॅटेगरी.

द्रविडमियांच्या झेलांचे वेगळेच दालन उघडावे लागेल. बहुतेक.

फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डींग करणार्‍यांपैकी कुणाचेच झेल आठवत नाहीत, आकाश चोप्राचा एक सोडल्यास. तोपण विडीओ सापडला की लिंक देईन.

नाही दोन्ही वेगळे आहेत. मी चेक करूनच टाकला.

फॉ.शॉ.ले ला भारत-ऑस्ट्रे. २००१ सिरीज मधे बहुधा शिबसुंदर दासने एक जबरी पकड्ल होता. मिळाला की येथेच अपडेट करतो.

वेगळे दालन तर ज्यु.वॉ साहेबांचेही उघडावे लागेल Happy

जॉन्टीला स्थान नाही का ह्याच्यात... त्यानी सूर मारुन कित्येक अचाट झेल पकडलेत.. हा चौकार गेलाच असे वाटत असतानाच चेंडू जॉन्टीच्या हातात स्थिरावलेला असायचा..

मॅथ्यूज जयवर्धनेनी कॅच खरच महान घेतलाय.. अफाट प्रसंगावधान.. आणि तिथून मॅचच फिरली... मेंडीसनी ६ बळी घेतले..

नंद्या काल हा कॅच बघितला तेंव्हा मला David Hussey ने घेतलेला IPL मधला कॅच आठवला. इथे १:५९ च्या आसपास बघ
http://www.youtube.com/watch?v=t0cHptssKis&feature=relmfu
Best part about that catch is he plucks the ball staying inside the boundary extending right hand beyond the rope, throws the ball up, and then goes over rope, only to to come back inside to complete the catch with left hand, while tumbling. I think this one aces all such catches.

असामी, अरे काय कॅच आहे. व्वा !
हिम्स. अरे जाँटीचे कॅचेस बर्‍याच लोकांना माहिती असतात, म्हणून दिले नाहीत. हे फारसे माहिती नसलेले आहेत [असा माझा समज आहे ]

आकाश चोप्रा याने घेतलेला झेल. लाईव्ह बघताना, त्यात बॉल बॅटला लागल्यापासून कॅच घेईपर्यंतचा वेळ मोजला होता अर्धा सेकंद का असाच काहितरी.

Saurav Ganguly Catch 3rd ODI India Vs Srilanka - हा गंगूने घेतलेला झेल.

सिली पाँईट किंवा फॉरवर्ड शॉर्ट लेगचे कॅच घेतल्यापेक्षा बसतात असे वाटते कधी तरी. म्हणजे मी जेंव्हाही तिथे fielding करतो तेंव्हा reflex ने हात बॉलकडे जातो असे वाटते. पूर्ण वेळ डोळे बॅटच्या ब्लेड्वर ठेवणे जरुरी असते स्लिपसारखेच. पापणी लवते न लवते तेव्हढाच reaction time.