भरल पापलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 October, 2011 - 07:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

क्रमवार पाककृती: 

) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.

३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.

४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.

५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.

६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट

७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)

वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

माहितीचा स्रोत: 
कोळीण बाय.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दुसरी :):)
मस्त च जागु... फोटो तर एकसे बढकर एक.... Happy
पण आज नेमका उपवास आहे माझा. नंतर एकदा प्रयत्न करेन ऩक्कीच Happy

हा प्रकार नारळ वगळून केला आणि ग्रील केला किंवा केळीच्या पानात वाफवला तर,
पथ्यकर होतो......
(म्हणजे उपवासाला चालेल.)

जागु,

आईची आठवण करुन दिलीत तुम्ही !!

माझ्या आईची स्पेशालिटी होती माश्याचे पदार्थ.

आई गेली आणी बरेच पदार्थ / प्रकार सुद्धा गेले विस्म्रुतीत.

thanks a lot !!

ह्या असल्या कातिल रेसिपिज फोटों सह टाकुन ,"किस जनम की दुश्मनी निभा रही हो जागु???????????????????????????????????????????????????"

स्वाती, वर्षू, दक्षिणा, भ्रमर, शोनू, विवेक, सुखदा, दिपा धन्यवाद.
अवनी डोळा नाही खात तो जसा आपण काटा टाकतो तसाच टाकून द्यायचा Happy

चातका बाहुला का बदलला ?

दिनेश केळ्याच्या पानात वाफविला कि तो पात्रानी मच्छी ना? खोबरे न घालता मी पण करून बघनार.
पापलेट अंटे नाकु चाला इष्टम.

जागुतै, पहिल्या/दुसर्‍या नं. वरचा मासा असता तर तशी अवस्था नक्की झाली असती.. Proud
अके, माझ्या निवडक दसर्‍यातला तो तिसर्‍या आहे...
रेसिपीच्याकने: आज लंच मध्ये कमीत कमी एका बांगडा फ्रायचा समावेश करावा लागला.

जागू, मस्त दिसते आहे रेसिपी. Happy
हे वाटण कच्चंच भरतात का माश्यात?

सहज आठवलं म्हणून - पन्नाची भरल्या पापलेटाची रेसिपी इथे आहे. त्यात खोबरं नाही आणि काहीतरी आंबट (चिंचेचा कोळ किंवा लिंबू)ही लावायला सांगितलंय.

स्वाती ताई गावा-शहराप्रमाणे पद्धत बदलत असते तश्या रेसिपीजच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. आमच्याइथे वरील प्रकारे करतात. आणि लिंबू त्यात आधी पापलेटला चोळला आहे. हे वाटण कच्चच भरतात. धन्यवाद.

अश्विनी, चातक Happy

अश्विनीमामी, कंसराज धन्यवाद.

तोंपासू...कातिल फोटो आहे... पण आतील भागातील ओले नारळ शिजते का की खाताना कच्चे लागते?
ह्या माशाला तांदळाची पिठी च्या ऐवजी रवा लावायचे काही खास कारणय का? रवा पडत नाही का?
आई गं किती सवाल...??? सॉरी जागू, पण उत्तर दे Happy

Pages