भरल पापलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 October, 2011 - 07:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

क्रमवार पाककृती: 

) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.

३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.

४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.

५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.

६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट

७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)

वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

माहितीचा स्रोत: 
कोळीण बाय.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तूमच्याकडे शेपू आवडतो का माहित नाही, पण भूमध्य समुद्राच्या परिसरात सहसा मासा ग्रील वगैरे करताना दिल (शेपू) किंवा बडीशेपेची पाने वापरतात. पोटातही भरतात. नाजूक मासे फॉईलमधे गुंडाळून भाजतात. सोबत लिंबू असतो.

आफ्रिकेत नुसताच भाजतात. वरुन फक्त मीठ आणि केचप घेतात आणि सोबत बटाट्याच्या चिप्स. (केनयात बटाट्याचे अमाप पिक येते, त्यामूळे या चिप्स सगळीकडेच. इथे बटाट्यांना आवर्जून आयरीश पोटॅटो म्हणतात. ) इथल्या काही माश्यांना (उदा. नाईल पर्च) इतके तेल सुटते कि तळायला पण तेल वापरायची गरज नसते.

अश्विनी, खरेच तसा मासा खाल्ला तर तो हेल्दी असतो.

dineshada shepu aamhala aavadato. karun baghate prayatna.

bhramar bahutek ti vatanat takayachi rahili.

priti bangadyabarobar nahi changale laganar. karan bangadyala vishesh chav asate tashi papaletala nasate.

पन्नाने पण लिहिली आहे ना भरलं पापलेटची रेसिपी ? तिने केलेला मासा लैच तोंपासु होता. हे मासे इथे कुठल्या नावाने मिळतात ? फार वास येतो का ?

सिंडरेला , हे मासे चायनीज स्टोअरमध्ये मिळतात. त्यांना पॉम पॉम असं काहीतरी नाव आहे. नीट शोधून सांगते.

.

आम्हाला बर्‍याच वर्षांपूर्वी एका फिलीपिनो दुकानात पॉम्पॅनो नावाने पापलेट मिळाले होते. सध्या इंटर्नॅशनल मार्केट मधे पॉम्फ्रेट म्हणून मिळते.

व्हाइट पॉम्फ्रेट म्हणून आमच्या इथल्या ओरिएन्टल मार्केटमधे पाहिले.
ब्लॅक पॉम्फ्रेट म्हणून जे (असेच पण थोडे मोठे) मासे मिळतात ते म्हणजे 'हलवा' असंही मत्स्याहारी एक्स्पर्ट मैत्रिणीने म्हणजे लालूने सांगितले.

जागू या मायबोली मुळे तुला कुठलीही रेसिपी बनवताना नेहमीच दोन माणस लागतात ना अथवा जास्त वेळ ................

कारण तुला समजल असलेच ..........

माफ कर मस्करी करतोय..............

मया नाही मला दोन माणस नाही लागत वेळ थोडा लागतो. कारण प्रत्येक फोटो माश्यांना कालवून मग हात धुवून काढायचा ह्यात थोडा वेळ जातो. जेवण करताना जर घरातील कोणी कॅमेरा हाताळणार्‍या व्यक्ती असतील तर त्यांना सांगते.

आरएमडी धन्स.

स्वाती ताई हलवा आणि पापलेट मध्ये फरक आहे. हलव्याला खवले असतात. तो पुर्ण काळा असतो. हलवा उष्ण असतो. ऑपरेशन झालेल्या व्यक्तींना तो बाधक असतो. पण हलवा चवदार असतो. पापलेटची पुढची स्टेप असते त्यात पापलेट थोडा काळपण आणि मोठा होतो. त्याला सरंगा म्हणतात.

Pages