रव्याचे लाडू ( जुन्या मायबोलीवरून)

Submitted by बिल्वा on 21 October, 2011 - 11:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप रवा
1/4 कप तूप
1/2 कप carnation milk powder
१ ते सव्वा कप साखर (तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे ठरवा)
1/4 कप ओल्या नारळाचा चव
बेदाणे
बदाम
केशर
वेलची पावडर
दूध

क्रमवार पाककृती: 

मंद आचेवर तुपात रवा छान खमंग भाजून घ्या. रवा भाजत आला की त्यात खोबर, बदामाचे काप घालून परत नीट भाजा.

आता रवा stove वरून काढून घ्या आणि गरम असतानाच त्यात साखर, milk powder , केशर, वेलची पूड आणि बेदाणे नीट मिसळून घ्या. मिश्रण अगदी एकजीव करा. नंतर त्याच्यात लाडू वळण्याची consistency येईल इतकच दूध शिंपडा जास्त नको. हळू हळू दूध घालत mix करत राहिल, तर दूध जास्त होत नाही. मग लाडू वळा.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

२-४ दिवसात संपवणार असाल तर बाहेरपण छान रहातात. fridge मध्ये ठेवलेत तर खाण्याच्याआधी room temperature ला आणा किंवा १० second microwave मध्ये ठेवा.
रवा भाजेपर्यंतच stove च काम.
फ़ार छान लागतात. भरपूर केशर बदाम घातले की दिसतातपण छान.

ही मूळ रेसिपी आर्च ने जुन्या मायबोलीत लिहिली होती. माझ्यासारख्या "पाक"चॅलेंज्ड लोकांसाठी बेस्ट पाकृ आहे Proud

माहितीचा स्रोत: 
जुन्या मायबोलीत आर्च ने २००७ मध्ये ही रेसिपी दिली होती. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/133646.html?1187457761
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्वा राणी, अगं थो--डी आधी का नाही सांगितलीस ही कृती ? .. असो, देव तुझे अन आर्चचे कल्याण करो (मला हे यशस्वीरीत्या जमले तर !) :).

mi pan shanivari ravyache ladu karnar aahe.mag sangnar kase jhale aahet te ok.

मी अगदी असेच करते पण नुसत्या साखर व दुधा ऐवजी
पाकातले लाडू करते ते सुद्धा छान होतात आणि ८-१० दिवस टिकतात सुद्धा.

बहुतेक हो पण आत्ता प्रश्न वाचल्यावर मलाही शन्का आलीये की गडबडीत नीट भाजला नाही की काय.

दूध नक्की किती वापरावे/ लागते?