निर्माल्य

Submitted by मंदार-जोशी on 29 September, 2011 - 09:52

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मोगरा फुलला दिवाळी अंक २०११ आणि माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

वाहिलेल्या दुर्वांचं निर्माल्य ..... ही कल्पना ठीक आहे.
पण,
ते गुलाबी ठिपके आणि भेसूर सावल्या
यात साधर्म्य दाखवायचा प्रयत्न तितकासा रुचला/पटला नाही.

छान Happy

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण
करुन देणारं!

>>>>>>>>>>>>>>>>>

ही एकच कल्पना नवी वाटली....... Happy

Sad