फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

Submitted by लाजो on 13 October, 2011 - 09:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी,
१ कप पाणी,
१ टेबलस्पून फिश सॉस किंवा लाईट सोयासॉस (मी सोयासॉस वापरला आहे),
बारीक किसलेले गाजर,
कांद्याची पात चिरून
मिठ चवीला

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

'ग्येरन झिम - Gyeran Jjim'

Jjim4.JPG

कोरिआ मधे घराघरात नेहमी केला जाणारा हा पदार्थ म्हणजे एकप्रकारचे एग कस्टर्डच आहे. परंतु हे कस्टर्ड वाफवुन बनवलेले असते. अतिशय हलके आणि लुसलुशीत असे हे 'ग्येरन झिम' तसे बनवायला ही सोपे आहे Happy

यात अजिबात तेल, क्रिम, बटर इ इ वापरलेले नसते त्यामुळे तब्येतीला ही उत्तम Happy

क्रमवार पाककृती

१. पातेल्यात/मोदक पात्रात/स्टिमर मधे पाणी उकळायला ठेवा. त्यावर चाळणी ठेवा.

२. एका बोलमधे अंडी फोडुन हलक्या हाताने मिक्स करुन घ्या. फेटायचे नाहिये तर फक्त पिवळे आणि पांढरे नीट एकत्र मिक्स करायचे आहे.

३. आता हे मिश्रण गाळणीतुन गाळुन घ्या आणि त्यात पाणी, फिश/सोया सॉस, मिठ घालुन परत एकदा हलके मिक्स करा.

४. हिट प्रुफ काचेच्या बोल्समधे किंवा घट्ट झाकणाच्या स्टिलच्या डब्यांमधे हे मिश्रण ओता. साधारण पाऊण बोल भरेल इतपत.

Jjim1.JPG

५. बोल्स ना वरतुन सिल्वर फॉइल लावुन बंद करा आणि चाळणीवर ठेवा. वरतुन झाकण लावुन साधारण १५-२० मिनीटे वाफवुन घ्या.

६. १५-२० मिनीटांनी झाकण काढुन चेक करा. मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले असेल. आता यात किसलेले गाजर आणि कांद्याची पात घाला व परत फॉइल लाऊन अजुन साधारण १०-१२ मिनीटे वाफवायला ठेवा.

७. १०-१२ मिनीटांनी परत चेक करा. टूथपिक किंवा स्क्युअर घालुन बघा. जर टूथपिक किंवा स्क्युअर काहिही न चिकटता क्लिन बाहेर आले तर ग्येरन झिम तयार आहे. अन्यथा अजुन २-५ मिनीटे वाफवायला ठेवा.

Jjim2.JPG

८. तयार ग्येरन झिम गरमा गरम भाताबरोबर, राईस नुडल्स बरोबर खायला घ्या. त्यावर हवा तर थोडा सोयासॉस आणि चिली सॉस घाला.

Jjim5.JPG

*****************************************

आणि आता हे माझे प्रयोग Happy

Jjim6.JPGJjim8.JPG

* यात मिश्रण वाफवताना फक्त मिठ आणि मिरेपूड घातली. नंतर मधे चेक केल्यावर त्यात चिरलेला पालक आणि रेड कॅप्सिकमचे तुकडे घातले. सर्व्ह करताना थोडे गार्लिक बटर आणि पास्ता सॉस घातला - कोरिटालिअन ग्येरन झिम तयार Happy

****************************

Jjim3.JPGJjim9.JPG

^ यात मिश्रणात आमंड इसेन्स आणि पिठीसाखर घातली. शिजल्यावर वरतुन व्हिएन्ना आमंड्स चे तुकडे आणि चॉक सॉस घातला - मस्त डेझर्ट तयार Happy

******************************

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात साधारण २ व्यक्ती.
अधिक टिपा: 

- ग्येरन झिम अगदी हलके आणि खायलाही सोपे आहे त्यामुळे लहान मुलाम्ना, मोठ्या माणसांना, आजारातुन उठलेल्या व्यक्तींना देण्यासाठी उत्तम. त्याचप्रमाणे डाएट करणार्‍यांसाठीही लो फॅट हाय प्रोटिन ऑप्शन Happy
- अंडी मिक्स केल्यावर गाळुन घेणे जरुरी आहे कारण त्यामुळे मिस्रणात काही गुठळ्या, कपच्या असतिल तर त्या काढुन टाकता येतात आणि झिम एकसारखे मऊसुत होते.
- यात आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या, हर्ब्ज, फिश किंवा मीट चे तुकडे यात घालता येतात.
- बोल्स वाफवायला ठेवताना त्यावर फॉइल नीट घट्ट बसवा. अन्यथा आत वाफेचे पाणी जाऊन कस्टर्ड पाणचट होईल.
- यात फ्लेवर्स बदलताना शक्यतो गदद रंगाचे द्रव्य घालु नये. कस्टर्डचा ओरिजनल पिवळसर रंगच चांगला दिसतो.
- या क्स्टर्डला अंड्याचा वास अजिबात येत नाही Happy

माहितीचा स्रोत: 
कोरिअन मैत्रिण आणि फ्लेवर्स बदलायचे माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या क्स्टर्डला अंड्याचा वास अजिबात येत नाही>>> हे माझ्यासाठी महत्वाचं. नाहीतर माझ्याच्याने खाणं व्हायचं नाही. हा ही पदार्थ मस्त.

_/\_. आता उद्या चारांतला एक तरी पदार्थ घरी बनवून पाहणे अनिवार्य आहे. बहुतेक हाच बनवेन असं वाटतंय Happy

जो....ही सर्वात सोप्पी आणि पटकन होणारी पाकृ वाटतीये..नक्की करुन बघेन सुट्टीच्या दिवशी Happy

किती छान. मी काय म्हणते, असे जर ढोकळ्यासारखे लंगडीनामक पात्रात घालून उकडले व मग चौकोन केले तर जमेल काय? प्रत्येकाचे बोल पण मस्त आहेत आवडीप्रमाणे काय हवे ते घ्यावे.

धन्यवाद मंडळी Happy

@अमा, असे जर ढोकळ्यासारखे लंगडीनामक पात्रात घालून उकडले व मग चौकोन केले तर जमेल काय? <<< हे थोडे ढोकळ्यापेक्षा मऊ आणि ओलसर असते.... त्यामुळे कदाचित वड्या नाही पडणार.

मैत्रिणीने दिलेल्या महितीनुसार हे झिम असेच वेगवेगळ्या बोल्स मधे करतात. ज्याला हवे ते मीट, फिश, भाज्या त्यात घालता येतात... प्रत्येकाला आपापल्या आवडीचे झिम मिळते Happy