रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 October, 2011 - 14:48

हा रविवार रानफुलांच्या शोधात घालवू असे ठरवले आणि सकाळी नणंदेला घेउन रानफुलांच्या वाटेने निघाले. आमच्या एरीयात मी पहीलीच असेन अशी रस्त्यात फोटो काढणारी. जर लाजले तर मुळ हेतू दुर राहील आणी मनसोक्त फोटो काढता येणार नाही. म्हणून रस्त्याला कोण येत जात तिथे पाहीलच नाही. नणंदेला स्कूटीवर ड्रायव्हिंग करायच होत म्हणून तिने तिची वेगळी आणि माझी वेगळी अश्या दोन गाड्या घेउन आम्ही दोघी हम दो शेर चले प्रमाणे निघालो. सुरुवातीलाच एका ओसाड जागी जाऊन दोघी थांबलो. ती फक्त जाण्या येण्याची वाट आहे. दुचाकी तिथे जात येत होत्या. मला कॅमेरा अ‍ॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा. अस वाटत होत मी फोटोग्राफीचा कोर्स करायला हवा होता. इतकी सुंदर फुले आणि मला चांगले फोटो काढता येत नाहीत ह्याच दु:ख मनात ठेवुन शेवटी मी सगळे फोटो ऑटो मोडवर काढले. उनही मध्ये मध्ये येत होत.

त्या ओसाड वाटेवर एक दुचाकी परत फिरुन आली आणि आम्हाला विचारल मॅडम काही प्रॉब्लेम आहे का ? त्यांना वाटल आमची गाडी वगैरे बिघडली असेल म्हणून आम्ही तिथे थांबलोय. मग फोटो काढतोय म्हटल्यावर मनातल्या मनात आमच्या नावाने त्यांनी शंख फोडले असतील. :हहा: येणारे जाणारे सगळेच आमच्याकडे काय वेड्या कसले फोटो काढताहेत ह्या हावभावाने पाहत होते अगदी मान वळवून. पण मी कोणाकडे पहायचच नाही हे पथ्य पाळून फोटो काढत होते. मला नणंदेचीही काही फुल शोधून देण्यात मदत झाली. जवळ जवळ २ तास आम्ही फुलांचे फोटो काढत होतो.

ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. सध्या कामगार ही झुडपे कचरा म्हणून उपटून टाकत आहेत. मला खुप राग येतो त्यांचा पण त्यांच ते कामच आहे. इच्छा एवढीच आहे की त्यांनी ही झाडे सुकल्यावर ती काढावीत.

फोटो काढताना जाणवले की आपण जी मुबलक प्रमाणात फुलतात तिच फुले पाहण्यात येतात. पण सुक्श्म नजर ठेउन पाहील तर पुष्कळ रानफुले आपल्या आसपास असतात. मला जशी टिपता आली तशी खाली देत आहे. ह्या काही रानफुलांची नावेही मला माहीत नाहीत जाणकारांनी ती द्यावीत.

१) रानतीळ

१(अ)

१ब)

२) कुर्डू किंवा कोंबडा

२(अ)

३) तालिमखाना/कोळशिंदा

४) निळी पुंगळी

५) कवळा

५ (अ)

६) रानभेंडा

६ (अ)

७) एकदम चुन्नुक फुल होत हे.

७(अ)

८)

८(अ)

९)

१०)

११) हे इतके छोटूकल आणि सुंदर फुल होत की बघतच बसावस वाटत होत.

११(अ)

१२) सोफुबिया

१२ (अ)

१३) चिकणा

१४) डवचाणा

१५) बहुतेक हा रानतुरा

१५(अ)

१६)

१७)

१८)

१८(अ)

१८ (ब)

१९) पांढरा गोकर्ण

२०) निळा गोकर्ण डबलचा

अजुन खुप रानफुले आहेत. आता पुढच्या भागात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुतै काही पण बोलु नकोस.....सर्व प्रचिंना प्रोफेशनल टच आले आहे.... Happy

प्रचि १६ आणि १८ मधली फुलं पहील्यांदाच पाहीले...

फुलांचे वैविध्य आवडले... खुप छान जागा असावी जिथे तुम्ही गेला होतात ती...

मला खालील विधान कळले नाही...
<<< मला कॅमेरा अ‍ॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा. अस वाटत होत मी फोटोग्राफीचा कोर्स करायला हवा होता. इतकी सुंदर फुले आणि मला चांगले फोटो काढता येत नाहीत ह्याच दु:ख मनात ठेवुन शेवटी मी सगळे फोटो ऑटो मोडवर काढले.>>

अहो फोटोग्राफीचा कोर्स करायाची गरज नाहीये... यू टयूब वर भरपूर टिप्स मिळतील तुम्हाला फुलांच्या छायाचित्रांसाठी...

माझ्या परीने काही तांत्रिक बाबी सुचवतोय पहा अंमलात आणत्या आल्या तर..

माझ्या मते तुम्हाला फ्रेमिंगवर बरेच लक्ष केले पाहिजे... १-, १-अ, १-ब ची फ्रेमिंग छान आलिये... २-अ, ६-अ, ७-अ ही छायाचित्रे काही सांगत नाहियेत... हातांची बोटे वगळता आली असती तर उत्तम झाले असते..

ऑटो मोड वर ठेवल्यामुळे प्रकाश व्यवस्थित आला आहे.. पण फोकस बर्‍याच ठिकाणी चुकीचा आलाय..
६,१५,१९, २० - फोकस जमलाय... पण २,५,३,७,८ - फोकस नाहिये..
फोकस योग्य येण्यासाठी कॅमेर्‍यामधे केंद्रभागी छोटा चौकोन असतो तो अपेक्षित विषयावर (तुमच्या बाबतीत फुले) केंद्रीत करून छायाचित्रे काढायची कळ सेकंदाभरा साठी अर्धी दाबून धरा.. बहुतेक कॅमेर्‍यांमधे 'फोकस इंडिकेटर' असतो.. तो फोकस झालेला दाखवतो... फोकस झाला की कळ पूर्ण दाबा म्हणजे बरोबर छायाचित्र येईल.

छोट्या फुलांसाठी (९, १०,११,११-अ,१३,१४) जास्त जवळ जाऊन फोटो काढणे गरजेचे होते.. म्हणजे व्यवस्थित बारकावे पहायला मिळाले असते...

पुढील छायाचित्र सफरीसाठी शुभेच्छा...

ते १८व्या फोटोतलं फुल झेंडूचा एक प्रकार आहे का? एकदा आम्ही हे रोप लावलं होतं पण काही दिवसात ते आपोआप सुकुन गेलं .

यात पिवळा रंगही येतो.

विनार्च, स्वाती, अमी, अश्विनी, रोचिन धन्यवाद.

अमित मोरे धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल. लागल्याच तर विपुतून काही टिप्स मागते.

जागू, सुंदर प्रकाशचित्रं. शेवटच्या प्रकाशचित्रातला निळा गोकर्ण भारीच. रानतुरा पण मस्त.

तू 'रानभेंडा' असं लिहिलंयस त्याच्या खोडांना पाण्यात कुजवून काथ्या तयार करतात ना?

बेष्ट!!

छानच!:)

जागु,
लै भारी,वेगळी फुलं आणि फोटो !
Happy
गावाकडे शेतात कुर्डुची फुले ही खुप दिसतात, हे तण खुप पसरलेल दिसतं,गावाकडे आजी पांडवपंचमी ला सगळे योद्धे (शेणाचे) मांडताना या फुलांचा सुंदर उपयोग करायची

माधव धन्स. मला ते सोन कुसुम नाव आठवत नव्हत. काहीतरी सोन वरून आहे एवढच आठवत होत.

गजानन कल्पना नाही पण असेल कारण ते सुकल्यावर चिवटच असते तसे.

अरुंधती, हर्षदा धन्यवाद.

अनिल आमच्याकडे दसर्‍याच्या तोरणांमध्ये हल्ली घालतात ही फुल. त्या योध्यांना हया वर्षी घालेन आता. आम्ही नेहमी झेंडूची लावतो.

Pages