रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 October, 2011 - 14:48

हा रविवार रानफुलांच्या शोधात घालवू असे ठरवले आणि सकाळी नणंदेला घेउन रानफुलांच्या वाटेने निघाले. आमच्या एरीयात मी पहीलीच असेन अशी रस्त्यात फोटो काढणारी. जर लाजले तर मुळ हेतू दुर राहील आणी मनसोक्त फोटो काढता येणार नाही. म्हणून रस्त्याला कोण येत जात तिथे पाहीलच नाही. नणंदेला स्कूटीवर ड्रायव्हिंग करायच होत म्हणून तिने तिची वेगळी आणि माझी वेगळी अश्या दोन गाड्या घेउन आम्ही दोघी हम दो शेर चले प्रमाणे निघालो. सुरुवातीलाच एका ओसाड जागी जाऊन दोघी थांबलो. ती फक्त जाण्या येण्याची वाट आहे. दुचाकी तिथे जात येत होत्या. मला कॅमेरा अ‍ॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा. अस वाटत होत मी फोटोग्राफीचा कोर्स करायला हवा होता. इतकी सुंदर फुले आणि मला चांगले फोटो काढता येत नाहीत ह्याच दु:ख मनात ठेवुन शेवटी मी सगळे फोटो ऑटो मोडवर काढले. उनही मध्ये मध्ये येत होत.

त्या ओसाड वाटेवर एक दुचाकी परत फिरुन आली आणि आम्हाला विचारल मॅडम काही प्रॉब्लेम आहे का ? त्यांना वाटल आमची गाडी वगैरे बिघडली असेल म्हणून आम्ही तिथे थांबलोय. मग फोटो काढतोय म्हटल्यावर मनातल्या मनात आमच्या नावाने त्यांनी शंख फोडले असतील. :हहा: येणारे जाणारे सगळेच आमच्याकडे काय वेड्या कसले फोटो काढताहेत ह्या हावभावाने पाहत होते अगदी मान वळवून. पण मी कोणाकडे पहायचच नाही हे पथ्य पाळून फोटो काढत होते. मला नणंदेचीही काही फुल शोधून देण्यात मदत झाली. जवळ जवळ २ तास आम्ही फुलांचे फोटो काढत होतो.

ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. सध्या कामगार ही झुडपे कचरा म्हणून उपटून टाकत आहेत. मला खुप राग येतो त्यांचा पण त्यांच ते कामच आहे. इच्छा एवढीच आहे की त्यांनी ही झाडे सुकल्यावर ती काढावीत.

फोटो काढताना जाणवले की आपण जी मुबलक प्रमाणात फुलतात तिच फुले पाहण्यात येतात. पण सुक्श्म नजर ठेउन पाहील तर पुष्कळ रानफुले आपल्या आसपास असतात. मला जशी टिपता आली तशी खाली देत आहे. ह्या काही रानफुलांची नावेही मला माहीत नाहीत जाणकारांनी ती द्यावीत.

१) रानतीळ

१(अ)

१ब)

२) कुर्डू किंवा कोंबडा

२(अ)

३) तालिमखाना/कोळशिंदा

४) निळी पुंगळी

५) कवळा

५ (अ)

६) रानभेंडा

६ (अ)

७) एकदम चुन्नुक फुल होत हे.

७(अ)

८)

८(अ)

९)

१०)

११) हे इतके छोटूकल आणि सुंदर फुल होत की बघतच बसावस वाटत होत.

११(अ)

१२) सोफुबिया

१२ (अ)

१३) चिकणा

१४) डवचाणा

१५) बहुतेक हा रानतुरा

१५(अ)

१६)

१७)

१८)

१८(अ)

१८ (ब)

१९) पांढरा गोकर्ण

२०) निळा गोकर्ण डबलचा

अजुन खुप रानफुले आहेत. आता पुढच्या भागात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आ हा हा ...... अश्या सुंदर सुंदर फुलांनी दिवसाची सुरवात.........
वा वा वा काय नजारा आहे निसर्गाचा...
सर्व फोटो - एक सो एक.....अवर्णनीय....
पुढील फोटोंच्या प्रतिक्षेत...

छान.

मस्त गं एकदम. तुझा चिकणा मी पाहिलाय बरेचदा. पण तो चिकणा हे माहित नव्हते Happy

रच्याकने, ह्याच्यातली काही फुले खरेतर अगदीच लहान आहेत, एक सेमी/अर्धा सेमी, मुद्दाम पाहिल्याशिवाय दिसणारही नाहीत. जागुच्या कॅमे-यातुन मोठी होऊन आल्यामुळे त्यांचे सौंदर्य आज नजरेस पडले.

जागूले, मस्त फुलं आहे गं.

ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. >>> खूप पटलं.

लाजो, असामी, चिंचा, शांकली, शशांक, जिप्सी, वर्षा, पर्णिका, प्रकाश, दक्षिणा, दिनेशदा, साधना धन्यवाद.

केपी बॉर्डर कशी करायची पिकासामध्ये? पुढच्या भागात करुन टाकते.

मस्तच Happy

जागू,फारच सुंदर फोटो आणी रानफुलेही.म्हणतात ना की सौंदर्य बघायलाही दृष्टी लागते आणी जागू ती तुझ्याकडे भरपूर आहे.खरेच कौतूक आहे.

रानफुलांना तोड नसते खरोखर.
पावसाळ्यानंतरचा हा सुमार बेष्टेष्ट.

मस्तच जागू.
Balsam family rocks !! कोणीतरी तेरड्यांच्या विविधप्रकारांबद्दल लिहा पाहु.

जागू, फोटो १०, १५, १६ सुंदर, तसे सगळेच मस्तेत.

अजुन १ - निळा गोकर्ण डबलचा च्या बिया ठेव मी शोधात आहे. भेटुयात कधितरी. बाकी मेल करते.

फुल खरच खुप सुंदर, ह्या फुलांबरोबर अजुन दोन फुलांचा फोटो टाकयचा होतस (तुझा आणि तु़झ्या नंणदेचा).........

Nice photography, keep it up

Pages