स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

smilies द्यायला जमल्या,पण वाक्यात देताना मात्र जमत नाहीयेत. त्या copy-paste करायला गेले की वाक्य delete होतंय. प्लीज कोणीतरी मार्गदर्शन कराना.

नमस्कार मंडळी, मी एक नविन सदस्य आहे. प्लीज मला स्मायली कशा द्यायच्या ते शिकवाल का? मी :स्मितः असे खूपदा लिहून पाहिले पण स्मायली का येत नाही?

वनराई,
तुम्ही लिहिताय ते बरोबर आहे, पण दुसरा विसर्ग बघा ठळक नाहीये. तेव्हा एक काम करा. लिहून झाले की बॅकस्पेस की दाबा आणि परत विसर्गाचे चिन्ह टाईप करा. मग ठळक उमटेल. आणि तेव्हा स्मिताचे हास्यचित्र प्रतिसादात दिसू लागेल. बर्‍याच स्माईलीज च्या बाबतीत हा घोळ आहे खरा.

निंबुडा, धन्यवाद! Happy जमलं बरं का!
अहो मी प्रतिसाद सेव करण्यापूर्वी प्रतिसाद ह्या चौकटीत टाईप करताना स्मायली का दिसत नाही म्हणून गोंधळले होते. प्रतिसाद सेव केल्यानंतर स्मायली दिसत आहे. धन्यवाद! Happy

Pages