तेजस्वी - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 27 September, 2011 - 00:33

विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या स्त्रियांची थोडक्यात माहिती इथे संकलित करूयात.

ही माहिती आपल्या मुलामुलींना आवर्जून वाचायला द्या / वाचून दाखवा. समाजात फार काही आदर्श राहिलेले नाहीत. या आणि अशा काही ठिणग्याच आपल्या मुलामुलींकरता मार्गदर्शक ठरतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'स्वोर्ड ऑफ ऑनर' कल्पना सावंत : नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अ‍ॅकॅडमीच्या १०५ वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कॅडेटसाठी दिला जाणारा 'स्वोर्ड ऑफ ऑनर' सन्मान यंदा प्रथमच एका मुलीला मिळाला आहे. ती आहे २३ वर्षांची कल्पना सावंत.

सावंतवाडी तालुक्यातल्या डिंगणे गावातली कल्पना १८ वर्षांची असताना कॉन्स्टेबल झाली. नागपूरच्या या ट्रेनिंगमध्येही तिला ऑल राउंडर कॅडेटचं बक्षिस मिळालं होतं. तिला पीएसआय व्हायचं होतं पण पुरेसा अनुभव आणि पदवी हातात नव्हती. मग तिने बहि:स्थ अभ्यासक्रमाद्वारे राज्यशास्त्राची पदवी मिळवली - डिस्टिंक्शन मिळवून. सुदैवाने त्याच वर्षी पोलिसदलातील पदं भरली जाणार होती. मग नोकरी सांभाळून तिने जिदीने परीक्षा दिली आणि राज्यात मुलींमध्ये पहिली आली. गेल्यावर्षी तिच्या बॅचचं ट्रेनिंग सुरू झालं. या प्रशिक्षणादरम्यान तिने एकदाही सुट्टी घेतली नाही की तिच्यावर एकदाही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही. आऊटडोअर आणि इनडोअर अशा दोन्ही ठिकाणी तिची कामगिरी उत्तम ठरली आहे. डायरेक्टर्स असाइनमेंटचे १०० पैकी ९० गुण तिला मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट कॅडेटबरोबरच इतरही चार बक्षिसांची ती मानकरी ठरली आहे.

अजूनही तिला आयपीएस व्हायचय. उद्यापासून म्हणजे २८ सप्टेंबर २०११ पासून ती मुंबई पोलिस दलात दाखल होत आहे. कल्पनाची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर उत्तुंग होवो अशा शुभेच्छा!

उत्तम धागा मामी. Happy
कालच वाचली ही बातमी. खूप अभिमान वाटला तिचा. कल्पनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

नोबेल पारितोषिक विजेत्या पर्यावरणवादी वंगारी मथाई : केनयातील जंगल वाचवण्यासाठी निकराचा लढा दिलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या वंगारी मथाई (७१) यांचे रविवारी नैरोबी येथे कॅन्सरने निधन झाले.

१९७७ मध्ये वंगारी मथाई यांनी केनयातील पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिम सुरू केली. वृक्षतोडीमुळे वेगाने उजाड होणार्‍या आफ्रिकेत त्यांनी ४ कोटी वृक्ष लावले होते.

मथाई यांनी १९७० मध्ये केनियाच्या रेड क्रॉस संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. २००२ मध्ये त्या केनयाच्या संसदेवर सदस्य म्हणून निवडल्या गेल्या आणि नंतर पर्यावरण मंत्रीही झाल्या. १९८० नंतरच्या दशकात केनयाचा हुकुमशहा डॅनएल अराप मोईच्या काळात त्यांना प्रचंड दडपशाही आणि छळाला सामोरे जावे लागले होते.

२००४ मध्ये केनया तसेच आफ्रिकेत त्यांनी कलेल्या पर्यावरण जागृती आणि वनीकरण कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. वंगारी मथाई या नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या आफ्रिकन महिला होत्या.

मामी, आज पाहिला धागा. मस्त आहे हा धागा.
नवरात्राच्या निमित्ताने तर ह्या धाग्याचे महत्त्व फार जाणवले. ही खरी स्त्रीशक्ती. मीही भर घालेन ह्यात.

मामी, आज पाहिला धागा. मस्त आहे हा धागा.
>>> शैलजा, आजच काढलाय हा धागा. आजच्या दैनिकात या दोन बातम्या वाचल्या आणि लेकीला वाचून दाखवायच्या असं ठरवलं. मग लक्षात आलं की अशा प्रकारच्या बातम्या एकत्र करून ठेवायला हव्यात. Happy

नीधप, जागू ..... ओके. सार्वजनिक करते हा धागा.

चांगला धागा...
इंद्रा नूयी.. पेप्सीको कंपनी चेअरपर्सन आणि सीईओ..
चंदा कोचर.. आयसीआयसीआय..एमडी आणि सीईओ

मामी, छानच धागा आहे हा! माझी मराठी मैत्रीण ईथल्या पोलीसात गेली सात वर्षे कार्यरत आहे. अशियातुन स्थलांतरीत होऊन पोलीसात निवडली गेलेली ती पहिलीच व्यक्ती आहे. (तिच्याबद्दल लिहायचे आहे पण त्याआधी पोलिस डिपार्टमेंटची परवानगी काढावी लागेल.)

देविका रानडे ह्या पुण्यातील तरूणीची 'मीरकॅट'च्या अभ्यासासाठी निवड -

सकाळमधील बातमी - वन्य जीवन आता माझे सर्वस्व झाले आहे....

एक सुचवू का? इथे फक्त लिंका न देता त्या त्या स्त्रियांची व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊ शकाल का? अनेकदा लिंका ऑफिसात उघडत नाहीत किंवा ब्लॉक असतात. तरी कृपया इथे माहितीही लिहा.

Pages