तेजस्वी - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 27 September, 2011 - 00:33

विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या स्त्रियांची थोडक्यात माहिती इथे संकलित करूयात.

ही माहिती आपल्या मुलामुलींना आवर्जून वाचायला द्या / वाचून दाखवा. समाजात फार काही आदर्श राहिलेले नाहीत. या आणि अशा काही ठिणग्याच आपल्या मुलामुलींकरता मार्गदर्शक ठरतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा मामी Happy

सर्वांनी शेअर केलेली माहिती ही चांगली आहे.

या धाग्याच्या नावावरुन नक्की अंदाज येत नाहीये की इथे काय माहिती दिली गेलिये.
शिर्षकात काही बदल करता येइल का जेणेकरुन धागा कशाबद्दल आहे ते कळुन येइल? - एक सज्जेशन Happy

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=185421:...

अतिउच्च ऊर्जा भौतिकीय शास्त्राच्या (हाय एनर्जी फिजिक्स) क्षेत्रातील नामांकित प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांच्याविषयी लोकसत्तामध्ये आलेला लेख.

त्यांचे अधिकृत संकेतस्थळ हे आहे. त्यांनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती इथे सापडेल.

हाय एनर्जी फिजिक्स किंवा सोप्या भाषेत पार्टिकल फिजिक्स म्हणजे निसर्गातले विविध पदार्थ आणि त्यांची एकमेकांशी असलेली सांगड शोधून काढणारा विषय! या विषयात त्यांनी मॅन्युअल ड्रेस यांच्यासोबत महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांचे संशोधन थोडक्यात सांगायचे म्हणजे उच्च ऊर्जा बाहेर पडताना पदार्थाच्या मूलकणांचे विभाजन त्यांनी उलगडण्याचा यशस्वी प्रयोग केला. (थोडं अजून खोलात सांगायचे तर सृष्टीतील मूलकणांचा शोध घेण्यासाठी जिनिव्हा येथे भूगर्भात दोन दशकांपूर्वी एक महत्त्वपूर्ण प्रयोग करण्यात आला. यात इलेक्ट्रॉन व पॉझ्रिटॉन अतिप्रचंड वेगात एकमेकांवर आदळवले गेले. ते एकमेकांवर आदळतात, त्यावेळेस उच्च ऊर्जा बाहेर फेकली जाते, त्यात काही मूलकण असतात. त्याच वेळेस त्यातून बाहेर पडणारे फोटॉनही एकमेकांवर आदळतात. अशा वेळेस पहिल्या आदळण्यातून बाहेर फेकले जाणारे कण आणि दुसऱ्या आदळण्यातून फेकले गेलेले कण यांची सरमिसळ होते. त्यामुळे त्यांना चाळणी लावण्याची गरज पडते, असे या संशोधक द्वयीने दाखवून दिले.)

या संशोधनामुळे आता सध्या जिनिव्हामध्ये जो लार्ज हॅड्रन कोलायडरचा प्रयोग सुरू आहे, त्यात आणि यापुढे भविष्यात होणाऱ्या अशा प्रयोगांमध्ये कोलायडर्सच्या रचनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले, एवढे हे संशोधन महत्त्वाचे होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मूळ लेखातील काही महत्वाची माहिती इथे पेस्ट करीत आहे:

पुण्यातील हुजुरपागा शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. रोहिणी गोडबोलेंनी एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुणे विद्यापीठात बीएसस्सीला त्या पहिल्या आल्या. त्यानंतर मुंबई आयआयटीमधून त्यांनी एमएसस्सी पूर्ण केले. अमेरिकेतील स्टोनी ब्रुक विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत पी. एचडी. पूर्ण केली.

सध्या त्या बंगळुरू येथील 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स'च्या 'सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स'मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्था (टीआयएफआर), इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणी व्याख्याता, अधिव्याख्याता, रिसर्च फेलो आदी विविध पदांवर काम केल्यानंतर त्या बंगळुरू येथील इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये दाखल झाल्या. या कार्यकाळात जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्या अभ्यागत व्याख्याता म्हणूनही जात होत्या.

अगदी अलीकडे ‘सर्न’मध्ये लार्ज हॅड्रन कोलायडरच्या कामात गुंतलेल्या असताना त्यांच्यावर एक अतिमहत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ‘सर्न’ मध्ये गेली अनेक वर्षे उच्च उर्जा भौतिकीचे संशोधन सुरु आहे. ते पहाण्यासाठी व समजून घेण्यासाठी तरुण विद्यर्थी - संशोधकांना दर उन्हाळ्यात पाचारण करण्यात येते. त्यांना काही व्याख्याने देणे. आणि संशोधकांच्या भंडावून सोडणाऱ्या चिकित्सक सर्व प्रश्नांना वैज्ञानिक उत्तरे देणे ही जबाबदारी डॉ. गोडबोले यांच्यावर होती.

आजवर त्यांच्या नावे प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधांची संख्या तब्बल २००च्या घरात पोहोचली आहे. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या तिन्ही संस्थाच्या त्या मान्यवर फेलो आहेत. गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात या सर्व संस्थांच्या फेलो होण्याचा मान केवळ १२ स्त्रियांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञासाठीचे शील मेमोरिअल अ‍ॅवॉर्ड, विज्ञान संशोधनात मानाचे समजले जाणारे रुस्तुम चोक्सी अ‍ॅवॉर्ड, भारतातील संशोधनासाठीचा सर्वोच्च मेघनाद सहा सुवर्णपदक सन्मान असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. यातील अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्याच महिलाही ठरल्या आहेत.

त्यांचे भौतिकशास्त्रातील महिलांचा सहभागाविषयी मतः "सर्वसाधारणपणे भौतिकशास्त्रातील महिलांचा सहभाग हा तसा कमीच म्हणजे दहा ते पंधरा टक्क्य़ांच्या आसपास आहे. मात्र प्रयोगात्मक उच्च उर्जा भौतिकीच्या विषयात हे प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे. अनेकदा त्याचा संबंध हा या क्षेत्रातील समन्वयात्मक कामाशी जोडला जातो. समन्वयात्मक कामे महिला उत्तम पद्धतीने करु शकतात, असे जगभर मानले जाते. महिलांच्या संदर्भात मला असे वाटते की परिस्थिती अधिक सुधारण्याची गरज आहे. मात्र या परिस्थितीची जाणीव आज समाजातील सर्व स्तरांना झाली आहे ही खूप चांगली व सकारात्मक गोष्ट आहे."

अकुने म्हटल्याप्रमाणे कृपया केवळ लिंक्स देण्याऐवजी थोडक्यात माहिती लिहा अशी विनंती. काही ठराविक काळानंतर या लिंक्स उघडत नाहीत.

हेलन अ‍ॅशे या बाईंची आजच्या मटाला बातमी / माहिती आली आहे :

अमेरिकेतील अन्नपूर्णा

हेलन अ‍ॅशे दक्षिण कॅरोलिनातील अ‍ॅबेविलामध्ये वाढली. तीस आणि चाळीसच्या दशकातला तो काळ खरंच खूप कठीण होता. त्यांच्या घरात ना पाण्याचा नळ होता ना विजेची व्यवस्था. अशा कठीण परिस्थितीतही त्यांच्या कुटुंबात परोपकारी वृत्ती मात्र कायम टिकून होती. त्यांची आथिर्क हलाखीची स्थिती होती. खाण्यापिण्याची चैन नव्हती तरी भुकलेल्याच्या तोंडी घास भरवण्याची वृत्ती त्यांच्या पालकांमध्ये होती.

हेलन आणि तिची जुळी बहीण एलिन या दोघींनी पालकांकडून घेतलेला वारसा टिकवला. त्यांचे वडिल त्यांना नेहमी सांगत, जेवणाच्या टेबलवरचा पावाचा शेवटचा तुकडा संपवू नका. तो तसाच राहू द्या, काय सांगावं एखादी भुकेली व्यक्ती आपल्याकडे येईल. वडिलांचे ते शब्द त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. त्यामुळेच १९८६पासून ते आजतागायत पावाचा शेवटचा तुकडाच नाही तर संपूर्ण जेवण भुकेल्यांच्या मुखी घालण्याचं काम त्या करत आहेत.

टेनिसीतील नॉक्सविलामधल्या 'लव किचन'च्या त्या संस्थापक आहेत. दहा लाख लोकांना मोफत जेवण पुरवण्याचं काम करणारी त्यांची ही संस्था आहे. हेलन आणि एलिन यांचं भुकलेल्यांना जेवण घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका चर्चने त्यांना मदत केली. एका चर्चच्या तळघरात त्यांना आपलं स्वयंपाकघर सुरू करण्यासाठी जागा देण्यात आली. पहिल्या दिवशी त्यांच्या 'लव किचन'मधून २२जणांपर्यंत मोफत अन्न पुरवलं गेलं. आज ही संख्या आठवड्याला दोन हजारांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे ८० टक्केजणांना त्यांच्या घरापर्यंत हे जेवण नेऊन दिलं जातं. ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही अशा गरीब, गरजू, उपासमारीने गांजलेल्यांना आणि ज्यांना घराबाहेर पडता येत नाही अशा असहाय्य आजारी माणसांना हे जेवण पुरवलं जातं. 'लव किचन' चालवण्यासाठी हेलन यांना त्यांच्या बहिणीची मदत होते. तर हे जेवण घरी पोहोचवण्यासाठी हेलन आणि एलिन यांना असंख्य स्वयंसेवक मदत करतात.

हेलन आणि एलिना यांचं वय आहे ८३. पण 'लव किचन'ला भेट देणाऱ्यांचं त्या नेहमी स्वागत करायला तिथे उपस्थित असतात. आपल्या कामाची गरज आपल्या आजूबाजूच्या लोकांना आहे, या भावनेने त्या अहोरात्र कार्यरत असतात. केवळ जेवणच नाही, तर आवश्यक तेव्हा कपडे आणि आपत्कालीन स्थितीत जेवण पुरवण्याचं काम त्या स्वत:हून करतात.

हेलन आणि एलिन यांच्या या कामात त्यांना स्थानिक लोक मदत करतात. संस्था कोणाला पगार देत नाही. जे कोणी मदत करायला येतात, त्यांनी स्वखुशीने करावी अशी अपेक्षा असते. शिवाय जे मदत करतात त्यांनाही त्यातून मानसन्मानाची अपेक्षा नसते. याचं कारण एकच असतं; ते म्हणजे जो भुकेला आहे, त्याला मदत करणं, हाच एकमेव ध्यास आणि उद्देश आहे.

अमेरिकेसारख्या देशात पैसा आणि अन्नाचा तुटवडा नाही, असं म्हटलं जातं. ते खरं नाही, हेही तितकंच खरं. शिवाय आजारी, अपंगांना त्यांच्या घरात जाऊन जेवण देण्याची जबाबदारी कुटुंबाकडून झटकली जाते. अशा वेळी 'लव किचन'च्या माध्यमातून केलेली सेवा ही प्रशंसनीय ठरली आहे. स्वत: वयोवृद्ध असलेल्या हेलन आणि एलिना या बहिणी म्हणूनच अमेरिकेच्या हिरो ठरल्या आहेत.

निलिमा मिश्रा :

अमेरिकन दूतावासाने अगोदर त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत व्हिसा नाकारून नंतर व्हिसा दिल्याच्या प्रकरणामुळे जरी सध्या त्या चर्चेत आल्या असल्या तरी २०११ च्या मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांचे कर्तृत्व वादातीत आहे.

नीलिमा मिश्रा यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात ग्रामविकासाचे
नवे मॉडेल विकसित केल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मिश्रा यांनी २००
खेड्यांत १८०० बचतगटांची स्थापना करून ५० लाख अमेरिकी डॉलर्सचे कर्ज वितरित केले.
त्यांच्याबद्दलची ही लोकप्रभातील माहिती.

महाराष्ट्राच्या जळगाव तालुक्याच्या एका लहानशा खेडय़ातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सायकॉलॉजी विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा गावचा रस्ता स्वीकारला. घेतलेल्या शिक्षणाची, ते शिक्षण घेताना अंगिकारलेल्या व्रताची गरज शहरापेक्षा गावामध्ये जास्त आहे याची जाणीव त्यांना होती. गावामध्ये असेही लोक राहतात, ज्यांना आपल्या समस्यांचीही जाणीव नसते. जगणं असंच असतं असं स्वीकारून ते जगत राहतात, त्यांचं जगणं निलिमा मिश्रा यांना बदलायचं होतं. गावामध्ये रुजलेली गरीबी संपू शकते, हालाखीच्या परिस्थितीने वाकलेला पाठीचा कणा ताठ राहू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. म्हणूनच त्यांनी गावातल्या महिलांना सबलीकरणाचा मार्ग दाखवण्याचं ठरवलं. त्यांच्या मनावर गांधीजींच्या विचाराचा पगडा आहे. त्यामुळेच जळगावच्या लहानशा गावातल्या महिलांनाही त्यांनी स्वावलंबनाचा धडा देण्याचं ठरवलं.

केवळ कोणा संस्थांच्या मदतीवर, शासनाने आपल्या गावाकडे लक्ष जाण्याच्या आशेवर त्यांना या साध्या गावक ऱ्यांना जगवायचं नव्हतं. म्हणूनच निलिमाजींनी स्व-मदत गटाच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी या स्त्रियांना खाद्योत्पादनं, गोधडय़ा, कुम्डते, खोटे दागिने तयार करणं अशा कामांचं प्रशिक्षण दिलं. त्यांनी जेव्हा या स्व-मदत गटाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासोबत केवळ १४ स्त्रिया होत्या. पण आज हा आकडा हजारोंवर जाऊन पोहोचला आहे. या स्त्रियांना त्यांनी आर्थिक ज्ञान दिलं, मार्केटिंगचं प्रशिक्षण दिलं. एवढंच नाही तर कॉम्प्युटर कसे हाताळायचे हेसुद्धा शिकवलं. एके घराचा काळी उंबरठाही न ओलांडणाऱ्या स्त्रियांच्या हातात खेळणारे पैसे बघून या कार्याबद्दल त्या गावातल्या पुरुषांनाही कौतुक वाटायला लागलं आणि त्यांनाही स्व-मदत गटाची योजना पटू लागली. त्यातून त्यांनी अनेक गावांना स्वयंपूर्ण बनवलं. गावातल्याच लोकांनी केलेल्या कामामधून गरजूंना कर्ज उपलब्ध होऊ लागलं. त्यामुळे सावकाराच्या पाशातून सुटका झाली.

गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये निलिमा मिश्रा यांनी महाराष्ट्रातल्या सुमारे २०० गावांमध्ये स्व-मदत गटाचं कार्य नेलं आहे. अर्थात हे सारं सांगायला सोपं असलं तरी करणं फार कठीण होतं. या कामासाठी गावातल्या लोकांची वर्षांनुवर्षांची मानसिकता बदलण्यापासून निलिमाजींना काम करायचं होतं. यासंदर्भात बोलताना त्या गावकऱ्यांबद्दलच कृतज्ञता व्यक्त करतात की त्यांनी बदलण्याची तयारी दाखवली.

नयना लाल किडवाई

यांचा क्रमांक जगातील ५० सर्वोच्च व्यावसायिक स्त्रियांमध्ये ३४वा आहे. फॉर्च्यून मासिकाच्या यादीनुसार त्या आशियातल्या तिसर्‍या क्रमांकाच्या हुशार व्यावसायिक महिला आहेत.

एका प्रसिद्ध विमा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पित्याच्या घरात नयना लाल किडवाई यांचा जन्म इ.स. १९५७ मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण सिमला येथे तर कॉलेजचे शिक्षण दिल्ली विश्वविद्यालयात झाले. तिथे अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर लंडनच्या हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेसमधून त्या एम बी ए झाल्या. त्याच वर्षी त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. यापूर्वी त्यांच्या घराण्यात कुठल्याही स्त्रीने नोकरी केली नव्हती. त्यामुळे त्यांना सुरुवातीला नातेवाइकांच्या निषेधाला तोंड द्यावे लागले. त्या काळात जिचा आदर्श समोर ठेवावा अशी कोणतीही स्त्री भारतीय कंपनी क्षेत्रात दिसत नव्हती. पण गोलगोल फिरणार्‍या खुर्चीत बसणार्‍या आपल्या वडिलांसारखे एखाद्या व्यापारी कंपनीची प्रमुख व्हावे, ही नयना लाल यांची मनीषा होती. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनंतर नयनाबाई मॉर्गन स्टॅनलेमध्ये काम करू लागल्या, आणि काही काळानंतर ती नोकरी सोडून त्या हाँगकाँग अ‍ॅन्ड शांघाय बँकिंग कॉरपोरेशनमध्ये गेल्या.

हाँगकाँग बँकेत राहून त्यांनी त्या बँकेला इन्व्हेस्टमेन्ट बँक म्हणून उच्च स्थानावर नेले. त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत झाली. इ.स.२००६ साली त्यांचे नाव वॉल स्ट्रीट या जगप्रसिद्ध शेअर मार्केटमध्ये घेतले जाऊ लागले. त्यांच्यामुळेच परकीय बँकांपैकी भारतीय उद्योगधंद्यांत गुंतवणूक कराणारी हाँगकाँग बेंक ही पहिली बँक ठरली. नयना किडवाई यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत २२ परदेशी शहरांमध्ये या बँकेच्या ४३ शाखा उघडल्या आहेत. सध्या त्या हाँगकाँग अ‍ॅन्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या कंट्री हेड ऑफ इंडिया आणि डायरेक्टर आहेत.

श्रीमती नयना लाल किडवाई यांचा वार्षिक तनखा अंदाजे दोन कोटी रुपये आहे. (साभार : विकीपीडिया)

लोकसत्तेतील त्यांच्यावर अतुल मान्यांनी लिहिलेला लेख :

इन्व्हेस्टेंट बँकिंगमधील ‘गुरू‘ म्हणून त्या सर्वांना ख्यातकीर्त. असामान्य बुद्धिमत्ता, शांत व संयमी चेहरा ही खास वैशिष्ट्ये व विशेष म्हणजे कोणत्याही पुरुषाला तसेच स्त्रीलाही लाजवेल अशी तिची कर्तृत्वता. नैना लाल किडवाई हे असामान्य व अचाट बुद्धिमत्ता लाभलेल्या महिलेचे नाव. ‘एचएसबीसी‘ (हाँगकाँग ऑफ शांघाय बँक कार्पे.)ची कार्यकारी संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारपदाची सूत्रे समर्थपणे सांभाळत नैना किडवाई यांनी भल्याभल्यांना अचंबित केले आहे. निश्चित ध्येय, अपार मेहनत घेण्याची तयारी व कामातील वक्तशीरपणा ही त्यांची खास वैशिष्ट्ये मानली जातात. बँकिंग क्षेत्रातील प्रत्येक बारकाव्याचा त्यांनी अगदी मुळाशी जाऊन अभ्यास केला आहे. मुळातच आपण कशामध्ये ‘करिअर‘ करायचे याची मनाशी खुणगाठ त्यांनी बांधली होती. त्यामुळे अमेरिकास्थित प्रसिद्ध ‘हार्वड बिझनेस स्कूल‘मधून पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे अशी पदवी प्राप्त करणारी त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. बँकिंग क्षेत्रात होणार्‍या नवनवीन परिवर्तनाची माहिती करून घेऊन किडवाई यांनी आस्तेकदम आपली वाटचाल सुरू ठेवली. १९९४ साली त्यांनी ‘मॉर्गन इस्टॅनले‘ या विदेशी कंपनीतून कामाला सुरुवात केली. वित्तीय क्षेत्रात उत्कृष्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कंपनीमध्ये किडवाई यांनी स्वतःच्या कामाने ओळख कायम ठेवली. ‘बँकिंग‘मध्ये विशेषतः गुंतवणुकीत लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा यासाठी काय करायचे याचे धडे त्यांनी ‘मॉर्गन स्टँनले‘मध्ये घेतले. यानंतर त्यांनी ‘एएनझेड ग्रिन्डले‘ या अन्य एका विदेशी कंपनीत काम केले. भारतात राहून या विदेशी कंपन्यांची कामे करताना आपणाला अजिबात अडचण आली नसल्याचे नैना किडवाई सांगतात. ‘मॉर्गन स्टॅनलेचा‘ विस्तार त्या काळी फारच अल्प होता. त्यामुळे विस्तारवाढीसाठी किडवाई यांनी स्वजबाबदारीवर काही धाडसी निर्णय घेतले. यामध्ये ‘जेएम फायनान्स‘ या वित्तीय कंपनीशी काही महत्त्वपूर्ण करार केले. परिणामी मॉर्गन स्टॅनलेचा आवाका झपाट्याने वाढला.

बँकिंग क्षेत्रात असूनही विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून किडवाई यांनी विप्रो तसेच इन्फोफिस या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्याशीही काही महत्त्वपूर्ण करार केले. त्यामुळे या दोन्ही बलाढ्य कंपन्यांची महत्त्वपूर्ण खाती आपोआपच मिळाली. गुंतवणुकीचा हा मार्ग अनेकांनी चोखाळला. त्यामुळेच मात्र् हाँगकाँग ऍण्ड शांघाय बँक कॉर्पेरेशन (एचएसबीसी)ने भारतात पाऊल टाकताना अगदी विचारान्ती किडवाई यांच्याकडे सर्व सूत्रे सोपविली. या बँकेने टाकलेला विश्वासही किडवाई यांनी सार्थ ठरविला. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा सांभाळत किडवाई यांनी देशभरात शाखा विस्तारण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याची पोचपावती म्हणून बँकेच्या कार्यकारी संचालकपदाची तसेच एचएसबीसी सिक्युरिटी ऍण्ड कॅपिटल मार्केट लि.च्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. जागतिक पातळीवर याची त्वरित दखल घेतली गेली.

‘फॉर्च्युन‘ या प्रसिद्ध मासिकाने सन २००० साली उद्योग क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या जगातील ५० महिलांची यादी जाहीर करताना किडवाई यांना तिसर्‍या क्रमाकांचे नामांकन दिले. भारताच्या दृष्टीने ही निश्चितच अभिमानाची भूषणावह बाब होती. विशेष म्हणजे सन २००१ ते २००३ या तिन्ही वर्षांत किडवाई यांनी मानांकन कायम ठेवले. ‘टाइम‘ मासिकानेही किडवाई यांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना विशेष मानांकनाचा दर्जा बहाल केला. एखाद्या भारतीय महिलेस असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. हे दोन्ही सन्मान माझे स्वतःचे नसून ते देशालाच मिळाल्याची प्रतिक्रिया देऊन किडवाई देशाभिमान स्पष्ट करतात. बँकेव्यतिरिक्त विविध संस्थांवर तेवढ्याच हिरीरीने काम करण्याची किडवाई यांची तयारी असते. सध्या त्या दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेजच्या शासकीय सदस्य तसेच नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर)च्या सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

कामानिमित्त अनेकवेळा विदेशवारी होत असली तरी मला भारतातच राहणे जास्त आवडेल, अशी प्रांजळपणे कबुली देऊन किडवाई म्हणतात की, विदेशात मी कितीही मोठी कामे केली, तरी भारतात राहून मी देशासाठी काही करू शकते, या कल्पनेने आणखी काम करण्यास दुप्पट उत्साह मिळतो. हा उत्साहच मला माझ्या निश्चित ध्येयाकडे घेऊन जातो, असेही किडवाई सांगतात.

महिला दिनानिमित्त ई-सकाळमध्ये आलेले या कर्तबगार ललनांविषयीचे वृत्त :

नीलम धवन
बावीस वर्षांपासून आयटी क्षेत्रात कार्यरत. जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट इंडिया या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा कार्यभार सांभाळला. शिवाय एचपी, आयबीएम, एचसीएल यांसारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उच्चपदी काम केले.

ललिता गुप्ते
भारतातील द्वितीय क्रमांकाच्या आयसीआयसीआय बॅंकेच्या चेअरपर्सन. मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण. 1971 मध्ये बॅंकेत रुजू. विविध पदांवर काम करून 2001 मध्ये मॅनेजिंग डायरेक्‍टर झाल्या. न्यूयॉर्क स्टॉक एक्‍स्चेंजमधील यादीत आयसीआयसीआयची नोंद होण्यात महत्त्वाचा वाटा.

कल्पना मोरपारिया
मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी. 1975 मध्ये आयसीआयसीआय मध्ये कायदेतज्ज्ञ म्हणून सुरवात. 1996 मध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत. 2001 मध्ये कार्यकारी संचालक. आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा.

विद्या छाब्रिया
दुबई येथील जंबो ग्रुपच्या चेअरपर्सन. पती मनोहर छाब्रिया यांच्या निधनानंतर, 2002 मध्ये कंपनीच्या प्रमुखपदी नेमणूक. आपल्या तीन मुलींसोबत कंपनीचा व्यवहार बघतात. कंपनीची उलाढाल आता जवळपास 1.5 बिलिअन डॉलर्स आहे. फॉर्च्युन मासिकाच्या पन्नास प्रभावी महिलांच्या यादीत 34 वे स्थान.

अनू आगा
थरमॅक्‍स इंजिनिअरिंग कंपनीच्या चेअरपर्सन. पती रोहिंटन आगा यांच्या निधनानंतर कंपनीची अवस्था खालावली होती. कंपनीचा शेअर 400 रुपयांवरून 36 रुपयांपर्यंत खाली आला होता. अनू आगांनी परदेशातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कंपनीची पुनर्रचना केली. त्यामुळे कंपनीची पुन्हा भरभराट झाली. 2004 मध्ये चेअरपर्सनपदावरून निवृत्ती. आता सामाजिक कार्यावर भर.

प्रिया पॉल
अपीजय सुरेंद्र ग्रुपचे संचालक-संस्थापक सुरेंद्र पॉल यांची 1990 मध्ये हत्या झाल्यावर मुलगी प्रिया त्यांचा व्यवसाय सांभाळू लागल्या. अमेरिकेतील विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षीच त्यांच्यावर ही जबाबदारी आली. चहा, हॉटेल, जहाजनिर्मिती, रिअल इस्टेट, रिटेल अशा व्यवसायांच्या इतर अनेक उपकंपन्या स्थापून अपीजय ग्रुपची भरभराट केली. सध्या त्या अपीजय पार्क हॉटेलच्या अध्यक्षा आहेत.

चंदा कोचर
जगातील शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान. आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक. मुंबई विद्यापीठातून बीए पदवी. त्यानंतर आयसीडब्लूएआय केले. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून व्यवस्थापनशास्त्रातील पदवी. त्यांच्या कारकिर्दीत आयसीआयसीआय बॅंकेला "बेस्ट रिटेल बॅंक इन इंडिया' असा किताब प्राप्त. 2010 मध्ये पद्मभूषण.

पुनीत अरोरा
भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल हा सर्वोच्च द्वितीय पदभार सांभाळणारी पहिली महिला. पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करात रुजू. 2004 मध्ये एएफएमसी कॉलेजच्या कमांडंटपदाचा कार्यभार सांभाळणारी पहिली महिला.

अरुंधती रॉय
लेखिका अरुंधती रॉय या "बुकर' हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या कादंबरीसाठी 1997 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध विषयांमध्ये विपुल लिखाण.

अंजली इला मेनन
ख्यातनाम चित्रकार. सॅनफ्रान्सिस्को येथील "एशियन आर्ट म्युझियम'मध्ये त्यांच्या "यात्रा' या चित्रकृतीचा समावेश. तैल त्याचप्रमाणे जलरंगात चित्रकृतींची निर्मिती. काचचित्रे आणि भित्तिचित्रे करण्यात विशेष प्रावीण्य. 2000 मध्ये पद्मश्री प्राप्त.

किरण राव
"धोबीघाट' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे चर्चेत. किरण "लगान' या चित्रपटाची सहदिग्दर्शिका होती व त्या वेळी तिची आमीर खानशी ओळख झाली. दोघे 2005 मध्ये विवाहबद्ध झाले. कोलकत्यात प्राथमिक शिक्षण झालेल्या किरणने मुंबईतील सोफिया कॉलेजमधून इकॉनॉमिक्‍समधील पदवी व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

मिताली राज
भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर. ती सध्या आयसीसीच्या क्रिकेट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हैदराबाद येथे 3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या मितालीने दिवसीय सामन्यातील पदार्पणात नाबाद शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये तिने 214 धावा झळकावत विश्‍वविक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम नंतर पाकिस्तानच्या किरण बलुच हिने मोडला. मितालीने 2005 मधील महिला विश्‍वरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. ती लेगब्रेक गोलंदाजीही करते.

तानिया सचदेव
आंतरराष्ट्रीय ख्यातीची बुद्धिबळपटू. इंटरनॅशनल मास्टर आणि वूमन ग्रॅंडमास्टर हे दोन्ही किताब जिंकणारी युवती. वयाच्या आठव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची कामगिरी. दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्र व मानसशास्त्राचा अभ्यास. चौदा वर्षाखालील आशियाई स्पर्धा, ज्युनियर व सिनियर चॅम्पियन, 2006 व 2007 मधील इंडियन वुमेन चॅम्पियनशिपची विजेती.

विजयालक्ष्मी रवींद्रनाथ
म्हैसूर विद्यापीठात पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर बेंगळूर येथील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्स' संस्थेत संशोधन. भारतातील अनेक नामांकित राष्ट्रीय संशोधन संस्थेत कार्य केले आहे. आता "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' संस्थेच्या त्या संस्थापक संचालक पदावर कार्यरत आहेत.

नाबार्डच्या पूर्वाध्यक्षा व सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन च्या व्हिजिलन्स कमिशनर रंजना कुमार यांची विकीपीडियानुसार ओळख

व हा त्यांचा बायोडेटा.

मध्यंतरी भारतातून येताना एक मासिक घेऊन आले त्यात अशाच सगळ्या तेजस्वी स्त्रियांची माहिती आहे. जमल्यास थोडीफार इथेही टाकेन.

उत्तम धागा. बरीच माहिती वाचायला मिळतेय.
वंगारी मथाई बद्दल काय बोलावं 'वनराई' आहेत त्या. ३ कोटीहून अधिक झाडे !

मामी, वर धाग्याच्या हेडरमध्ये ज्या ज्या कर्तबगार तेजस्वी महिलांची माहिती या धाग्यात आली आहे त्यांची नावे टाकाल का प्लीज? पुढे संदर्भासाठी उपयोग होईल. Happy

रेनाना झाबवाला : सेवा (सेल्फ एम्प्लॉईड वुमेन्स असोसिएशन च्या राष्ट्रीय समन्वयक)
इ. स. १९९० मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान.

दिल्ली येथे आई प्रख्यात लेखिका व बुकर पारितोषिक विजेत्या रुथ झाबवाला व वडील आर्किटेक्ट सायरस झाबवाला यांचे पोटी जन्म. दिल्ली विद्यापीठातून गणिताची पदवी घेतल्यावर हार्वर्ड मधून गणिताची पदवी व येल विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथे सेवा च्या कामात स्वतःला वाहून घेतले.

सेवात त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे स्त्रियांना ट्रेड युनियनमध्ये गुंफणे. शेतमजुरी, विणकर, बीडी वळणे यांसारखी कामे करणार्‍या स्त्रिया, पदपथ व्यावसायिक अशा कितीतरी स्त्रियांना त्यांनी संघटना करण्यास, ट्रेड युनियन खाली येण्यास, योग्य वेतन, कामाच्या ठिकाणी सुविधा, जागा, सुरक्षितता मिळवण्यास प्रवृत्त केले. मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड यांसारख्या ९ राज्यांमध्ये त्यांनी सेवा भारत ची स्थापना केली व तेथील कष्टकरी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत राहिल्या.

सेवाच्या अंतर्भूत असलेल्या महिलांना जेव्हा मूलभूत सुविधा व घराचे प्रश्न सतावू लागले तेव्हा रेनाना यांनी महिलांच्या गृहनिर्माणासाठी खास ट्रस्ट बनवण्यात पुढाकार घेतला व महिला गृहनिर्माण सेवा ट्रस्टचा जन्म झाला. इ.स. २००२ मध्ये त्या सेवा बँकेच्या अध्यक्ष झाल्या व गरीब स्त्रियांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी काम करू लागल्या.

आता त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असून अनेक देशांत होणार्‍या परिषदा, कार्यक्रम येथे त्यांचे कार्य वाखाणण्यात आले आहे.

त्यांची ही विकीवरील माहिती.

हे सेवाचे संकेतस्थळ : http://www.sewa.org/

श्रीमती वासंथा रामस्वामी : पुणे विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या मेकॅनिकल इंजिनियर. यांनी बी.ई. व एम.ई. पुणे विद्यापीठातून केले. काही वर्षांपूर्वी त्या भारत सरकारच्या डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनच्या जॉइन्ट डायरेक्टर पदावरून निवृत्त झाल्या. त्या लीला पूनावाला फाऊंडेशनच्या ट्रस्टीही आहेत.
त्यांची लीला पूनावाला फाऊंडेशन संकेतस्थळावरून घेतलेली माहिती :

She has several 'firsts' to her credit. The successful development of Safety Arming Mechanisms and Fuses for Guided Missiles as well as aircraft bombs for the first time in India is one of her achievements. She also developed the indigenous technology for the design and manufacture of very large size Ball and Roller Bearings called 'slewing rings' and the design and reliability proving of certain mission critical systems for Agni-II Guided Missile Launcher.

She has won the Agni Award for Excellence in Self Reliance1999, the DRDO Best Project Award -1985 and IMM Cinni Best Woman Executive Award1987.

Her current commitments : She is an honorary member of various regional and national level bodies for technology development and awareness such as CII, BIS etc.

(या माझ्या वडिलांच्या क्लासमेट, बॅचमेट व ए. आर. डी. ई. मध्ये एके काळी माझ्या काकांच्या बॉस असल्यामुळे त्यांचं व त्यांच्या कर्तृत्वाचं आमच्या घरी सगळ्यांनाच विशेष कौतुक आहे! :-))

माया भिसे : देशातील एकमेव सर्पमैत्रीण. सर्पमित्र खूप आहेत. पण सर्पमैत्रिणी नाहीत. सरकारने अलीकडेच ४० सर्पमित्रांना सर्टिफाय केलं. त्यात ही एकमेव मुलगी आहे. ठाण्याची आहे. कुठल्याही प्रकारचा साप पकडू शकते. सापांविषयी प्रबोधन करायचं महत्त्वाचं कार्यही ती करते.

आंग सान सू की : म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या. अलीकडेच म्यानमार सरकारने त्यांची जवळपास १४ वर्षांच्या कैदेतून मुक्तता केली. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी.

शिरीन इबादी : इराणच्या लोकशाहीवादी नेत्या. स्त्रियांसाठी अनेक लढे दिले. नोबेल पुरस्काराच्या मानकरी.

अस्मा जहांगीर : पाकिस्तानी लोकशाहीवादी नेत्या. लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय बरखास्त केल्यानंतर त्यांनी वकिलांची मोठी चळवळ उभारली. संपूर्ण जगभरात पाकिस्तानी लष्करशाहीचा प्रश्न पोहोचवला. आज पाकिस्तानात जी नाममात्र का होईना लोकशाही आहे तिच्यामागे एक मोठी प्रेरणा यांची आहे.

बेनझीर भुट्टो : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान. झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या आणि पाकिस्तानचे एक वलयांकित व्यक्तिमत्त्व.

हिना खार रब्बानी: पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री. डिप्लोमसी आणि पाकिस्तानी तहजीब यांचा एक संगम मानल्या जातात. अवघ्या वर्षभरात त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेख हसीना : बांग्लादेशच्या पंतप्रधान. मुस्लिम राज्याची प्रमुख म्हणून विशेष स्थान. भारत- बांग्लादेश संबंधांत महत्त्वाचे योगदान.

इंदिरा गांधी : भारताच्या माजी पंतप्रधान. भारताला चीनविरोधातील युद्धाच्या अपमानास्पद खाईतून बाहेर काढण्याच्या द्रुष्टीने १९७२ चे पाकिस्तान युद्ध जिंकण्यात रणनीती आखण्याचे महत्त्वाचे कार्य. मुत्सद्देगिरीत निष्णात. काँग्रेस पक्षाला कठीण काळातून वर आणले. आणीबाणीचा ठपका असला तरी एक निर्विवाद उच्च नेतृत्व म्हणून गणना.

सायो, छान माहिती आहे, लिंकसोबत त्यांची माहितीही लिही ना! नक्कीच प्रेरणादायी आहे.

Pages