दिवसाकाठी रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर ???

Submitted by Sanjeev.B on 22 September, 2011 - 01:29

मित्रांनो,
कालच पेप्रात वाचलं नियोजन आयुक्तांचे मुक्ताफळ. शहरी भागा मधे दिवसा काठी ‍रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर येतो. विशेष म्हणजे ह्या अहवालावर आपले पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग ह्यांचे स्वाक्षरी आहे.

नियोजन आयोगानुसार श्रीमंतांचा रोजचा खर्च (स्त्रोत : आजचा सामना वृत्तपत्र)
डाळ : ५.५० रुपये
भात, चपाती : १.०२ रुपये
दुध : २.३३ रुपये
तेल : १.५५ रुपये
भाजी : १.९५ रुपये
फळे : ०.४४ रुपये
साखर : ०.७० रुपये
मीठ मसाला : ०.७८ रुपये
अन्य खाद्यपदार्थ : १.५१ रुपये
इंधन : ३.७५ रुपये

एका अहवाला नुसार देशातील ८०% लोकांचे रोजचे उत्पन्न ८० रुपयांपेक्षा ही कमी आहे.

जाणकारांनी ह्यावर भाष्य / चर्चा करावे.

- संजीव बुलबुले / २२.०९.२०११

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितिनचंद्र
गंमत अश्याची वाटते की आज काँप्युटर्स मदतीला असताना ही आकडेवारी करायला वेळ लागतो की विविध प्रशासकीय कार्यालयांच्या तपासणी शेरे लाल फित यातुन ही आकडेवारी सुटुन प्रसिध्द व्हायला वेळ लागतो ? याच खुलासा मान्यवरांनी केला नाही.>>
मग काम पुरवून पुरवून करणे हा सरकारी नोकरांचा गुणधर्म कसा सिद्ध होईल?

वज्र,
९६० रु. दरमहा. << मेस लावून जेवणारे (छोट्या शहरात) महिना १४-१५०० रु. मधे महिनाभर जेवू शकतात. त्यात सगळे धान्य रेशनचे तर नसतेच, वरून मेसवाल्याचा नफा गृहित धरला जातो. ९६० हा फक्त २१००-२४०० कॅलरी दररोज देणार्‍या जेवणाचा खर्च आहे.

दुसरी बाजू विचारात घ्यायचि असेल, तर फारेन्ड यांच्या पोस्ट मधील लिंक वाचा.

काल २५ सप्टेंबरचा एन्डीटीव्ही वरील वुई द पीपल हा कार्यक्रम

अर्थात इथेही ऐकून/समजून घेणार्‍यांची वानवाच होती.
अन्न सुरक्षा योजनेत रेशनकार्डे देण्यासाठी ३२ रुपये हा निकष नाही. यासाठी २०११ च्या आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येईल.
गरिबीची आकडेवारी काढण्यासाठी निवडलेला ३२ रुपये इ. हा एक मानक आहे.

अलीकडेच एक बातमी वाचनात आली. नॅशनल सँपल सर्व्हेसाठी मिळणार्‍या प्रतिसादाची गुणवत्ता सर्वेक्षण केल्या जाणर्‍या व्यक्ती/कुटुंबाच्या आर्थिक/शैक्षणिक परिस्थितीशी व्यस्त प्रमाणात असते. जितकी व्यक्ती शिक्षित/सधन तितकी माहिती द्यायला टाळाटाळ, अनिच्छा.

दोन मुद्दे आहेत.

Below Poverty Line
Below Starvation Line.

मला असे वाटते, जो अहवाल आला आहे ते बहुधा Below Starvation Line च्या अनुषंगाने दिले असावे.

Pages