"कास"ची फुलं "झक्कास"

Submitted by जिप्सी on 21 September, 2011 - 00:10

===============================================
===============================================
शनिवारी "रानवाटा" ग्रुपबरोबर कास पठार आणि परीसरात दोन दिवस भटकंती केली. पहिल्या दिवशी कास पठारावरच होतो, पण दाट धुके आणि रिमझिमणारा पाऊस यामुळे फोटोग्राफिसाठी आवश्यक असा प्रकाश नव्हता. सगळ्यांचीच थोडी निराशा झाली. लॅण्डस्केपचे चांगले फोटो नाही मिळाले. शेवटी मॅक्रोमोड वापरून काही फुलांचे फोटो टिपले. अगदी काही सेकंदासाठी वातावरण निवळत होते आणि तेव्हढ्याच वेळात पटकन आमचे कॅमेरे सरसावत होते, तर काही काही फोटोंसाठी अर्धा तास एका जागेवर कॅमेरा सेट करून बसुन रहावे लागत होते आणि ऊन आले तर पटकन फोटो क्लिक करावे लागत होते (प्रचि १ :-)). कास पठारावरून थोडे खाली आल्यावर मात्र लाईट मस्त होती त्यामुळे स्मिथियाचे फोटो जरा चांगले मिळाले. (प्रचि २४ ते ३०)

अर्थात फोटो जरी मनासारखे नाही मिळाले तरी तिकडच्या फुलांचा अप्रतिम नजारा मात्र मनात भरून घेतला. एकदा तरी अवश्य पहावी असे हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. अर्थात निसर्गाचे योग्य ते भान राखुनच कारण पायाखाली येणारे, नकळत तोडले जाणारे एखादे दुर्मिळ फुल कदाचित शेवटचे असेल.

फुलांची नावे मायबोलीकर "माधव" यांचेकडुन साभार. Happy काहि फुलांची नावे माहित नाही, जाणकार सांगतीलच. Happy
===============================================
===============================================
Imapatients Balsamina (तेरडा)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०४ (अ) Happy
सफेद गेंद
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
Senecio bombeyensis (सोनकी)
प्रचि ०९

Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)
प्रचि १०

प्रचि ११
Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी)
प्रचि १२

प्रचि १३
Neanotis Montholonii (तारागुच्छ)
प्रचि १४
सीतेची आसवं
प्रचि १५
Cyanotis Tuberosa (आभाळी)
प्रचि १६
Rhamphicarpa Longiflora (तुतारी)
प्रचि १७
Murdannia Lanuginosa (अबोलिमा)
प्रचि १८
Hitchenia Caulina (चावर/Indian Arrowroot)
प्रचि १९
Cyanotis Fasciculata (निलवंती)
प्रचि २०
Chlorophytum Glaucoides (मुसळी)
प्रचि २१
Dipcadi Montanum (दीपकाडी)
प्रचि २२

प्रचि २३
Smithia Bigemina (मिकी माऊस/कावळा)
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

===============================================
===============================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

माधव, हा दुसरा "अबोलिमा"चा फोटो ज्याबद्दल बोलत होतो तोच (दोन वर्षापूर्वी काढलेला आहे). याच्या पाकळ्या प्रचि १८ पेक्षा जास्त मोठ्या होत्या आणि रंगही किंचित वेगळा. Happy

स ही च्च!!!!

असाच हिंडत रहा व फोटु काढत रहा >>> लग्न् (झालं नसल्यास) करु नकोस! हिंडायला मिळत नाही त्यानंतर असं! Light 1 Biggrin

अप्रतिम! ४ नंतर फोटोंचं नंबरिंग जरा चुकलंय तेव्हढं नीट कर. आणि जाणकारांनी फुलांची नावं सांगितली तर प्लीज फोटोवर अपडेट कर.

वत्सला Proud

धन्स स्वप्ना Happy ते ४ नंबरचं लक्षात आलं होतं पण प्रतिसादात बर्‍याच जणांनी आवडलेल्या प्रचिंची नंबर दिल्याने ते बदललं नव्हतं Happy आता प्रचि ४ (अ) असा बदल केलाय. Happy

योगेश फुल आणि पानावरून तरी ते अबोलीमाच वाटतय. त्या कुळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे दाखवायचे आणि वापरायचे पराग वेगवेगळे असतात. ते जे काळे पराग आहेत ते किटकाना आकर्षित करण्याकरता आहेत पण खरे परागीभवन होते ते पांढर्‍या परागांनीच.

त्या कुळात दुसरे फुल नाही सापडले मला ह्या रंगाचे. तरी विचारून बघतो तज्ञांना.

धन्स माधव,

अबोलिमासुद्धा किटकभक्षी वनस्पती आहे?
पांढर्‍या रंगाचे पराग प्रचि १८ मध्ये "S" आकारात दिसत आहेत. Happy

नाही अबोलिमा किटकभक्षी नाही.

प्रचि १० : जांभळी मंजिरी (Pogostemon deccanensis)

प्रचि ११ दहाव्याचाच top view आहे का?

प्रचि १० : जांभळी मंजिरी (Pogostemon deccanensis)>>>>नाव अपडेट केलं Happy

प्रचि ११ दहाव्याचाच top view आहे का?>>>>नाही, ते वेगळं फुल आहे.

जिप्सि तुमच्या फोटोग्राफिच कराव तेवढ कौतुक कमी आहे. फोटो अप्रतिम,
असेच भटकत रहा. आवड जोपासा.
keep it up................all the best......................

Pages