"कास"ची फुलं "झक्कास"

Submitted by जिप्सी on 21 September, 2011 - 00:10

===============================================
===============================================
शनिवारी "रानवाटा" ग्रुपबरोबर कास पठार आणि परीसरात दोन दिवस भटकंती केली. पहिल्या दिवशी कास पठारावरच होतो, पण दाट धुके आणि रिमझिमणारा पाऊस यामुळे फोटोग्राफिसाठी आवश्यक असा प्रकाश नव्हता. सगळ्यांचीच थोडी निराशा झाली. लॅण्डस्केपचे चांगले फोटो नाही मिळाले. शेवटी मॅक्रोमोड वापरून काही फुलांचे फोटो टिपले. अगदी काही सेकंदासाठी वातावरण निवळत होते आणि तेव्हढ्याच वेळात पटकन आमचे कॅमेरे सरसावत होते, तर काही काही फोटोंसाठी अर्धा तास एका जागेवर कॅमेरा सेट करून बसुन रहावे लागत होते आणि ऊन आले तर पटकन फोटो क्लिक करावे लागत होते (प्रचि १ :-)). कास पठारावरून थोडे खाली आल्यावर मात्र लाईट मस्त होती त्यामुळे स्मिथियाचे फोटो जरा चांगले मिळाले. (प्रचि २४ ते ३०)

अर्थात फोटो जरी मनासारखे नाही मिळाले तरी तिकडच्या फुलांचा अप्रतिम नजारा मात्र मनात भरून घेतला. एकदा तरी अवश्य पहावी असे हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. अर्थात निसर्गाचे योग्य ते भान राखुनच कारण पायाखाली येणारे, नकळत तोडले जाणारे एखादे दुर्मिळ फुल कदाचित शेवटचे असेल.

फुलांची नावे मायबोलीकर "माधव" यांचेकडुन साभार. Happy काहि फुलांची नावे माहित नाही, जाणकार सांगतीलच. Happy
===============================================
===============================================
Imapatients Balsamina (तेरडा)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०४ (अ) Happy
सफेद गेंद
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
Senecio bombeyensis (सोनकी)
प्रचि ०९

Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)
प्रचि १०

प्रचि ११
Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी)
प्रचि १२

प्रचि १३
Neanotis Montholonii (तारागुच्छ)
प्रचि १४
सीतेची आसवं
प्रचि १५
Cyanotis Tuberosa (आभाळी)
प्रचि १६
Rhamphicarpa Longiflora (तुतारी)
प्रचि १७
Murdannia Lanuginosa (अबोलिमा)
प्रचि १८
Hitchenia Caulina (चावर/Indian Arrowroot)
प्रचि १९
Cyanotis Fasciculata (निलवंती)
प्रचि २०
Chlorophytum Glaucoides (मुसळी)
प्रचि २१
Dipcadi Montanum (दीपकाडी)
प्रचि २२

प्रचि २३
Smithia Bigemina (मिकी माऊस/कावळा)
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

===============================================
===============================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डोळे निवले रे अगदी - हा निसर्गाचा नजारा बघून.......
फोटो काढण्यासाठी एवढी मेहनत, चिकाटी - खूप कौतुकास्पद...खूप धन्यवाद...

गिरी, भाऊकाका, शशांक, माधव धन्यवाद Happy

माधव, प्रचि १२ टोपली कारवीच आहे का? संपूर्ण पठारावर ती दोनच फुलं फुलली होती. काल ज्या फुलांबद्दल बोलत होतो ते "तुतारी"च आहे. Happy धन्स. Happy

अरे जिप्स्या कोणी सांगितलं तुला की तुतारी अशी असते ?...... तो कर्णा आहे Proud

बाकी सगळी फुले एकदम झक्कास
प्रचि १ तर डोक्यावरील भर केसांच्या मधोमध टक्कल पडल्या सारखं वाटतंय बघ
प्रचि ५ म्हणजे तीन हिर्‍याच्या अंगठ्याच जणु
प्रचि १० इय्य मलाई कुल्फिइइइइइइइय्य

सहिच मित्रा... दिवसाची सुरुवात फार छान झाली....
बादवे, शेवटच्या ३ फोटोत resolution ने का मार खाल्लाय?

अहाहा.. पहिलेच प्रचि पाहिल्यावर हे असे महाराष्ट्रात आहे पाहुन खरेच आश्चर्य वाटते. पहायलाच पाहिजे एकदा तरी Happy

जिप्सी सुंदर प्रचि....
फोटो पाहून कासला जाण्याचा मोह होत आहे...एका दिवसात मंबईहून जाऊन परत येऊ शकतो का?
किंवा शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत....

केव्वळ सु प र्ब!!!!!! Happy

तुझ्या फोटोंसाठी आता शब्दच अपुरे पडतात Happy

एक से एक फोटो आहेत.फुलांच्या नावासकट दिलेस ते छान झाले.

जायलाच पाहिजे कास ला? कसे जायचे आणि किती वेळ लागतो हे सांगशिल का? आणि डिसेंबर-जानेवारीत नजारा कसा असेल साधारण?

Pages