"कास"ची फुलं "झक्कास"

Submitted by जिप्सी on 21 September, 2011 - 00:10

===============================================
===============================================
शनिवारी "रानवाटा" ग्रुपबरोबर कास पठार आणि परीसरात दोन दिवस भटकंती केली. पहिल्या दिवशी कास पठारावरच होतो, पण दाट धुके आणि रिमझिमणारा पाऊस यामुळे फोटोग्राफिसाठी आवश्यक असा प्रकाश नव्हता. सगळ्यांचीच थोडी निराशा झाली. लॅण्डस्केपचे चांगले फोटो नाही मिळाले. शेवटी मॅक्रोमोड वापरून काही फुलांचे फोटो टिपले. अगदी काही सेकंदासाठी वातावरण निवळत होते आणि तेव्हढ्याच वेळात पटकन आमचे कॅमेरे सरसावत होते, तर काही काही फोटोंसाठी अर्धा तास एका जागेवर कॅमेरा सेट करून बसुन रहावे लागत होते आणि ऊन आले तर पटकन फोटो क्लिक करावे लागत होते (प्रचि १ :-)). कास पठारावरून थोडे खाली आल्यावर मात्र लाईट मस्त होती त्यामुळे स्मिथियाचे फोटो जरा चांगले मिळाले. (प्रचि २४ ते ३०)

अर्थात फोटो जरी मनासारखे नाही मिळाले तरी तिकडच्या फुलांचा अप्रतिम नजारा मात्र मनात भरून घेतला. एकदा तरी अवश्य पहावी असे हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. अर्थात निसर्गाचे योग्य ते भान राखुनच कारण पायाखाली येणारे, नकळत तोडले जाणारे एखादे दुर्मिळ फुल कदाचित शेवटचे असेल.

फुलांची नावे मायबोलीकर "माधव" यांचेकडुन साभार. Happy काहि फुलांची नावे माहित नाही, जाणकार सांगतीलच. Happy
===============================================
===============================================
Imapatients Balsamina (तेरडा)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०४ (अ) Happy
सफेद गेंद
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
Senecio bombeyensis (सोनकी)
प्रचि ०९

Pogostemon Deccanensis (जांभळी मंजिरी)
प्रचि १०

प्रचि ११
Pleocaulus Ritchiei (टोपली कारवी)
प्रचि १२

प्रचि १३
Neanotis Montholonii (तारागुच्छ)
प्रचि १४
सीतेची आसवं
प्रचि १५
Cyanotis Tuberosa (आभाळी)
प्रचि १६
Rhamphicarpa Longiflora (तुतारी)
प्रचि १७
Murdannia Lanuginosa (अबोलिमा)
प्रचि १८
Hitchenia Caulina (चावर/Indian Arrowroot)
प्रचि १९
Cyanotis Fasciculata (निलवंती)
प्रचि २०
Chlorophytum Glaucoides (मुसळी)
प्रचि २१
Dipcadi Montanum (दीपकाडी)
प्रचि २२

प्रचि २३
Smithia Bigemina (मिकी माऊस/कावळा)
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

===============================================
===============================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

एका दिवसात मंबईहून जाऊन परत येऊ शकतो का? किंवा शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत....>>>>विनार्च, कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. एका दिवसात जाऊन येऊन थोडे हेक्टिक होईल. शनिवारी संध्याकाळी निघुन रविवारी परत जमण्यासारखे आहे. पण या एक-दोन आठवड्यातच जाऊन या. नंतर फुलांचा बहर ओसरेल.

हो रे तेच टोपली कार्वीचे फुल. नावातले प्रश्णचिन्ह काढून टाक >>>>>डन!! :-). धन्यवाद माधव Happy

प्रक्स, Proud

लाजो, डिसेंबर/जानेवारीत, नुसतंच पठार असणार, फुल नाही Sad २-३ आठवडेच हा सगळा नजारा असतो. बहुतेक पुढचा आठवडा शेवटचा Sad

"झक्कास" कोकणात आंबाघाटात सध्या प्रचि २८,२९,३० चाच नजारा आहे केवळ अप्रतीम.
बाकी प्रचि १ म्हणजे क्लासच. Happy

१ नं. पहिला फोटो भन्नाट...
Dipcadi Montanum (दीपकाडी)>>> आयला... का चा काना कढला तर माझा लॉगीन आयडी होइल.. Wink
सगळे फोटो आवडले...

मस्तच! हे फोटो बघितल्यावर एखदा घरघुश्याला (कायम घरात रहाणारा) सुद्धा घरबहेर पडुन निसर्गात जावस वाटेल!

जिप्सी लाजवाब! कास पठार ला जायचे तर तेथे राहण्याची वगैरे काय व्यवस्था आहे का जरा सविस्तर लिहा ना प्लीज.....

भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

कास पठार ला जायचे तर तेथे राहण्याची वगैरे काय व्यवस्था आहे का जरा सविस्तर लिहा ना प्लीज.....>>>>>धन्स प्रज्ञा :-), कासला राहण्याची सोय नाही पण २२ किमी अंतरावर असलेल्या सातारा शहरात राहण्याची उत्तम सोय होते. Happy

Pages