कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
अल्पनाच्या टि-शर्टांचं काय
अल्पनाच्या टि-शर्टांचं काय झालं?
वरच्या यादीत तिचं नाव नाहीये.
मागणी नोंदवताना तिने तिचे टिशर्ट माझ्याकडे द्यावेत असे लिहिलेले होते. माझ्याकडे तिचे टिशर्ट अजून पोचलेले नाहीत.
१) थोडक्यात खालील
१) थोडक्यात खालील मायबोलीकरांचे मुंबईहून टीशर्ट द्यायचे राहिले आहेत-
सुमेधा पुनकर
तानिया....
अमिता पाटील
चिंगी
प्रकाश काळेल.
सतिश..
अल्पना
वरीलपैकी ज्यांनी पैसे जमा केले नाहीत, त्यांनी त्वरित पैसे जमा करून संयोजकांना सहकार्य करावे ही विनंती. तसेच मुंबईहून अजून कुणी टीशर्ट नेले नाहीत, पण त्यांचे नाव चुकून घारूअण्णांनी वर दिलेल्या यादीत नाही, असे कुणी आहे काय? त्यांनीही इथे लिहा प्लीज.
२) मल्लिनाथ किंवा राम, घारूअण्णांनी दिल्याप्रमाणे पुण्याबद्दलची माहिती इथे लिहू शकता कृपया? तसेच पुण्याहून कुणाला अजून टीशर्ट्स मिळाले नाहीत (पैसे जमा केले असतील / नसतील- या दोन्ही केसमध्ये) त्या मायबोलीकरांनी इथे लिहावे ही विनंती.
मंजू, घारुअण्णांची मला विपू
मंजू, घारुअण्णांची मला विपू आली आहे, या विकेंडपर्यंत तुझ्याकडे टीशर्ट पोचवतिल अशी.
मंजू, घारुअण्णांची मला विपू
मंजू, घारुअण्णांची मला विपू आली आहे, या विकेंडपर्यंत तुझ्याकडे टीशर्ट पोचवतिल अशी.>>> बरं.
बरं माझ्याकडे २ जादाचे
बरं माझ्याकडे २ जादाचे टीशर्ट्स आलेले आहेत, हे संयोजकांना मी वेळोवेळी सांगितलेले आहे. ते टीशर्ट कोणाकडे द्यायचे? कधी द्यायचे? कुठे द्यायचे? की माझ्याकडेच ठेवून घेऊ? बक्षीस म्हणून?
माझे टीशर्ट/कॅप कोण,कधी पोचते
माझे टीशर्ट/कॅप कोण,कधी पोचते करणार आहे.? .... कृपया काही कळवाल का ?
पार्सल करणार असाल, त्यांनी कृपया मला संपर्क करा पत्ता कळवेन. रामजवळ दीलेला आहेच.
जर मार्कोपोलो(चंदन) याचेही दिलेले नसतील तर तेही मला पार्सल करतेवेळी, कृपया त्याबरोबरच पाठवा.
आपला नम्र!
माझ्या दोन टोप्यांसाठी मी
माझ्या दोन टोप्यांसाठी मी मल्लीनाथला फोन लावुन-लावुन थकलो...
मल्लीनाथचा फोन बदललेला असेल तर, कृपया बदललेला नंबर ईथे प्रसिद्ध करता येईल का?... म्हणजे माझ्या नोंदवलेल्या 'टोप्यां'ची (पैसे रोख भरलेले आहेत) परीस्थिती मला समजून घेणे बरे पडेल...
टी-शर्टच्या बाबतीत - मी M Size चे दोन आणी L Size चा एक, असे एकुण तीन टी-शर्ट नोंदवलेले होते (रोख पैसे भरून). मला सगळेच L Sizeचे टी-शर्ट्स मिळालेत. तेव्हा आता माझ्याकडे असलेले टी-शर्ट्स मला बदलून मिळतील का?...
मला ४६" (XXL) साईचा टिशर्ट
मला ४६" (XXL) साईचा टिशर्ट मिळालेला नाही. पैसे भरलेले आहेत.
मल्लीनाथचा वर दिलेला नंबर
मल्लीनाथचा वर दिलेला नंबर बदललेला आहे का? नवीन नंबर काय आहे, हे कळवण्याचे करावे. टोप्यांसाठी कॉन्टॅक्ट कसा करायचा नाहीतर?
पैसे सगळ्यांनीच भरलेले
पैसे सगळ्यांनीच भरलेले असावेत. त्या पैशांचा आणि नंतर दिल्या जाणार्या चॅरिटीचा आदर राखून संयोजकांनी जरा जबाबदारीने हे काम लवकरात लवकर हातावेगळे करावे!
टी-शर्टच्या बाबतीत - मी M
टी-शर्टच्या बाबतीत - मी M Size चे दोन आणी L Size चा एक, असे एकुण तीन टी-शर्ट नोंदवलेले होते (रोख पैसे भरून). मला सगळेच L Sizeचे टी-शर्ट्स मिळालेत. तेव्हा आता माझ्याकडे असलेले टी-शर्ट्स मला बदलून मिळतील का?... >> विवेकला अनुमोदन. माझ्या बरोबर पण असंच झालेलं आहे. टोप्या पण मिळालेल्या नाहीत.
संयोजक, कृपया माझ्याकडचे
संयोजक, कृपया माझ्याकडचे टीशर्ट कधी आणि कुठे कलेक्ट करणार ते कळवावे. माझ्याकडे पडून रहायला नकोत आणि कोणाचेही गैरसमजही व्हायला नकोत. पुण्यातल्या पुण्यात (सिटी) मीही आणून देऊ शकेन तुम्हांला. लवकर काय तो निर्णय घ्या, ही विनंती.
छे! तुझ्या पोस्टीवरून मुळीच
छे! तुझ्या पोस्टीवरून मुळीच झालेले नाही. मी लिहिले आणि गैरसमज होईल असे लक्षात आले, म्हणून लगेच एडिटही केले आहे, हे तुझ्याही लक्षात आले असेल. असो.
मी पाहिले नाही एडिट केलेले.
मी पाहिले नाही एडिट केलेले. आत्ता पाहिले. ठीके, नो प्रॉब्लेम.
माझं मागे आनंदमैत्री सोबत
माझं मागे आनंदमैत्री सोबत बोलणं झालेलं त्याप्रमाणे ते मंजुडीकडे माझे टीशर्ट्स पोहोचवणार होते.. पण मंजुला अजुन मिळालेले नाहीयेत.
आता कॄपया अल्पनासोबत माझेही टीशर्टस (१ लेडीज -M, १ युनिसेक्स-M, १ टोपी) मंजुडीकडे द्याल का? मी तिच्याकडुन घेउ शकेन.
जल्ला अजुन टोप्या-टिशर्ट वाटप
जल्ला अजुन टोप्या-टिशर्ट वाटप प्रकरण चालूच आहे का.. !!
मला टी शर्ट्स, टोपी मिळाले.
मला टी शर्ट्स, टोपी मिळाले. आवडले. धन्यवाद.
मला टोपी मिळाली नाही असं
मला टोपी मिळाली नाही असं कळलं, काबरं?
यंदाचे आणि गेल्या वर्षीचे
यंदाचे आणि गेल्या वर्षीचे एकूण चार टीशर्ट्स सायोकडून आत्ताच पोचले. फार सुंदर आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद!
आता ए.वे.ए.ठि. ला यावच लागेल
आता ए.वे.ए.ठि. ला यावच लागेल मृ. टि-शर्ट ए.वे.ए.ठि. लाच शोभुन दिसतात.
अरारा, स्वातीचे ( स्वाती
अरारा, स्वातीचे ( स्वाती आंबोळे ) दोन टी शर्ट आणि एक टोपी माझ्याकडे आहेत . नीधप यांनी ते पुण्यातून घेउन मला दिले होते.
मी चुकून स्वातीला फक्त टीशर्ट आहेत असे सांगितले होते, पण तिला द्यायच्या सामानात टोपी पण आहे . तेंव्हा स्वातीला टोपी घालण्याची जबाबदारी माझी
टी शर्ट एकदम मस्त आहेत. डिझाईन अन रंग छान आहेत, कपड्याची क्वालिटी पण मस्त आहे. इथल्या वॉशर ड्रायर मधे टिकलेत हा मोठा प्लस पॉइंट.
.
.
मी सुद्धा टी-शर्ट्स नेले
मी सुद्धा टी-शर्ट्स नेले नाहीत. कुणास फोनु?
मलाही टोप्या मिळाल्या नाहीत
मलाही टोप्या मिळाल्या नाहीत अजुन, राम की मल्ली कडे संपर्क करायचा आहे???
बरं माझ्याकडे २ जादाचे
बरं माझ्याकडे २ जादाचे टीशर्ट्स आलेले आहेत, हे संयोजकांना मी वेळोवेळी सांगितलेले आहे. ते टीशर्ट कोणाकडे द्यायचे? कधी द्यायचे? कुठे द्यायचे? की माझ्याकडेच ठेवून घेऊ? बक्षीस म्हणून
शैलजाजी, मीही वेळोवेळी सांगितलंय की मी गावात आल्यावर तुमच्याकडुन ते घेउन जाईन.
आणि लोक्सान्नो, माझा नंबर बदलेला नाहीय. ज्यांचा ज्यांचा फोन आलाय ,त्यांच्याशी कोऑर्डीनेट करुन मी पोस्टमन्चे काम बजावलेले आहे.
खालील लोकांनी आपली ऑर्डर
खालील लोकांनी आपली ऑर्डर नेलेली नाहीय, तरी संपर्क साधुन घेउन जावे.
आशुचॅँप
नितीनचंद्र
आगाऊ
anantpawar
Deva
खालील लोकांची ऑर्डर पोचवन्यात आलीय.
गणेश कुलकर्णी
अजय जवादे
paradesaaI
मंजिरी सोमण
ऋयाम
शुभांगी कुलकर्णी
zaad
palli
शैलजा
maitreyee
कैश
पौर्णिमा
माणक्या
दक्षिणा
नंद्या
आर्फी
asami
पराग
साजिरा
prashantg
prajakta_shireen
प्राची
चिनूक्स
मिनी
श्यामली
अरभाट
आशूडी
मयूरेश
हिम्सकूल
मार्को पोलो
prakash kalel
राज्या
शीला
ammi
सुशील जोशी
खालील लोकांचे ऑर्डप्रमाणे पैसे जमा झालेले नाहीत.
Vishnugupta
arun
cybermihir
सिंडरेला
धुमाळ
Sacheen
irsaal
दिपक सु पठाडे
मल्लि, कधी नेणार पण? असो. आता
मल्लि, कधी नेणार पण? असो. आता माझी जबाबदारी संपली असं समजते.
ऑर्डर पोचवली आहे त्यात विवेक देसाई आणि लंपन ह्यांचीही नावं घालता का? मीच पोचवल्या आहेत ह्या ऑर्डरी. विवेकदादांनी ऑर्डर केल्यापैकी टोप्या बाकी आहेत फक्त.
मल्ली, आपल्या फोनवर झालेल्या
मल्ली, आपल्या फोनवर झालेल्या संभाषणानुसार,
मी माझा पत्ता कळवला आहे. मला पार्सल पाठवतेवेळी मार्कोपोलोची ऑर्डर त्याच सोबत पाठवा.
Thanks in advance!
मल्ली, टोपीसाठी फोन करते.
मल्ली, टोपीसाठी फोन करते.
अरे मला माझ्या वस्तु मिळाल्या
अरे मला माझ्या वस्तु मिळाल्या आहेत. पैसे पण दिले आहेत.
Pages