मासे ३४) टोळ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 September, 2011 - 07:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टोळ मासे १ वाटा

रस्श्यासाठी:
वाटण - पाव वाटी ओल खोबर, अर्धा इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या, १ मिरची, थोडी कोथिंबीर

हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
चिंचेचा कोळ

तळण्यासाठी
चिमुटभर हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
लिंबू (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

रस्सा:
टोळीचे डोके व शेपुट काढून टाकायचे. मधल्या भागाचे आपल्याला सोयिस्कर आकारात तुकडे करायचे. हे तुकडे तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायचे.

भांड्यात तेल गरम करुन त्यावर ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी द्यायची. मग त्यावर लगेच हिंग, हळद, मसाला घाऊन लगेच वाटण टाकायचे. त्यातच चिंचेचा कोळ, मिठ घालायचे व मग टोळच्या तुकड्या टाकायच्या. रस्सा ५-१० मिनिटे उकळवून ग्यास बंद करायचा.

तळलेले टोळः
धुतलेल्या तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला हवा असल्यास लिंबू रस लावावा. तवा चांगला तापल्यावर तुकड्या शॅलोफ्राय कराव्यात. तुकड्या ३-४ मिनीटांनी पलटा व परत दुसरी बाजू शिजवुन गॅस बंद करा.

(रेडी रेसिपिज चा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमस्व. मी परत केल्यावर टाकतेच.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकाला एक टोळ की टोळी ते तुम्हीच ठरवा.
अधिक टिपा: 

टोळ हा मासा समुद्रात मिळणारा हा दिसायला लांबलचक व सुंदर चकचकीत असतो.

ह्याच्या शेपटीला टिकलीसारखा काळा ठिपका असतो.


ह्याचे डोके म्हणायची की चोच असाच प्रश्न पडतो मला ती लांब लचक असते.


हे मासे समुद्रात उडतात. आतुन काही भाग जरा पोकळसर असतो. पण चविला चांगले असतात.

माहितीचा स्रोत: 
कोळीण मॅडम.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग, तू देशात आलास की पहिली ट्रिप उरणला काढ. समुद्र, फ्लेमिंगोज आणि जागूच्या हातचं जेवण असा बेत ठेव Happy

अश्विनी, नुतन, अमी, पराग धन्स.
बिच्चारे सगळे मासे श्रावणामुळे कोंडून होते. आता बाहेर काढते त्यांना.

अश्विनी.. साऊंड्स लाईक अ प्लॅन !!! जागूने तसही जेवायचं आमंत्रण दिलच आहे मागे एका माश्यांच्या बाफवर... आणि नसलं तर "सरप्राईज" देऊ.. हा.का.ना.का. Wink

वेलकम बॅक जागू!

हा मासा अमेरिकेत सुद्धा बर्‍याच ठिकाणी मिळतो - पण असा डोक्यासकट मिळत नाही. डोके काढून , आतून साफ केलेला असा मिळतो. स्मेल्ट्स म्हणतात आता या पद्धतीने करुन पाहीन.

जागुच्या मत्स्याचे प्रकार पहाणं म्हणजे डोक्याला त्रास करुन घेणं आहे. Angry Proud
जागुडे, बाई चातुर्मास आहे गं! Happy

छान ! मला नेहमी वाटायचं रेणवी [ मुडदुश्या] या माशाने टोळ [टोके] या माशावर उगीचच कुरघोडी केली आहे. दोन्ही स्वच्छ व चविष्ट. जागूजीना या अन्याय निवारणाबद्दल धन्यवाद !

सारीका, आपण माश्यांच्या आकाराच्या पाटवड्या, कटलेट्स करुन खाऊया Happy मी पण शाकाहारी आहे पण ज्याप्रकारे ही जागू मांसाहार्‍यांच्या रसना खवळवते ते पाहून मज्जा वाटते.

Bhau Thanks.
Ashwini hi khas tujhya vadhadivasachi bhet hoti samaj tujhya manoranjanasathi.

जागू इज ब्याक Happy

केश्वी, तू पण जा पग्यासोबत. हे लोक मासे खातील आणि ( उरणच्या समुद्रात काही मासे शिल्लक उरले असतीलच तर) तू माशांना खाऊ घाल Wink

Lol बाबु.. आधी टोळ वाचून मलापण खरेच टोळ वाटलेले....
इथे टोळ सबंध च्या सबंध तळून काढले चुरचुरीत कि झाले तयार खायला.. चिली किंवा सोया सॉस मधे डिप करून कुडुम कुडुम खायचे..
बाबु.. खरं सांग तू ट्राय केलेस ना इकडे????

रेडी रेसिपिज चा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमस्व. मी परत केल्यावर टाकतेच >> ये तुने क्या जागू Sad सब मजा किरकिरा कर दिया.. Sad

Dakshe kirkiryavarun bagulbuvala ratkida aathavayacha aani to khayachi icha vhyayachi.

Akhi,Parag, Varsha, Medha, Dineshada Thanks.

aarya kashala dokyala tras kartes? khaun tak.

Chatak tujha jordar nished pratikriyevar. mashyavar green bahula udya maranara aalaach pahije. ha kay pivala sustavalela ?