ही स्पर्धा नाही, पण तुमच्यातल्या लेखिकेला / लेखकाला आवाहन आहे. खाली एक अधुरी कथा दिली आहे. एका टप्प्यावर आणून ती सोडून दिली आहे. आता, ती तुम्ही पूर्ण करायची आहे.
याकरता, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये एक वेगळा लेखनाचा धागा उघडा. त्यात ही अर्धवट कथा कॉपी पेस्ट करा आणि त्याखालीच तुमची कथा लिहा. मात्र इथल्या प्रतिसादात आपल्या धाग्याची लिंक जरूर द्या.
विसरू नका : कथा पूर्ण करण्याबरोबरच तिला शीर्षकही द्यायचे आहे.
सगळ्यांकरताच : ही कथा एका मायबोली सदस्यानेच लिहिली आहे. तुम्हाला ओळखायचं आहे, कोण आहे ही लेखिका / हा लेखक?
*****************************************************
अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.
"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...
इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.
"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.
"अभिजीत." हॅलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"
"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"
"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.
अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.
"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.
"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."
आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"
अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?
"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."
"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बिदाईच्या सीनला रायटर लागत नाय रे. बादलीभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...
सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.
भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...
सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते. पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...
खरंतर सावरीबद्दल अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.
अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.
"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"
"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लॉप दिलेत.
तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.
"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदरार्थी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"
मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हातातल्या कागदावरचे डायलॉग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.
सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.
"हॅलो मॅडम"
"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.
"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.
"आझमी, मी तुला एक विचारू?"
"विचार ना!"
"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"
आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?
अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.
मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."
"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "
मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"
अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करत असतील त्यामधे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार?.
तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.
सीरीयलसाठी लिहिणार्या तीन चार लोकांकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरी प्यारी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....
तितक्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.
पुढे ?????????????????
***********************************************
१. "कोणी घेतला बदला!?" - लालू : http://www.maayboli.com/node/28678
२. "एक सुरवात" - निलिमा : http://www.maayboli.com/node/28686
३. "शेवटचचं वळण!" - आयडू : http://www.maayboli.com/node/28693
४. "शेवटचे वळण, उडाली गाळण!" - अरुंधती कुलकर्णी : http://www.maayboli.com/node/28697
५. "न फुललेलं प्रेम" - मुक्तेश्वर कुळकर्णी : http://www.maayboli.com/node/28696
६. "बॉस" - चौकट राजा : http://www.maayboli.com/node/28898
७. "सिरियल किलर" - स्वप्ना_राज : http://www.maayboli.com/node/28920
नंदिनी. 'तवर' हा शब्द तिचाच..
नंदिनी.
'तवर' हा शब्द तिचाच..
बरोब्बर मंजुडी मलाही या
बरोब्बर मंजुडी मलाही या शब्दानेच संशय आला.
माझा गेस "मामी" मुळ
माझा गेस "मामी" मुळ लेखिका.
शेवटचे वळण "एक सुरवात"
http://www.maayboli.com/node/28686
लालू. शेवटचचं वळण! -
लालू.
शेवटचचं वळण! - http://www.maayboli.com/node/28694
नाय ब्वॉ .. ह्यी कता म्या
नाय ब्वॉ .. ह्यी कता म्या लिवल्याली न्हाय!
कोनी कोनी घ्येतलं माजं नाव? हात वर करा आन तसेच हुबे र्हावा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/28696
न फुललेले प्रेम
हे घ्या :
हे घ्या : http://www.maayboli.com/node/28697
शेवटचे वळण, उडाली गाळण!
मजा आली.
मजा आली.
विशेष सुचना : जोवर संयोजक
विशेष सुचना : जोवर संयोजक लेखक / लेखिकेचे नाव घोषित करत नाहीत तोवर कोणत्याही विधानावर विश्वास ठेऊ नये. हो अथवा नाही अशी दोन्ही विधाने दिशाभूल करणारी असू शकतात.
त्यामुळे, खेळ सुरू राहू द्यात.
बेफिकिर आहेत का लेखक ?..
बेफिकिर आहेत का लेखक ?..
नंदिनीच....
नंदिनीच....
कथेचं नाव -
कथेचं नाव - बॉस.
http://www.maayboli.com/node/28898
कथेचं नाव - सिरियल
कथेचं नाव - सिरियल किलर
http://www.maayboli.com/node/28920
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."
अरे आता मुळ कथा कोणी लिहीलेय
अरे आता मुळ कथा कोणी लिहीलेय ते सांगा की राव!
नंदिनी किंवा नी असणार.
कथालेखक / लेखिका इतर
कथालेखक / लेखिका इतर निकालांबरोबरच घोषित केले जातील.
क्ल्यु : या कथेकरता क्ल्युची खरंच गरज आहे का?
गणेशोत्सव संपला. निकालही
गणेशोत्सव संपला. निकालही घोषित झाला आहे. त्यामुळे आता आम्ही या कथेच्या लेखिका 'नंदिनी' यांचे आभार मानत आहोत. धन्यवाद नंदिनी.
आपल्यापैकी बर्याच जणांनी नंदिनीचं नाव ओळखलं होतं. ज्या लोकांनी नाव बरोबर ओळखलं होतं त्यांच्याकरता बक्षिस म्हणून चाळीसपानी वह्या देण्यात येतील. अमेरीकेत राहणार्या लोकांनी स्वखर्चाने लाजोकडून आपली वही ओळख पटवून घेऊन जावी. भारतात राहणार्या लोकांनी लाजो अथवा प्रज्ञा९ अथवा वैद्यबुवा यांच्याकडून स्वखर्चाने आपापली वही घेऊन जावी. इतर ठिकाणी राहणार्या लोकांनी स्वत:करता एक चाळीसपानी वही खरेदी करावी.
वा वा छान आहे गिफ्ट पण सर्वात
वा वा छान आहे गिफ्ट पण सर्वात पहिले नाव ओळखलं त्यांना किमान ऐंशी पानी वही तरी द्यायचीत
या कथेची लेखिका पहिल्या तीन
या कथेची लेखिका पहिल्या तीन वाक्यांतच कळली होती.
नंदिनी, तूही पूर्ण कर की आता ही कथा.
धन्यवाद नंदिनी.
धन्यवाद नंदिनी.
Pages