छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ३ : "करिष्मा कुदरत का"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:22

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "

karishma.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.

गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेल्या, माझ्याशी कसली स्पर्धा करतोस रे! Angry

हे आमच्या तुळशीत उगवलेले पिंपळाचे छोटेसे (!) रोप.
महाराजांनी वर छताइतकी उंची गाठली होती तरी आम्ही ढिम्म. Proud

दिनेश दा Happy मस्तय भूलभुलैय्या.
सर्वांचे फोटोज खूप छानैत.

नलिनी तो पक्षांच्या शाळेचा फोटो क्लासिक आहे.
जिप्स्या काटे लय भारी - आता टोचतील असं वाटतय.
दिनेश, जादू आपकी नजर. मस्त फोटो आणि तितकेच मस्त शिर्षक!

चला जा रहा था मै डरते हुए
हनुमान चालीसा पढते हुए
हो बोलो हनुमान कि जय
हो जय जय बजरंगबली की जय |
hanuman.jpg

(पचमढीच्या जंगलात)

"डीजे, मला अगदी फॅंटम ची गुहा आठवली.. "

~ आणि मला झटदिशी जी.ए.कुलकर्णी यांची गाजलेली 'स्वामी' कथा आठवली. त्या कथेचा शेवट अशाच चित्राशी संबंधित आहे.

दिनेश ~ वाचली नसल्यास जरूर वाचावी आणि दीपांजली यानीही.

डीजे, मला अगदी फॅंटम ची गुहा आठवली.. "

~ आणि मला झटदिशी जी.ए.कुलकर्णी यांची गाजलेली 'स्वामी' कथा आठवली. त्या कथेचा शेवट अशाच चित्राशी संबंधित आहे.

दिनेश ~ वाचली नसल्यास जरूर वाचावी आणि दीपांजली यानीही.

<<< ओके नक्की वाचेन.
वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स :).
स्वाती_आंबोळे ला खिडकीचा आकार महाराष्ट्राच्या नकाशा सारखा वाटला, मलाही वाटतोय अता :).
सिंहगड ला असच हे छोट्सं भगदाड दिसलं, काही फेमस स्पॉट वगैरे नसावा.

प्र त्ये क फोटो सुरेख व गाणी पण समर्पक.

ओके, माझे प्रचि. कलेच्या दृष्टीने सामान्य आहे पण तरीही... तुम्ही हे इतक्या जवळुन कधी पाहिले आहे का? Happy

इंद्रधनुचा तुकडा आभाळातुन उडला
येऊन माझ्या घरकुलात पडला

DSC05688.JPG

मस्तच फोटो सगळ्यांचे.

DSC07273.JPG

फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला गं दारी.....

दिनेशदा काकडीचा फोटो जबरदस्त.
रुणुझुणू मस्तच.

सागर किनारे दिल ये पुकारे

क्या नजारें ..

najaare.jpg

यलोस्टोनमधल्या एका geyser मधल्या microorganisms मुळे तयार झालेली नक्षी ..

आठवणी दाटतात धुके जसे पसरावे
जे 'घड'ले ते सगळे सांग कसे विसरावे? Proud

mashroom_ghad.JPG

गेल्या उन्हाळ्यात आमच्या घराजवळच्या एका झाडाच्या बुंध्याशी उगवलेला भूछत्र्यांचा घड.

वादळात पडलेल्या ओंडक्याला ही नक्षी कसली
कळेना लाकडाला सुद्धा ही नटायची जिद्द कुठली (चंगोंच्या चारोळीची मोडतोड)

IMG_0242.JPG

सँटा फे डाउन टाउनमध्ये एका ठिकाणी ठेवलेला ओंडका.

Pages