टेक्सासविषयी थोडंसं....

Submitted by सीमा on 12 August, 2010 - 13:13

Howdy. y'all. Happy
टेक्सास बाफ वर आपण सगळे टाईमपास गप्पा मारतच असतो.
तर इथे आपण टेक्सासविषयीच्या च्या गप्पा मारुया. इथे तुमच्या गावातली रेस्टाँरंट्स (इंडियन , अमेरिकन , मेक्सिकन ,थाई ... कुठलीही) , प्रेक्षणिय स्थळ इत्यादी विषयी लिहुया. टेक्सास का आवडत , आवडत नाही , इथल कोणत फुड तुम्हाला जास्त आवडत या विषयी सुद्धा लिहिता येईल.
थोडक्यात जे काही टेक्सास च्या रिलेटेड असेल ते सर्व. Happy
हा धागा सार्वजनिक केला आहे , जेणेकरुन सर्वानाच या माहितीचा फायदा होइल. धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्सास ची थोडक्यात माहीती:

माझ्या एका मित्राचा मित्र अ‍ॅरिझोना मधून ड्राईव्ह करुन ह्युस्टन ला येत होता. एल पासो पाशी टेक्सास मधे शिरल्यावर त्यानी फोन केला, "आलो रे तुमच्या टेक्सास मधे! भेटू आता लवकरच!"

त्यानंतर सलग १२ तास ड्राईव्ह करुनही तो ह्युस्टनला पोचला नव्हता! Happy

आणी एवढ्या प्रवासात बघण्यासारखं काहीही नव्हतं हे अजून एक!

मला टेक्सासमधलं थाई फूड आवडतं.

डल्लास मधे North McArthur Blvd मधे जे Kroger आहे त्याच्या कॉर्नरला भारतीय 'मसाला वोक' आहे. त्याला अगदी लागूनच २-३ shops नंतर एक थाई रेस्टॉरंट आहे. नाव आठवत नाहिये आता. पण थाई रेड करी, थाई ग्रीन करी वगैरे अगदी 'एक नंबर'!!!!

मी ऑस्टिन ला बर्‍याच वेळा जातो. आर्बोरेटम मॉल च्या जवळ ऑफिस आहे. तो एरिया एकदम मस्त आहे. या आर्बोरेटम मॉल मधे आणि जवळपास रेस्टॉरंट्स ही मस्त आहेत. ते एक नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट आवडले मला. तसेच जवळ रिसर्च बुलेवार्ड वर ट्विन लायन हे चायनीज, ब्रिक ओव्हन हे पिझा चे ही दोन्ही मस्त आहेत.

बे एरियातून तिकडे गेलं की स्वस्ताई जाणवते Happy

इथे घरी आलेल्या पाहुण्यांना site seeing ला कुठे घेवून जायचा हा गहन प्रश्न आहे.
mustang sq. : really? that's pretty lame.
play areas in diff malls is getting old already.
इथे grapevine मध्ये gaylord texan मध्ये सतत काहीतरी चालू असतं.
सध्या तिथे "Alice in wonderland" theme based exhibits/shows चालू आहेत.
http://www.gaylordhotels.com/gaylord-texan/specials-packages/specials/su...
मी वीकेंड ला जायचा plan करते आहे.

ह्युस्टन टु डॅलस हा ड्राइव्ह खुप सोपा आहे करायला. येताना रस्यात एका एक्झीट ला मुव्हिज/प्रवासात खाण्यासारख्या पदार्थांचे मोठ दुकान(गॅस पंप ) आहे. One of a Kind आहे अगदी. नाव आठवेना झालय. संध्याकाळ पर्यंत लिहिते. तिथे पेकान चिक्की मिळते ती अल्टिमेट असतेच. पण इतरही टिपिकल टेक्सान पदार्थ चांगले असतात.

इथे pecan अतिशय चांगले मिळतात. किंबहुन टेक्सास ला आलात तर सालसा आणि pecan न्याच. इथला लोकल सालसा खाल्लात तर बाकीकडचा आवडणार नाही इतका चांगला असतो. Happy

आत्ता पर्यंतच सगळ्यात सुंदर इंडियन फुड मला नासा समोरच "कुझिन ऑफ इंडिया" मध्ये मिळालय.
नॉर्थ इंडियन बाई चालवते. एकदम फ्रेश , चांगला सेट अप. टिपिकल पडदे लावलेल्या इंडियन रेस्टॉरंट सारख अजिबात नाही. बाहेरुन बघितल्यावर जाणवणार पण नाही इतक आतुन चांगल असेल अस.
नासा ला व्हिजिट देणार असाल तेव्हा जरुर इथे जा.

डॅलस च आर्बेरोटम पण बघण्यासारख आहे. विशेषतः इथला ट्युलिप फेस्टिवल बघण्यासारखा असतो. आक्टोंबर मध्ये मम्स and pumpkin फेस्टिवल असतो तो ही बघण्यासारखा असतो. मुलाना हॅलोवीन कॉस्च्युम घालुन फोटो काढण्यासाठी पर्फेक्ट प्लेस.
साईट साठी इथे पहा.
http://www.dallasarboretum.org/

फॉसिल रिम हे एक चांगल ठिकाण. इस्पे. लहान मुलांना बघण्यासारख आहे. टेक्सास मध्ये असाल तर जरूर व्हिजिट द्या.
http://www.fossilrim.org/

ह्युस्टन ला भेट देण्यासाठी ह्या जागा आहेत:

१. गॅल्वेस्टन बीच
२. Moody Gardens
३. NASA
४. 45 South वरचे outlet malls (नाव विसरले)४
५. स्वामी नारायण मंदिर, मला तर पीअरलँड चं मीनाक्षी मंदिर पण खुप आवडायचं
६. Kemah board walk
७. Six Flags parks
८. Lake Monroe
९. Galleria mall आणि आजूबाजूच्या जागा जसं की वॉटर वॉल (ह्याचं खरं नाव काय आहे माहित नाही, आम्ही वॉटर वॉल च म्हणायचो)
१०. Katy outlet malls
११. Downtown मध्ये zoo, Museum of natural Science, एक Kids Science Museum पण आहे ना?
१२. मी तिकडे असताना एकदा Downtown ला International Festival होतं .. खुप मजा आली होती ..
१३. Kingwood मध्ये अतिशय सुंदर parks आहेत

अजून आठवलं तर लिहीते ..

ह्युस्टन मध्ये Brier Forest वरचं आशियाना (आता नाव बदललं आहे असं वाटतं) आणि 249 वरचं Los Cucos (ह्यांची आता बरीच locations आहेत वाटतं) छान होतं

सशल, आशियानाच नाव आहे अजून. सही फूड असतं.
१)ह्युस्टन डाउनटाऊन मधे आर्ट म्युझीयम अगदी बघण्यासारखं आहे.
२) टेक्सास बॅटलशीप पण एकदा भेट देण्यासाठी चांगलं आहे.
३) पिकनिक, कँपींग साठी हंट्सविल नॅशनल पार्क, ब्रॅझोजबेंड पार्क,
स्टीफन ऑस्टीन स्टेट पार्क इ. फार छान आहेत.
४) सॅन अँटोनोओ जवळ एनचँटींग रॉक.
५) ह्युस्टन मधे रेस्टॉरंटस खूप आहेत पण आमच्या आवडीची काही
लास रोसास २९० वर, थाय कॉटेज वेस्टहायमर, चायनीज साठी
अँबॅसिटर मिडटाऊन मधे, भोजन - गुजराती थाळीसाठी आणखी
आठवलं की लिहिते.

गौरी.

नमस्कार टेक्सन्स!

सशल ने बहुतेक सगळीच ठिकाणं लिहिली आहेत पाहण्यासारखी.

आता २९० वर पण आउट्लेट मॉल आहे, ते पण छान आहे, खरेदीला आणि फिरायला दोन्हि. आमच्या घरापासुन १० मि आहे ड्राईव्ह, आम्ही सहज फिरायला घेवुन जातो कधी मुलिला.

या ठिकाणि माझ्या कॉलेज मधल्या देसी मुलिने तिच्या लग्नाची खरेदी केली होती. तिच्या मते काही वेळा १० $ ला चांगल्या जिन्स मिळु शकतात,

हॉटेल्स,

नोर्थ वेस्ट ला
द्क्षिण
रेड रॉबिन
लॉस कुकॉस
स्वीट टोमॅटो

वुडलंड मधे आणि २९० वर एक थाय

चुईज
ला मॅरेडिन

२४९ वर
पापाज ( यांच्या खुप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा)
ऑलिव। गार्ड्न
चिपोटले....

बाकी अजुन अ‍ॅड करेन वेधा उठली .

टेक्ससमध्ये आम्ही तसे नवीनच आहोत त्यामुळे इथली माहिती वाचायला मजा येते आहे.
गेल्याच आठवड्यात आम्ही San Antonio ट्रिप केली. डाऊनटाऊनमधील Crockett Hotel मध्ये उतरलो होतो. शुक्रवारी रात्री पोहोचलो. शनिवारी सकाळी Riverwalk- boat ride घेतली. थोड्या थंड किंवा ढगाळ हवेत करायला एकदम छान आहे रिव्हरवॉक. मग दिवसभर Sea World मध्ये होतो. खूपच मजा आली.
रविवारी सकाळी डाऊनटाऊनमध्ये Tower of the Americas बघायला गेलो होतो. तिथला Skies Over Texas हा 4D show खूपच मस्त वाटला. फक्त लहान मुलं बघू नाही शकणार. थोडा intense आहे. खुर्च्या वगैरे गदागदा हलवतात Happy
परतीच्या वाटेवर Natural Bridge Caverns बघायला थांबलो. Highly recommended Happy अप्रतिम जागा आहे ! कॅव्हर्नस खूपच प्रशस्त आहेत आणि चालतच उतरायचे असते गुहेत. लहान मुलांना घेऊन जाणार्‍यांना प्रॅम घेऊन आत उतरणे सोयीचे नाही पण बेबी स्लिंगमधून घेऊन जाणे सहज शक्य आहे. उन्हाळ्यासाठी तर अगदीच बेस्ट. तसंही वर्षभर गुहांमधील टेंपरेचर ७० फॅ. असते त्यामुळे कधीही जाता येईल. ही जागा San Antonio पासून साधारण तीस मैलांवर आहे. ऑस्टिनहून ७० मैल, ह्युस्टनहून १८० मैल आहे. डॅलसहून २६० मैल आहे पण परतीच्या रस्त्यावरच आहे त्यामुळे सॅन अँटोनिओ ट्रिप करताना करता येईल.
ऑस्टिनजवळ Inner Space Caverns म्हणूनही एक जागा आहे पण तिथल्यापेक्षा ह्या गुहा खूप मोठ्या आहेत. ह्याच्या शेजारीच Natural Bridge Wildlife ranch आहे. आफ्रिकन सफारी टाईप ! डॅलसजवळ Fossil Rim मध्येही जाता येईल म्हणून आम्ही रँचला मात्र गेलो नाही.
ऑस्टिन ते डॅलस रस्त्यावर I35 freeway वर exit 353 घेतल्यास झेक बेकरी आहे ( Czech Stop ) अप्रतिम केक्स, ब्रेड, कलाच ( रशियन ब्रेड ) होते. एकदम ताजे. भरपूर गजबजलेले होते दुकान. त्या भागात खूपच फेमस असावे. आम्ही ब्रेक घ्यायचा म्हणून सहजच थांबलो आणि एका छान जागेचा शोध लागला. पुढच्या वेळी नक्कीच थांबणार तिथे Happy

"पक्वान्न" सुरुवातीला खुप चांगल होत. लास्ट टाईम गेलेले तेव्हा खुप खराब जेवण होत. Sad
असो.
नविन मुव्ह होणार्‍या लोकांसाठी
प्लॅनो मध्ये ताज , इंडिया बझार आणि सब्जी मंडई अशी तीनही इंडियन ग्रोसरी स्टोअर्स सुरु झाली आहेत.
अजुन लिहिते वेळ झाला कि.

ऑस्टीनच्या जवळ राधा माधव धाम आहे. रहाण्याची वगैरे सोय आहे. मंदिर अतिशय सुरेख आहे अस ऐकलय. मी प्रत्यक्ष अजुन गेले नाहीये. मैत्रिण जावून ३ दिवस रहाणार आहे. तिला अधिक माहिती विचारून लिहेन.
http://www.radhamadhavdham.org/

हो मी गेलिये तिथे. सोय छान असते. रूम च्या बाहेर मोर वगेरे पण असतात. अमेरिकन लोकंच सगळी तिथली व्यवस्था बघतात. त्यांच्या मुली आणी बायका सगळ्या भारतीय वेशभूषेत असतात. अगदी कुंकु आणी पायल, बांगड्या सकट. जेवण पण चांगल होतं.

Plano TX मध्ये नविन काही Indian Grocery stores चालू झाली आहेत.
ताज ग्रोसर्स
ईंडीया बझार
सब्जी मंडई

नेहमीची तयार भाजी (Veg/non veg) घेवून यायची असेल तर Spice बझार हे ठिकाण आहे. भाज्या हैद्राबादी पद्धतीच्या तिखट आणि स्पायसी असतात. इमर्जन्सी साठी वगैरे कधीतरी ट्राय करायला हरकत नाही.

अगं ताज जुनचं आहे ना? का हे दुसरं कुठलं नविन उघडलेलं ताज? त्यांच चाट कॉर्नर छान असतो.
आलू परोठा फार आवडला होता. अगदी शेवट पर्यंत फिलिंग गेलेलं असतं. पाणी पुरीच्या पुर्‍या पण कसे लाटतात हे दुपारी गेलं की बघायला मिळतं.

अगं ते बरसाना धाम चं मंदीर एकदम म्स्त आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरापसून खूप जवळ. मोर पण असतात. बाहेर बसलं हवा खात की एकदम, seinfeld मधल्या सारखं serenity now असं म्हणावसं वाटतं.
तिथे बरेचदा योगा चे वर्कशॉपस होत असतात, त्यांना जाणे हे माझ्या लिस्ट मध्ये कधिपासून आहे.
ग्रेपवाईन मॉल मध्ये लेगोलॅन्ड आणि नविन aquarium पण झालय.

Happy सीमा बरं झाल इथे पण टाकलसं.

आणी तू म्हणतेस तसं पकवान च्या फूड ला काही अर्थ नाही. अगदी वेस्ट ऑफ मनी. आणी भूक लागली असताना गेलं तर अजूनच चिड चिड होते.
आधी एखाद्या वेळेस मे बी नविन असताना चांगल देत असतील पण आता नाही.

प्लॅनोमध्ये बांबु गार्डन सुरु झालयं. Indian -Chinese restaurant. मस्त आहे एकदम फुड. खुप गर्दी असते त्यामुळ कमीतकमी १५ मिनिट्स वेटींग धरुन जा. service चांगली आहे. Ambiance ठिक आहे. फुड अल्टीमेट आहे.
इथे मेनु पहा.
http://www.bamboo-gardens.com/adm/Menu.php?city=Dallas

आम्ही परवा इंडिया चाट कॅफेला गेलो होतो. इतके दिवसात का नव्हतो गेलो काय माहीत...
आम्हाला तरी खूप आवडलं आणि रिझनेबल वाटलं.

ज्यांना पुण्यातल्या बादशाहीची आठवण येत असेल त्यांना आवडेल. महाराष्ट्रीयन भाज्या नाहीत पण थाळी मिळते आणि प्लीज प्रत्येकी एक याप्रमाणे थाळी घेऊ नका. दोघांना एक पुरून उरते. आम्ही सलग दोन दिवस गेलो होतो तिथे. आणि थाळीनंतर सुंदरशी तांदळाची खीर चेपली. प्रेस्टनला आहे हे.

Pages