*********************************************
मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
*********************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.
*********************************************
शिर्षकावरुन ही गाण्यांची
शिर्षकावरुन ही गाण्यांची स्पर्धा आहे की काय वाटले. ही पण कल्पना आवडली. मज्जा येणार
सही ! ही स्पर्धा पण धमाल
सही ! ही स्पर्धा पण धमाल होणार.
मामी टच दिसतोय!
मामी टच दिसतोय!
हे ही सह्हिये. एकदम धम्माल
हे ही सह्हिये.
एकदम धम्माल येणार आहे यंदाच्या गणेशोत्स्वात
मस्त...
मस्त...
भन्नाट! मज्जा येईल बघायला
भन्नाट!
मज्जा येईल बघायला अन वाचायला
)
(जमल्यास अन सापडल्यास, खेळादरम्यान गळाभेट वा गळादाबूचा एक फोटू मी पण टाकावा असे म्हणतो...
मस्त खेळ
मस्त खेळ
ग्रुप च सभासद कस व्हयच?
ग्रुप च सभासद कस व्हयच?
रिमा, गणेशोत्सव सुरू झाल्यावर
रिमा,
गणेशोत्सव सुरू झाल्यावर गृपचं सभासद होता येईल. अधिक माहिती लवकरच देण्यात येइल.