दवंडी १ : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 05:59

nila rangmanch.jpgसूत्रधार : हं... चला तयारी तर झाली. पण हे काय? मला तयार व्हायला सांगून बाईसाहेब अजून आल्याच नाहीत... या बायका तयारी करायला इतका वेळ का लावतात कोण जाणे!

नटी : आलेय हं मी... आणि एवढा काही उद्धार नकोय करायला. जरा ठेवणीतली वेशभूषा करायची म्हणजे वेळ लागायचाच!

सूत्रधार : ठेवणीतली? काही विशेष? नाही, मलाही अगदी खास तयारी करा असं म्हटलं होतंत...

नटी : विसरलात ना! अहोSS आपल्याला मायबोलीच्या गणेशोत्सवाला जायचंय ना! यंदा काही खास अदाकारी बघायला मिळणार आहे म्हणे! शिवाय इतरही अनेक मनोरंजक प्रवेश आहेत बरं का!

सूत्रधार : अरे वा! कोणते बरे?

नटी : सांगते ना! अहो इथे आपण सारे प्रवासी घडीचे! जो तो आपला जीव रमवत असतो, थोडा विरंगुळा म्हणून! त्यात कोणाचा कायापालट होतो, तर कोणी हा आनंदमेळा बघून इथेच रमून जातो!

सूत्रधार : पण हे सगळं कुठे? मनोरंजक प्रवेश काय... तुमचं हे आयुष्याबद्दलचं चिंतन काय... काही कळेनासं झालं!

नटी : तुम्हीही उत्सुक आहात ना? चला तर मग माझ्याबरोबर, मायबोलीनगरीचा गणेशोत्सव बघायला!

**********************************************************

टीप : कार्यक्रम आणि स्पर्धांचे विषय आणि नियम बघण्याकरता निळ्या शब्दांवर जाऊन टिचकी मारा.
**********************************************************

विसरू नका!
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, बाप्पाकरता तुम्ही स्वतः गायलेली गाणी, श्लोक, आरत्या, भजनं, रेकॉर्ड केलेल्या कॉलनीतल्या गणेशाच्या आरत्या.... आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.

सगळे तुमच्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनाकरता आतूर आहेत. त्यामुळे घरच्या गणपतीचे फोटो, आरास, नैवेद्यांची प्रकाशचित्रे आणि कृती आम्हाला जरूर पाठवा. आपल्याला काही खास चित्रं पाठवायची असतील, वेगवेगळ्या अपरिचित गणपतींची ओळख करून द्यायची असेल तर स्वागत आहे.

हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.

**********************************************************
दवंडी २ : मायबोली गणेशोत्सव २०११

**********************************************************

आगामी आकर्षण : किस्न-पेंद्या प्रवेश (लवकरच येत आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी. यंदाच्या गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि कार्यक्रम घोषित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तुमचा सगळ्यांना भरभरून प्रतिसाद मिळेलच. होय ना?

छान!

दवंडी आणि स्पर्धा कार्यक्रम दोन्ही मस्तच.

संयोजक मंडळ आणि पोस्टर्स कोणी केले यांची नावे ही लिहणार का प्लिज.

मस्त! सर्व स्पर्धांची पोस्टर्स छान झाली आहेत- त्यांच्यावरचं इन्ट्रोडक्टरी लेखनही. छान आहेत स्पर्धा. जमेल त्यात नक्की भाग घेणार. स्वतः संयोजकांनी काही कार्यक्रम आयोजित केले असतील, तर त्याचाही कानोसा येऊद्या.. आता बरोब्बर दोन आठवडे राहिले.. वातावरण तापू द्या! Happy

Pages