महावीर बंडू -

Submitted by विदेश on 10 August, 2011 - 05:01

हाती फिरवत गदेस गरगर
बंडू फिरतो भरभर घरभर ,
येणा-जाणाऱ्यास तडाखे
बाल महावीराचे शंभर !

सोफ्यावरून खुर्चीवरती -
खुर्चीवरून फरशीवरती ,
उड्डाणातुनी जखमी होतो
पराक्रमी तो बंडू असतो !

ढगांची गडगड कानीं येता
बंडू एकदम गडबडतो -
महावीर बंडू हा अमुचा
आईच्या पाठीशी दडतो !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: