रीत नाही (साती)

Submitted by साती on 3 August, 2011 - 10:07

वागणे शिस्तीत नाही
ही जगाची रीत नाही

धून वाटे ऐकलेली
ओळखीचे गीत नाही

चुंबताना ओठ माझे
कापले किंचीत नाही

यायचे कोठे भुतांनी
एक येथे शीत नाही

नाविकाने का मलाही
घेतले होडीत नाही

हाल हे व्हावे तुझेही
मी कधी चिंतीत नाही

द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही

राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही

एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही

वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही

भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

मस्त!

साती,
ग़ज़ल आवडली. मस्त कल्पना. दोन शायराचे शेर योगायोगाने सारखे आले तर त्याला "शेर टकराना" असे म्हणतात. याच तरहीत मी ग़ज़ल लिहिली आहे. त्यातील एक शेर हुबेहुब नसला तरी आपल्या एका शेराशी मिळता जुळता आहे. आज मी ती ग़ज़ल प्रकाशित करीत आहे. याला निव्वळ योगायोगच म्हणावे. दुसरे काय?

धन्यवाद सगळ्यांना.
आनंदयात्री,शिकतेय मी, जमेल हळूहळू.

निशिकांत, माझंहि असंच होतं,मी तरही टंकण्यापूर्वीच कुणीतरी मला सुचलेलं लिहून मोकळं होतं.
"ग्रेट पिपल थिंक अलाईक Wink "

साती,

भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही>>>>>

हे बाकी खरेच आहे. कविता आवडली.

भांडणे करतील का, ते
ज्यांस साती भीत नाही

छे बुवा! आम्ही तर न भांडता जुळवूनच घेऊ!!

द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही

राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही

एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही

वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही

भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही>>>>व्वा. मस्तच.

परत एकदा सगळ्यांना धन्यवाद.

नरेंद्रकाका, मला ओळखलेत वाटतं,
मी माईल्ड झालेय हल्ली मनोगतापेक्षा. Happy

आवडली.

छानच जमलीय.

शिर्षका मध्ये साती हे, ही गझल तुमच्या स्वत:बद्दल आहे म्हणुन की अजून काही अर्थ आहे त्यात.

Pages