झाडारडती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गलीबाळु: अरे, ऐकलस का? झाडे सुसमंजस असतात म्हणे. तुम्ही त्यांच्या आजुबाजुला प्रार्थना केली तर ती जास्त चांगली वाढतात.
फाटेफोडु: खरंच? पण कोणत्या भाषेत करायची प्रार्थना?
गलीबाळु: अर्थातच संस्कृत. तीच तर वैश्वीक भाषा आहे. खुद्द देवांची पण.
फाटेफोडु: पण मग खरोखर फरक पडायला उच्चार अगदी योग्य असावे लागतील ना?
गलीबाळु: हो, पण कोणतीच इतर भाषा संस्कृतच्या जवळही पोचणार नाही.
फाटेफोडु: पण सगळ्या मानवांना सुद्धा तर संस्कृत कळत नाही. मग झाडांचे काय बोला? आणि झाडांना प्रार्थनेनी मदत होत असेल तर माणसांना पण नाही का होणार?
गलीबाळु: होतेच तर!
फाटेफोडु: पण मग शिव्याशापांनी वाईट परिणाम पण व्हायला हवा.
गलीबाळु: ऊं, होत असतो, पण लोक स्वत:करता त्याविरूद्ध कवच रचायला आपसुक शिकतात.
फाटेफोडु: आपल्याला चांगल्या गोष्टींविरुद्ध सुद्धा कवच बनवता येते का?
गलीबाळु: कोणी तसे का करेल?
फाटेफोडु: असेच वाटले म्हणुन विचारले आपले.
गलीबाळु: तुझे नेहमी काहीतरी भलतेच असते. मग झाडांच्या सामंजस्या बद्दल ठरले सगळे?
फाटेफोडु: हो बहुतेक. नाही, अजुन एक प्रश्न आहे: कोणी प्रार्थना म्हंटल्यागत सुरबद्ध स्वरुपात शिव्या दिल्या तर?
गलीबाळु: शब्दांवरुन कळेल की ते.
फाटेफोडु: त्यांना भाषा नसेल समजत तर नाही कळणार.
गलीबाळु: हं
फाटेफोडु: मला वाटते ते लाघवावरुन ठरावे. म्हणुनच तर आपण निवडणुकीगणीक भयंकर नेत्यांना निवडुन आणतो.
गलीबाळु: भलत्या विषयावर नको जाऊस.
फाटेफोडु: पण आपल्याला नाहीच समजत राजकारणी भाषा आणि आपण त्यांच्या साखरवाणीला भुलतो.
गलीबाळु: राजकारण्यांना विसर - जेंव्हा तुमच्या मनात चांगले विचार असतात तेंव्हा ते झाडांना बरोब्बर कळतात.
फाटेफोडु: ओह, झाडांनी बेबल मासे तर पाळले नसतात?
गलीबाळु: बेबल मासे? हा काय प्रकार आहे म्हणे?
फाटेफोडु: डग्लस अॅडम्सने त्यांचा शोध लावला होता. बेबल मासा जर कानात ठेवला तर तो आपल्या मेंदुतील तरंगांवर जगतो व त्याचबेळी ते तरंगरुपी विचार इतरांना कळेल अशा स्वरुपात आसमंतात उत्सर्जीत करतो. परग्रहवासियांशी संधान साधण्याकरता हे मासे अत्यावश्यक आहेत.
गलीबाळु: आपण त्यांच्याबद्दल काहीच कसे ऐकले नाही? मी कसे त्यांच्याबद्दल काहीच ऐकले नाही?
फाटेफोडु: राजकारणी लोक त्यांना एरीया ५१ मधे गुप्ततेत ठेवतात. ते जर बाहेर पडले तर सगळेच लोक एकमेकांना समजु शकतील, व युद्धे बंद होऊन राजकारणी लोक बेकार होतील.
गलीबाळु: पण कुठे तरी त्यांचे प्रयोग झाले असतील ना?
फाटेफोडु: विंदा करंदीकरांनी एटु नामक देशात त्यांच्या वापरा बद्दल सांगीतले आहे. आता तिथल्या लोकांना सतत बोलत रहावे लागते. इतरांना आपले विचार कळु न देण्याचा तोच एक मार्ग आहे त्यांच्याकडे.
गलीबाळु: काहीतरी आठवतय खरे त्या प्रकारचे.
फाटेफोडु: चल तर गोषवारा घेऊ या - जर झाडे सुसमंजस असतील तर त्यांना लोकांची प्रार्थना कळते (भाषा न कळताही), बेबल मासे अस्तित्वात आहेत, राजकारणी लोक त्यांना एरीया ५१ मधे ठेवतात (एरीया ५१ पण अस्तित्वात आहे), आणि विंदा करंदीकरांनी बेबल मास्यांवर एटु देशात प्रयोग केले आहेत.
गलीबाळु: चांगला मतितार्थ.

विषय: 
प्रकार: 

मला नीट कळले नाही. Happy

"अमुक अमुक पुजा घातल्यावर झाडाला फुले/फळे आली" वगैरे वर औपरोधिक लिहिले आहे का?

सही.. Happy

धन्यवाद, लोकहो.
स्वाती, श(ब्द) बदलला आहे.
रैना, नावे सुचवु शकता.
साजिरा, hhgttg मधील २ भन्नाट कल्प्नांपैकी एक म्हणजे बेबल मासे.
गजानन, साधना, यावरील थोडे चिंतन शाकाहारावरील लेखामुळे, तर थोडे भाषेवर काही लिहायचे आहे म्हणुन.
सुसमंजस ऐवजी कोणता शब्द वापरता येईल? ( consciousness या अर्थी हवा आहे)

स्वाती, लिंक्स बद्दल धन्यवाद.
साजिरा, तुम स्लार्टी नही हो सकते.

सुजाण हा शब्द वापरता येईल असे वाटते आहे.

प्रशांत, प्रत्येकाने वाट्टेल तो अर्थ घ्यावा. दूसर्या कोणी लिहिले असते तर मी गल्लीतील बाळु किंवा गलिबल असा अर्थ घेतला असता.

Lol
एरिया ५१ ठामपणे आहेच म्हणत आहेस म्हण की. मग तेथील एलियनचे काय? (ते काय जेवतात? त्यांचे देव व पूजा कोणत्या? हे पण येऊदे पुढच्या लेखात. ) Happy

hhgttg >>> हे बर्‍याचजनांना hh सोबतचे gtg असे वाटेल बरं.

Pages