वास्तुशास्त्र, वास्तुरचना, वास्तुदोष यावर चर्चा व प्रश्नोत्तरे

Submitted by निंबुडा on 20 May, 2011 - 06:50

वास्तुशास्त्राविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे यांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा धागा उघडत आहे. इंटीरीअरच्या धाग्यावर मला या संदर्भात असलेले प्रश्न मी विचारले होते. पण कुणीच शंकानिरसन न केल्याने हा स्वतंत्र धागा बनवत आहे. कुणाचा या शास्त्राचा अभ्यास असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अनुभव गाठीशी आहे अश्यांनी इथे माहिती व प्रश्न शेअर करावे.
शिवाय वास्तुशास्त्र खरे कि खोटे, या शास्त्राच्या वाटेला जाणे योग्य कि अयोग्य, वाटेला गेलेल्यांनी घेतलेले बरे - वाईट अनुभवही इथेच शेअर करायला हरकत नाही. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<वास्तुच्या जमिनीत वास्तुपुरुष असतो... मग फ्लॅट असेल तर वरच्या फ्लॅटचा वास्तुपुरुष खालच्या फ्लॅटच्या सिलिंगमध्ये असतो का?>>>

<<< काही अम्तर खणले की दोघनाही लाव्हारस भेटेल की. दोघेही त्याच्याबरोबर बाहेर पडतील... सगळा लाव्ह गेला दोन्ही भोकातून वाहून गेला की मग जायचं आरामात पलीकडे.. ( लावारसाला गुरुत्वाकर्षण लागू होत नाही का? तो उलटा बाहेर कसा पडतो? वास्तु, अध्यात्म, भूगोल, भूगर्भशास्त्र, भौतिक्शास्त्र.... कसं अगदी डोक्याचा पार नारळीकर होऊन गेलाय! )>>>

ही ही Happy खूप funny. खालच्या flat मधला वास्तुपुरुष मग काही काही वेळा कन्फ्युस्ड होईल की खालच्या लोकांनी काही बोललं कि " तथास्थु" का वरच्या flat मधल्या लोकांच्या बोलण्या कडे लक्षं देऊ.

आमची आज्जी नेहमी म्हणायची कि घरात नेहमी शुभ बोलावं कारण वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो.

आता खालच्या अपार्टमेंट मधे राहून वरचे काय बोलतायेत ह्याच्या कडे लक्ष ठेऊन तथास्तु म्हणायचं हे खरचं कठिण काम आहे. त्यातुन खाली जर पार्टी वगेरे चालली असेल तर धड ऐकू पण येणार नाही. Happy
मग चुकिच्याच वाक्याला तथास्तु गेलं कि अजूनचं घोळ.

होपफुली नारळी करांना असले प्रश्न पडत नसतील.

माझ्या मेहनतीच्या पैशाने बांधलेल्या/घेतलेल्या घराचा वास्तुपुरुष मीच, दुसरा कोण कशाला!!!
रच्याकने, वास्तुपुरुषच का? वास्तुस्त्री का नाही? इ.इ. वाद कितव्या पोस्टीनंतर येतील बरे???

>>वास्तुपुरुषच का? वास्तुस्त्री का नाही? इ.इ. वाद कितव्या पोस्टीनंतर येतील बरे???

पुरोगामी आघाडी अवतरली की येतीलच.... धीर धरा थोडा Happy

ज्याना वास्तुशास्त्रातले काहीही समजत नाही अशासाठी :(माझा विश्वास नाहिये पण जे माहित आहे ते सान्गतेय)

१. वास्तुपुरूष हा कधीही "भूमीचा" मालक असतो. अधांतरी त्यची स्थापना होऊ शकत नाही.
तसेच, भूमिचा आकार कधीही चौकोनी अथवा आयताकृती असावा लागतो. गोमुखी आकाराचा प्लॉट क्वचित वापरला जातो. व्याघ्रमुखी प्लॉट घेऊ नये. प्लॉट विकत घेताना त्यामधली जमीन कशी आहे? पाण्याचा निचरा कसा होतो? जमिनीत कुठली झाडे वाढत आहेत? पाण्यासाठी काय सोर्सेस आहेत (विहीर, नदी, सरोवर) हे सर्व बघावे लागते.

२. दिशाचे जे स्वामी आहेत ते १०आहेत. यामधे ब्रह्म हा सर्वात महत्त्वाची देवता आहे,(ऊर्ध्व) आणि त्या देवतेच्या स्थापने साठी प्लॉटमधला मधोमधची भूमी रिकामी ठेवावी लागले. अधो दिशेचा स्वामी वास्तुपुरूष आहे. (हा वास्तविक राक्षस असतो.म्हणून त्याला जमिनीत पुरायचा)

+++ हे सर्व आजच्या घडीला ज्याना शक्य नाही, त्यानी वास्तुशास्त्राचा उपयोग करून काय उपयोग आहे????

३. बहुतेक वास्तुच्या पुस्तकात जो "अग्नी" म्हणतात, पूर्वीच्या काळी अग्नी निर्माण करणे कठीण असायचे. काडेपेट्या नव्हत्या, त्यामुळे प्रत्येक्घरामधे अग्नी कायम पेटत ठेवलेला असायचा. तोसुरक्षित रहावा म्हणून घरातल्या एका कोपर्‍यात ठेवलेला असायचा. त्यामुळे "अमुक्दिशेला अग्नी ठेवावा" असा नियम आला असेल. आपण नाही का, वॉश बेसिनच्या बाजूला टूथ ब्रश ठेवत. आपल्याला काय कुठल्या नियमात सांगितलय.. जे आपण आपल्याला सोयिस्कर आहे ते करतो. तसेच आपले पूर्वज्देखील करत असतील.

नंदिनीची संपूर्ण पोस्ट एकदम सडेतोड >> निंबूडा, तुझा काहीतरी घोळ झालाय का?? >>>

अगं नंदिनी. उलट तुझ्या पोस्टला मीच अनुमोदन देतेय. Uhoh

सडेतोड उत्तर म्हणजे खणखणीत मस्त उत्तर. Happy

मी वास्तुविषयी प्रश्न विचारणारा धागा उघडलाय म्हणजे वास्तुशास्त्राच्या बाजुने बोलतेय असं वाटलं का तुला??

आगाऊ वास्तुस्त्री नाही कारण.. ऑलरेडी घरात एक स्त्री असेल ना सगळा डोलारा संभाळायला.. मग दुसरी कशाला? त्यापेक्षा नुसते बसून तथास्तु म्हणायचे काम करायला पुरुष बरा.. Proud

मी वास्तुविषयी प्रश्न विचारणारा धागा उघडलाय म्हणजे वास्तुशास्त्राच्या बाजुने बोलतेय असं वाटलं का तुला??
<>>>> निंबूडा, तू स्वतः "वास्तुशास्त्रा, वस्तुरचना आणि वास्तुदोष" या विषयावर धागा उघडला आहेस. इथे तुला वास्तुशास्त्रज्ञाचे नंबर आणि पत्ते हवे आहेत असेही लिहिले आहेस. शिवाय कुठल्यातरी पद्धतीला तू काहीतरी "शास्त्रीय कारणे" व तुझे "तर्क" दिले आहेत.

मग तू इथे वास्तुशास्त्राच्या बाजूने बोलत नाहियेस, असे मी का मानू??? इन फॅक्ट, इथे कुणीच तसे का मानावे?

तरीपण यापुढे कन्फ्युजन नको. तुला वास्तुशास्त्राच्या बाजूने बोलाय्चे आहे किंवा नाही हे सरळ स्पष्ट करून टाक. म्हणजे लिहिताना दुसर्‍याचा गोंधळ होणार नाही Proud

ओके. मला वाटतं माझ्या हा धागा उघडण्याच्या मूळ हेतू बद्दल नंदिनी ला (आणि कदाचित इतरांनाही) जाम शंका आहेत. Proud

मध्यंतरी एक प्रॉपर्टी खरेदी करताना मला काही लोकांकडून काही माहिती कळली (मी ज्या शंका माझ्या पहिल्या पोस्ट्स मध्ये विचारल्या आहेत त्या). म्हणून त्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी इथे एक धागा उघडला. परिचितांपैकी एका जवळच्या व्यक्तीच्या घरातल्यांना एका घरात रहायला शिफ्ट झाल्यानंतर खरच खूप अतर्क्य अनुभव यायला लागले. तेव्हा त्यांनी ज्या वास्तु कंन्सल्टंट चा सल्ला घेतला त्याने घरातले ते उत्तरेकडे टॉयलेटचे जे ड्रेनेज वै. ते दोष सांगितले. त्यांच्याच सल्ल्यानुसार त्या परिचिताने रीसेंटलीच घर बदलले. त्यामुळे माझा असा समज झाला की या संदर्भातले नॉलेज वास्तुशास्त्री लोकांना असते. म्हणून मी ओळखेचे व विश्वासाचे वास्तु कंन्सल्टंट असतील तर इथे नंबर आणि पत्ते द्या म्हणून सांगितले. Happy

पण इथल्या अनुभवी लोकांचे ऐकून असे वाटते आहे की प्राचीन काळी त्या वेळच्या परिस्थीनुसार पूर्वजांनी केलेले नियम आजच्या काळात वास्तुला योग्य ठरत नाहीयेत त्यामुळे त्या शास्त्राचा उदो उदो व गैरवापर करून आपले पोट भरणार्‍या वास्तु कंन्सल्टंटवर विश्वास न ठेवणेच योग्य. म्हणूनच तुझ्या पोस्टला सडेतोड म्हटले.

त्या परिचिताने घर ज्या व्यक्तीला विकले त्यालाही काही वाईट अनुभव आले असल्यास आयडीया नाही.

कुठल्यातरी पद्धतीला तू काहीतरी "शास्त्रीय कारणे" व तुझे "तर्क" दिले आहेत. >>>> मला घरातल्या ज्येष्ठ लोकांकडून कळलेले व घरात आम्ही ज्या काही गोष्टी मानतो त्याला अनुसरून मी तसे लिहिले. उदा. दक्षिणेकडे पाय करून न झोपणे, घरातला देव्हारा पूर्व-पश्चिम असणे (दक्षिणाभिमुख नको), उंबरठ्यावर उभे राहून कुणाच्या पाया न पडणे इ. गोष्टी आमच्या घरात पाळल्या जातात. आता प्रत्येक गोष्टी/नियम करण्यामागे पूर्वजांनी काहीतरी तर्कशास्त्र /शास्त्रीय कारण लावलेच असणार की. वाचीव अ ऐकीव माहीतीतली थोडीफार अक्कल मी पाजळली. Proud

घरातला देव्हारा पूर्व-पश्चिम असणे (दक्षिणाभिमुख नको)<<< देवाचे तोंड उत्तरेला नको.. कारण पूजा करताना देवासमोर म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून ओवाळावे लागते. दक्षिण ही यमाची दिशा समजतात. आणि यमाची पूजा नको.. हा विचार आहे.
बाकी चालू द्या.

वास्तुशास्त्र हे स्युडोसायन्सचा उत्तम नमुना आहे, त्यात कुठल्याही गोष्टीला अत्यंत हास्यास्पद शास्त्रीय आधार देण्याची केवीलवाणि धडपड आहे. हे सगळे तथाकथित 'शास्त्र' निव्वळ अ‍ॅड-हॉक रिझनिंगवर आधारित आहे.>>>>हे उत्तर so call आजच्या Vastu Shastri च्यां वतीने लिहित नाही हे लक्ष्यात घ्यावे.

आजच वास्तुशास्त्र हे स्युडोसायन्स अ सू श के ल प रंतू

कालच कन्याकुमारीस्थीत स्वामी विवेकानंन्द रॉकला जाउन आलो. तेथे विवेकानंन्द ध्यानमंडप व कन्या कुमारीची पाउल खूण असलेले मंदिर आहे. ह्या मंदिराच्या आणी ध्यानमंडपच्या मधल्या जागेत एक दिशा निर्देश दाखवला आहे. हा दिशा निर्देश मंदिर बान्धतानाचा असावा व त्या जागी आता चौथरा बान्धला आहे. ह्या जागी कन्या कुमारी ने शिवासाठी एका पायावर आराधना केली होती त्या एका पायाचीच खुण येथे आहे. ह्या दिशा निर्देशानुसार पायाचे Direction Exactly पुर्वेला आहे. आता माझा प्रश्न हा आहे कि कन्या कुमारी ने एका पायावर आराधना केली होती त्यावेळेला तीने दिशा बघून आराधना केली होती? ह्याच जागी विवेकानंन्द ध्यानमंडपाच्या मागे sun calender आहे ज्यात उत्तरायण व दक्शीणायनातील सुर्याची स्तिथी दाखवली आहे.
जर कन्या कुमारीने सुर्याकडे बघून आराधना केली असल्यास ती चुकण्याची शक्यता जास्त आहे. का र ण
वर्षात सुर्याची स्तिथि बदलल असते.

पु र्वी भारता बान्धलेली मंदिरे दिशेच्या बाबतीत खुप EXACT हो ती.

निंबुद "गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो. आणि पृथ्वी ही अंतराळात दक्षिणोत्तर स्थित आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून झोपणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हानीकारक असे काहीसे कारण आहे." हे असले कुठल्या शास्त्रज्ञाने सन्गितले आहे ते तरि कळू दे!!!!

दुकानाचं द्वार दक्षिणेला आणि पश्चिमेला असू नये असं म्हणतात. लक्ष्मी रस्त्यावर मात्र पु ना गाडगीळ या पेढीचं द्वार दक्षिणेला असूनही तिथं ग्राहकांची रांग लागते आणि समोर उत्तरेला द्वार असलेला अष्टेकर माश्या मारीत बसलेला असत. गुरूपुष्याच्या दिवशी पुना कडच्या रांगेकडे बघताना त्याला काय वाटते असेल ?

जळ्ळ मेलं ते वास्तुशास्त्र ! सचोटीने धंदा करून नाव कमावलं असतं तर ही रांग माझ्या दुकानाबाहेर असती. आता एकदा नाव कानफाट्या पडलं म्हटल्यावर वास्तुदोष शोधले काय, फेंगशुई च्या वसू टांगल्या काय.... फायदा नाही !

व्हाईट हाऊस वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का ?

जगातल्या महासत्तेच्या अध्यक्षांचं निवासस्थान म्हटल्यावर वास्तुशास्त्राप्रमाणे असलंच पाहीजे. नसल्यास आपलं वास्तुशास्त्र त्याप्रमाणे सुधारून घेतलं पाहीजे...

@agau : tula vastushastra chi maja udwaychi kahi garaj nahi. tuze ardhawat dnyan bajula thev.
@nimbuda : mi vastu consultant ahe pan mi punyat ahe. arthat visit sathi Mumbai la yeu shakte.
konala kahi vastu sambandhi prashna astil tar jarur vichara. mi scientific reason dyayla pan tayar ahe.

याबाबतीत ऐकावे जनाचे करावे मनाचे असेच करणे योग्य असे मला वाटते..........

अमूक दिशेला घराचे तोंड किंवा किचन असावे वगैरे यामध्ये काही प्रमाणात विज्ञानाचा आधार असतो
उदा. किचेन पूर्व दिशेला असल्यास सकाळचे कोवळे उन किचनच्या खिडकी द्वारे आत येते, तेथील वातावरण स्वच्छ आणि फ्रेश राहण्यास मदत होते

अशा गोष्टी शक्य असतील तर जरुर पाळाव्या मात्र पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी पुर्वेला घराचे तोंड केले तरी सुर्यप्रकाश किती आत येतो हे काय वेगळे सांगायला नको, फ्लॅट सिस्टीम आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असणारी घर बांधताना या गोष्टी पाळण शक्य नाही.

दक्षिणेला पाय करुन झोपल्याने काही फरक पडत नाही , एवढ्या मोठ्या पृथ्वीच्या मानाने मानवाच्या शरिराचा आकार तो काय .. त्याचा गुरुत्वाकर्षणाशी कितीसा संबंध असणार

स्वस्तात मिळाल घर तर घेवून मोकळे व्हा , पॉझीटीव्ह एनर्जी मनात असते घरात नाही..........................

त्याचा गुरुत्वाकर्षणाशी कितीसा संबंध असणार >>> टू बी स्पेसिफिक, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल... ह्यांच्याशी संबंध आहे असे म्हणतात.

स्वस्तात मिळाल घर तर घेवून मोकळे व्हा , पॉझीटीव्ह एनर्जी मनात असते घरात नाही.............>>> +१

>> टू बी स्पेसिफिक, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल... ह्यांच्याशी संबंध आहे असे म्हणतात.

शास्त्रामध्ये बरच स्पष्टीकरण असेल याबाबत पण बुध्दीप्रामाण्यवादी असेलच असे नाही

मूळातच आजचा माणूस कन्फूजनमध्ये जगतो, शास्त्र पाळावे, विज्ञानाच्या मागे धावावे कि खिशाकडे पाहून हात आखडून घ्यावे , यामध्ये तो ज्या ज्या गोष्टी शक्य आहे त्या पाळण्याचा प्रयत्न करतो , ( स्वतःची इच्छा नसली तरी जनमत,नातेवाईक यांचा शब्द ठेवावा म्हणूनही...)

माझच उदाहरण द्यायच झाल तर मी अंकशास्त्र , वासूशास्त्र किंवा कुंडल्या भविष्य यावर जरासुध्दा विश्वास ठेवत नाही पण फ्लॅट घेताना किचेन पुर्वेला ,फ्लॅट क्रमांकाची बेरीज ५ यावी असाच घेतला
कारण मला फक्त फ्लॅट घ्यायचा होता . तो घेताना माझ्या घरचे किंवा सहकारी यांचा सल्ला घेतला तर त्यात तस काही बिघडत नाही पण त्या सल्ल्यानुसार फ्लॅट घेण्यासाठी मला जास्त पैसे मोजावे लागले असते तर मी तो फ्लॅट घेतला नसता.

>>>> एवढ्या मोठ्या पृथ्वीच्या मानाने मानवाच्या शरिराचा आकार तो काय .. त्याचा गुरुत्वाकर्षणाशी कितीसा संबंध असणार <<<< Lol Lol Lol
काय जो काय थोडाफार संबंध असेल तो दोनतिन फुटी स्टूलवरुन वरच्या आकाशाच्या दिशेने उड्डाण्ण करुन प्रत्यक्ष अनुभवून बघावा! (हां उगाच पहिला मजला, टेरेस वगैरे वापरु नका बर्का Wink ) हाय काय अन नाय काय त्यात Proud [काही म्हणले तरी माणसात प्रयोगशीलता/विज्ञाननिष्ठता हविचहवी, नै का?]

aamchya olakhiche ek real estate agent sangatat.....vastushastrat sahasa toilet block madhe farak sangitale jat nahit......karan te badal karane khup avaghad asate. Hyavarun sudnyas adhik sangane n lage....
btw...agent chi aajvar 9 ghare gheun zali....tyatali barich swastat milatat mhanun dakshinmukhi ghetali...ani kuthehi vastu shant keli nahi.....tari ajun sagale nit chalale ahe.

काय जो काय थोडाफार संबंध असेल तो दोनतिन फुटी स्टूलवरुन वरच्या आकाशाच्या दिशेने उड्डाण्ण करुन प्रत्यक्ष अनुभवून बघावा!>>>

लिम्बुराव, हाच प्रयोग वेगवेगळ्या दिशेला सामोरे जाऊन किंवा पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी करा. आम्हालाही कळवा कुठल्या दिशेला गुरुत्वाकर्षण जास्त/कमी जाणवतंय ते.

मी माझं गावचं घर मुद्दाम दक्षिणमुखी बांधलं. खिडक्या उघडल्या की दिवसाच्या कुठल्याही वेळी हवा तेवढा प्रकाश आणि खेळती हवा मिळते. पूर्वीच्या काळी देखील खिडक्यांची संकल्पना होतीच की. मग सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळण्यासाठी दरवाजे पूर्व-पश्चिम असावेत असे सांगणे पटत नाही.

कशाला उगाच चुकीच्या जुन्या गोष्टींना ओढून-ताणून शास्त्रीय कारणे चिकटवायचा अट्टाहास. शेवटी "पोझिटव एनर्जी" आपल्या मनात असते हेच खरं.

कशाला उगाच चुकीच्या जुन्या गोष्टींना ओढून-ताणून शास्त्रीय कारणे चिकटवायचा अट्टाहास.>>> कारण त्या कशाही असल्या तरी आमच्या आहेत, त्यांना सायन्सच्या कुबड्या नकोत असे म्हणायची धमक नाही आहे!

@agau : tula vastushastra chi maja udwaychi kahi garaj nahi. tuze ardhawat dnyan bajula thev.<<<< आगाऊ, हे वाचले नाहीस का? तुझे "ज्ञान" अर्धवट आहे रे बाबा. आधी पूर्ण ज्ञान करून घे त्यासाठी लॅपटॉपची दिशा नक्की काय हवी ते विचारून घे.

Pages