Submitted by सखीप्रीया on 14 May, 2011 - 00:48
कवयित्री.....
शब्दाला शब्द....
यमकांचा अलंकार....
...की झाली कविता असे नाही,
जाणीव आहे मलाही.
मी नव्हे कुणी श्रेष्ठ कवयित्री
...पण मनातून कोसळणार्या शब्दधारांचे काय?
शेवटी त्यांनाही कागदजमीन हवीच हवी.
मग त्याला उच्च प्रतीची कविता म्हणोत,
किंवा नुसतेच कागद काळे म्हणोत.
माझी सृजनशीलता, काव्यप्रतिभा वाहू देते,
या चुकत्-माकत केलेल्या काव्य प्रयत्नाने.
तेव्ह्ढीच मन्-मोकळीकता, शांतता !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे. आशय पण
छान आहे. आशय पण आवडला..
>>>>>...पण मनातून कोसळणार्या शब्दधारांचे काय <<<<<<
त्यासाठी इतर साहीत्यप्रकार नाहीत का ?
संध्या
संध्या
सांजसंध्या
सांजसंध्या
सखीप्रिया संपर्कातून मेल केली
सखीप्रिया
संपर्कातून मेल केली आहे... पहा प्लीज
पुलेशु , माफ करा पण मला
पुलेशु ,
माफ करा पण मला व्याकरण, यमक, अलंकार येत नाहीत असं मी पहिल्यांदाच कबुल केलंय मग काहीतरी प्रतिक्रिया द्यायची आणि दुसर्याचा आत्मविश्वास कमी का करावा. उगाचच वा नुसतीच वाईट प्रतिक्रिया तरी कशाला. येवढंच जर वाईट अन जुनं गचाळ काव्य आहे तर वाचण्याचे कष्ट तरी कशाला ?
परत असं कुणालाही दुखवु नका ही नम्र विनंति!
अरे सगळ्याना लिहु दे कि.
अरे सगळ्याना लिहु दे कि. चेष्टा कशाला? कौतुक नका करु पण कुणी काही लिहितंय तर लिहु दे कि! आवडलं नाही इतपत ठीके रे पण 'गचाळ ?" साहित्य प्रकारांशी सखीप्रिया अपरिचीत असेलही पण होईल वाकिफ हळुहळु.. ..
तुझ्या ह्या कवितेच्या आशयावर ललितसुद्धा सुंदर लिहिता येइल.
सखीप्रिया, टेन्शन नई लेनेका. तु लिख. पण हेही ध्यानात घे, कुणाची सांगण्याची पद्धत चुकली असेल पण मतितार्थ हा कि अधिक वाचन होउ दे., ह्या एक प्रकारच्या सदीच्छाच आहेत.
पुलेशु , म्हणजे पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आवजो तमे, मायबोली आपलाच असा.
पल्लीशी सहमत.
पल्लीशी सहमत.