पुन्हा पुन्हा स्फोट, दरोडे, बलात्कार

Submitted by Kiran.. on 13 July, 2011 - 12:20

महाराष्ट्राचं गृहखातं काय करतंय ?

मुंबईत पुन्हा स्फोट झाले. दहशतवादी कारवायांना पोलीस पुरे पडू शकत नाहीत हे १००% मान्य. पण म्हणून काय एकदाही त्यांना होणारी घटना थांबवता येऊ नये ? किंवा इतक्या घटना घडूनही पाळंमुळं खणून काढता येऊ नयेत ?

तीनच दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली. वडिलांच्या दहाव्याला आलेल्या विवाहीत मुलींवर सर्वांदेखत बलात्कार करून अंत्यविधीसाठी जमवलेल्या पैशांवर दरोडा घातला गेला. गृहमंत्र्यांनी आज पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचं कबूल करून पोलिसांना निलंबित केलं. पण पुन्हा त्यांना सेवेत घेतलं जाणार नाही कशावरून ?

खैरलांजी प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला. संपूर्ण गावासमोर बलात्कार आणि खून असे गुन्हे घडूनही कित्येक दिवस कुणालाही अटक झाली नाही. परिणामी आरोपींना नावाला शिक्षा झाली. गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल असाच गृह खात्याचा कारभार आहे का ?

मध्यंतरी जिल्हाधिका-याला जाळण्याच्या घटनेने प्रकाशात आलेल्या तेलमाफिया, वाळूमाफिया इ. इ. चर्चेवरचा धुरळा खाली बसला आहे. पुण्यात जमीनमाफिया नगरसेवक बनलेले पाहीले , त्यांना अटक झालेली पाहीली आणि सुटका झाल्याचेही !!

नुकतंच वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या वादातील प्रदर्शन सुरेश खोपडे यांच्या निमित्ताने झालं. खोपडेंचं म्हणणं होतं कि दंगल झाल्यानंतर मलमपट्टी करण्यापेक्षा दंगलीची कारणे शोधून ती होणारच नाही याकडे पोलिसांनी लक्ष पुरवलं पाहीजे. सुधाकर सुराडकरांनीही त्याला दुजोरा दिला. कदाचित या अधिका-यांच्या निवेदनात आकस असूही शकेल पण त्यात तथ्य आहे हे कुणीही मान्य करील.

एक प्रश्न नेहमी मनात येतो. अशा दुर्दैवी घटनांमधे मंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे कुणीच कसे बळी पडत नाहीत. अशी इच्छा अजिबात नाही पण हा योगायोग म्हणावा का ? त्यांना सध्या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणक्षेत्रात लेक सिटी बांधण्याची स्वप्ने पडत आहेत. शासन देखील तातकाळ त्यावर काम करतंय. मग स्फोट, दरोडे, बलात्कार अशा किरकोळ समस्यांमधे लक्ष कसं घालावं ?

मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस आणि गृहखातं काय शिकलं हे समोर येईलच. पण सध्या तरी सामान्य माणसाच्या मनात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यापुढे पर्याय दिसत नसल्याने अस्वस्थता आहे इतकंच !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्राचं गृहखातं काय करतंय ?

>>> अहो त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहे.. सुरक्षा यंत्रणा नाहीये... Happy

छायातै
द्वेष नाहीच हो. घटना ताजी असताना मनात विचारांपेक्षा विकारच असतात हे मान्य. काही काळाने त्यावर साधकबाधक विचार होऊ शकतो. म्हणूनच याआधी घडून गेलेल्या घटनांबाबत गृहखात्याने काही होमवर्क केला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.

अनुभव असा आहे कि घटना ताजी असतानाच संबंधित खाती थोडीफार हलतात. नंतर जसजसं विस्मरण होऊ लागतं तसतसा त्यांचाही उत्साह कमी होत जातो.

<<अनुभव असा आहे कि घटना ताजी असतानाच संबंधित खाती थोडीफार हलतात. नंतर जसजसं विस्मरण होऊ लागतं तसतसा त्यांचाही उत्साह कमी होत जातो.>> अगदि खर आहे. Happy

काही काही वादाच्या मुद्यांना लवकरात लवकर मूठमाती देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तरच या अशा घटनांचं विश्लेषण तटस्थपणे आणि वास्तववादी पद्धतीने करून उपाय योजता येतील.

असे मुद्दे

१. दुर्घटना झाली कि अतिरेकी प्रतिक्रिया देणे
२. भाजपा / काँग्रेस यांच्याशी संबंधितांनी एकमेकांवर शरसंधान करणे
३. दहशतवादाला वेगवेगळे रंग चढवणे आणि आपल्या रंगाला सहानुभूती प्रदान करणे
४. घटनांचं विपर्यस्त रिपोर्टिंग आणि विश्लेषण. अशा दुर्घटनांचा स्वार्थासाठी / प्रसिद्धीसाठी उपगोय करणे. यात विविध वाहीन्या, वृत्तपत्रं आणि नेते समाविष्ट आहेत.
५. मतपेढीच्या आशेने वास्तव नाकारणे किंवा ते बोलून न दाखवणे

अनुभव असा आहे कि घटना ताजी असतानाच संबंधित खाती थोडीफार हलतात. नंतर जसजसं विस्मरण होऊ लागतं तसतसा त्यांचाही उत्साह कमी होत जातो. >>> सरकारी खात्यात कामावर असल्यास..., कामं करायला कुणाला आवडणार म्हणा...?

केके,
तुम्हाला पडलेले प्रश्न,विचार अगदी योग्य, सार्थ आहेत.
मलाही असच काहीतरी खुप, नेहमीच वाटतं असतं, पण अस वाटणारे आजुबाजुला खुप कमी लोक दिसतात, त्यामुळे खुप ठिकाणी मी बहुतेक एकटा पडतो.
Happy
(यापुढील काळात स्वसंरक्षण करु शकणारे,निर्भीड लोकच थोडं निर्धास्त, आरामात राहु राहतील अस नाही वाटलं तरच नवल.)

असल्या भेकडासारख्या लुटुपुटीच्या लढाया कसले खेळता ? हिंमत असेल तर सरळ सरळ भारतीय लष्कराला आवाहन का देत नाही हे जे कोणी स्फोटवाले आहेत ते. Angry

महेश तेवढी हिम्मत असती तर ना?

आतापर्यंत जेवढ्या उघड लढाया झाल्यात त्यात हारच झालीये भेकडांची! Angry

आणि दबावामुळे, राजकारणी स्वार्थासाठी जे कोणी आपले काम नीट करत नाहीत त्यांचा निषेध!

असे वाटत होते की सुरक्षा दले तरी चांगली असतील. एका महिला अधिकार्‍याला आत्महत्या करायला लागू शकते ? खुद्द आपली स्वतःची माणसे सुरक्षित नाहीत तिथे देशाची सुरक्षा कशी होणार ?
http://in.news.yahoo.com/dismissed-iaf-officer-anjali-gupta-hangs-hersel...