भरली कारली-चिंच-गूळ रहित

Submitted by सुलेखा on 21 June, 2011 - 10:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो कारली..
१०० ग्राम तीळ ..
प्रत्येकी १-१ टेबल-स्पुन धणे,जिरे,व मोहोरी ..
लसुण पाकळी ७-८..
१/४ टी स्पुन हिंग मसाल्यासाठी व १/४ चमचा हिंग फोडणी साठी..
१/२ टी स्पुन प्रत्येकी आमचुर पावडर व साखर..
१ टी स्पुन ति़खट..२/३ हिरव्या मिरच्या..[आवडीनुसार..]
मीठ-चवीनुसार अंदाजाने..
तेल-१ टी स्पुन मसाल्यासाठी.२ टेबलस्पुन भाजी-फोडणी साठी..

१/४ टी स्पुन हळद

क्रमवार पाककृती: 

bharavaa karele.JPG
१..कारली स्वच्छ धुवुन उभी चीर देवुन प्रत्येकी २/३आडवे तुकडे करुन घ्यावे..
[साले खरवडुन काढु नये तसेच मीठ लावुन ठेवु नये..]
२.कढईत १ टी स्पुन तेल तापवुन त्यात तीळ,धणे,जीरे,मोहोरी,परतुन घ्यावे..गॅस बंद करुन त्यात लाल तिखट,आमचुर.साखर्,हिरव्या मिरचीचे तुकडे लसुण पाकळी चे तुकडे घालुन पुन्हा थोडेसे परतावे...
३..मिक्सर मधे हे मिश्रण वाटुन घ्यावे व अर्धे कारल्यात भरुन अर्धे तयार भाजीत वरुन पेरण्यासाठी ठेवावे..
४..२ टेबल स्पुन तेलात हिंग-मोहोरी-जिरे घालुन फोडणी करावी ..हळद घालावी..भरलेली कारली त्यात घालुन परतावी..कढईवर झाकण ठेवुन त्यात थोडे पाणी घालुन वाफेवर,मंद आचेवर ही कारली शिजु द्यावी..एक दोन वेळा अधुन मधुन हळुवार परतावी..
५.. कारली शिजत आली कि उरलेला मसाला पेरुन एक वाफ आणावी..

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे..
अधिक टिपा: 

१..कारल्याचे साल खरवडायचे नाही ..बिया कडक असल्यास काढाव्या..
२..तेलाचे प्रमाण कमी करायचे असेल तर---- मसाला बिनतेलाचा कोरडाच भाजुन वाटा..भरलेली कारली कुकरच्या डब्यात ठेवुन झाकण ठेवुन २ शिट्या काढुन शिजवुन घ्यावी..१ टी स्पुन तेलाची फोडणी करुन त्यात परतावी..
३..पाणी घातलेले नसल्याने भाजी टिकाउ आहे..
४..तितकी कडु लागत नाही..
५.तशी कृति अगदी साधी आहे पण चव खुपच छान..

माहितीचा स्रोत: 
शेजारी रहाणार्‍या आंटीजी, [शर्मिष्ठादेवी]
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान आहे रेसिपी. तेल कमी लागण्यासाठी मायक्रोवेव्हमध्येपण थोडं पाणी शिंपडून वाफवून घेता येतं.

खरेच, अगदी वेगळा मसाला. आणि कारल्याची भाजी थोडी कडू लागायलाच हवी की.
आमच्या ऑफ़िसमधे जवळजवळ पाकातली कारली असतात.

दिनेशदा,या भाजीचे विशेष म्हणजे कडूपणा जाणवतच नाही मीठ लावुन पाणी काढले नाही/कडु सालं खरवडली नाहीत तरीही..
असेच दुसरी एक पद्धत-कारल्याच्या चकत्यांच्या इतका कांदा चिरुन फोडणीत घालायचा लगेचच कारली ,तिखट्,मीठ्,धनेपुड घालुन भाजी मंद आचेवर करायची ..कडु लागत नाही..

छान

आमच्या कडे ही कारले आणि बटाट्यांच्या काचर्‍यांची भाजी होते, आता याप्रकारेही करून बघेन.