Submitted by वर्षा_म on 17 June, 2011 - 02:17
पहातेस दरसाल
अतुरतेने माझी वाट
यावेळी तुज छळायचा
घातला मी घाट
वेधशाळेचा अंदाज
ठरवला मी खोटा
चिडवण्या तुला गेलो
झाला माझाच तोटा
उशीरा आलो जरी
शोधले तुला अंगणी
वाटले माझ्यासाठी
येशील सोडुन लेखणी
तुजसाठी पसरवीला
चहुकडे मृदगंध
आतुर झालोय आता
पहाण्या तुज धुंद
आवडे तुज म्हणुन
आणले इंद्रधनुष्य
किती हा रुसवा
का असे दुर्लक्ष
रुसवा तुझा काढण्या
सुर्यकिरणा धाडले
जीव माझा घाबरा
तू नाही समजले
कारण शोधण्या मग
केली वार्यास विनवणी
बेधुंद होता जाताना
परतला संथ होउनी
अशुभ मनी भासले
टाहो कुणी फोडाला
अंगणात कुणी तुझा
निश्चल देह आणला
पाहुनी तुझा चेहरा
मी पुरता खचलो
अश्रुंना वाट दिली
बेभान असा बरसलो
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शेवटची दोन कडवी प्रचंड आवडली.
शेवटची दोन कडवी प्रचंड आवडली. छान आहे कविता.
वर्षे, चांगली जमली आहे
वर्षे, चांगली जमली आहे कविता.. शेवटची दोन कडवी खासच
गोजीरीला अनुमोदन
गोजीरीला अनुमोदन
उशीरा आलो जरी शोधले तुला
उशीरा आलो जरी
शोधले तुला अंगणी
वाटले माझ्यासाठी
येशील सोडुन लेखणी
येशील सोडुन लेखणी, थोडे विचित्र वाटते, तिथे येशील टाकुन लेखणी केले तर बरे वाटेल
ओ हो हो हो........ काय आत
ओ हो हो हो........ काय आत भिडणारं लिहिलंय.........
चांगली आहे इंद्रा व सुकिला
चांगली आहे
इंद्रा व सुकिला रॉयल्टी दे आता
धन्यवाद मुक्तेश्वर विचार
धन्यवाद
मुक्तेश्वर विचार करते
गप की अश्वे, नाहीतर यायचे ते दोघे रॉयल्टी मागत
शहारा आला, शेवट वाचताना! छान
शहारा आला, शेवट वाचताना!
छान मांडलस गो!
शेवटी अचानक दिलेली कलाटणी मन
शेवटी अचानक दिलेली कलाटणी
मन विषण्ण करून गेली.
"अश्रुंना वाट दिली
बेभान असा बरसलो"
…… ही संकल्पना आवडली.
खुप खुप आवडली. आपल्या
खुप खुप आवडली. आपल्या प्रतिभेस शतःशा प्रणाम. पावसाळा सुरु झाल्यापासून पुष्कळ कवितांचा मा.बो. वर पाऊस पडलाय, त्यात आम्ही रोज भिजतोय, पण आज तर आपण चक्क पावसालाच सजीव केलेत, त्याला बोलावयास लावले. धन्य आपली लेखणी, धन्य आपली कल्पना.
धन्यवाद
धन्यवाद
प्रचंड आवडली... विशेषत:
प्रचंड आवडली... विशेषत: शेवटची दोन कडवी.
आवडली.... शेवटी अचानक दिलेली
आवडली....
शेवटी अचानक दिलेली कलाटणी
मन विषण्ण करून गेली.>>>> अनुमोदन
आकाश/पाऊस "दाटून" आलं/आला
आकाश/पाऊस "दाटून" आलं/आला आहे, याचा अर्थ आतां उमगला !
छान!!
छान मांडली पावसाची व्यथा.
छान मांडली पावसाची व्यथा.
छान आहे कविता खास करुन
छान आहे कविता
खास करुन "अश्रुंना वाट दिली बेभान असा बरसलो" ही संकल्पना जबरदस्त आवडली.
शप्पथ ! फार आवडली !
शप्पथ ! फार आवडली !
नाही आवडली. अगदीच ट ला ट आणि
नाही आवडली. अगदीच ट ला ट आणि फ ला फ करुन ओढूनताणून केलेली वाटली.
असो. पुलेशु.
धन्यवाद मंदार तुला स्पेशल
धन्यवाद
मंदार तुला स्पेशल
हॅटस ऑफ....
हॅटस ऑफ....
फारच छान.
फारच छान.
पावसाळा आला आणि कविता आठवली
पावसाळा आला आणि कविता आठवली
शेवटची दोन कडवी प्रचंड आवडली.
शेवटची दोन कडवी प्रचंड आवडली. छान आहे कविता.