व्यथा पावसाची

Submitted by वर्षा_म on 17 June, 2011 - 02:17

पहातेस दरसाल
अतुरतेने माझी वाट
यावेळी तुज छळायचा
घातला मी घाट

वेधशाळेचा अंदाज
ठरवला मी खोटा
चिडवण्या तुला गेलो
झाला माझाच तोटा

उशीरा आलो जरी
शोधले तुला अंगणी
वाटले माझ्यासाठी
येशील सोडुन लेखणी

तुजसाठी पसरवीला
चहुकडे मृदगंध
आतुर झालोय आता
पहाण्या तुज धुंद

आवडे तुज म्हणुन
आणले इंद्रधनुष्य
किती हा रुसवा
का असे दुर्लक्ष

रुसवा तुझा काढण्या
सुर्यकिरणा धाडले
जीव माझा घाबरा
तू नाही समजले

कारण शोधण्या मग
केली वार्‍यास विनवणी
बेधुंद होता जाताना
परतला संथ होउनी

अशुभ मनी भासले
टाहो कुणी फोडाला
अंगणात कुणी तुझा
निश्चल देह आणला

पाहुनी तुझा चेहरा
मी पुरता खचलो
अश्रुंना वाट दिली
बेभान असा बरसलो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उशीरा आलो जरी
शोधले तुला अंगणी
वाटले माझ्यासाठी
येशील सोडुन लेखणी

येशील सोडुन लेखणी, थोडे विचित्र वाटते, तिथे येशील टाकुन लेखणी केले तर बरे वाटेल

खुप खुप आवडली. आपल्या प्रतिभेस शतःशा प्रणाम. पावसाळा सुरु झाल्यापासून पुष्कळ कवितांचा मा.बो. वर पाऊस पडलाय, त्यात आम्ही रोज भिजतोय, पण आज तर आपण चक्क पावसालाच सजीव केलेत, त्याला बोलावयास लावले. धन्य आपली लेखणी, धन्य आपली कल्पना.

छान आहे कविता
खास करुन "अश्रुंना वाट दिली बेभान असा बरसलो" ही संकल्पना जबरदस्त आवडली.