पाऊस मनात

Submitted by उमेश वैद्य on 15 June, 2011 - 04:53

पाऊस मनात

दाटला नभी कधीचा पाऊस पडून गेला
साचला मनी जुनाट पाचोळा झडून गेला

सावळा थवा ढगांचा उतरून खाली आला
डोळ्यातील अश्रूंमध्ये हा रस्ता बुडून गेला

फ़डफ़डून ओले पंख अन पिऊन गारवा ताजा
चित्ताच्या मालिन्याचा हा पारवा उडून गेला

मेदिनीच्या अंगावरती जलधारांची पिचकारी
फ़ुलवीते शहारा हिरवा तो खेळ आवडून गेला

टपटपती कौलावरती अधिर थेंब नर्तना आले
आताच समूह नृत्याचा सोहळा घडून गेला

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: