एक प्रश्न

Submitted by वर्षा_म on 14 June, 2011 - 06:16

नास्तिक असुन तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू

हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू

रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू

चिडुन नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू

देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू

खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा ..... छान मांडलंय.
कवितेतली ’ती/मी’, पूजेचा व्यवहार सांभाळतेय;
तर ’तो’, त्याच्या व्यवहारातून पूजा घडवतोय.

वर्षे, कविताच चांगल्या करतेस विडंबनापेक्षा.. Happy
मला खूप आवडली.. Happy
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दे..
खुनावणारी च्या जागी खुणावणारी हवंय.

कविता खुपच आवडली. त्या नास्तिकाला देवाची गरज नाही कारण त्याच्या मनात च देव वसलेला आहे व त्याच्या क्रुतीत देवाचे दर्शन होत आहे. तुमच मात्र अस झाल आहे की "मनी नाही भाव आणि देवा मला पाव"..... (इट्स अ जोक)

हे कशाचं विडंबन आहे? >>> चिमण्या गुन्हेगार कितीही चांगले वागायचा प्रयत्न करु देत.. तुझ्यासारखे लोक त्याला काही सुधारु देणार नाहीत Wink

दक्षे धन्स ग.. केलाय बदल Happy

धन्यवाद Happy

देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू

'गरजु' च्या रुपात येवुन नास्तिकालाच दर्शन देणार Happy आस्तिक शोधतोय रोज देवळात Happy

छान प्रश्न मांडलास अन प्रश्नातच उत्तर लिहीलेस Happy

Pages