शीला की जवानी

Submitted by जान्हवी_ढोले on 3 June, 2011 - 05:52

डार्क ऑरेंज शुभ्र सफेद वर जरा उग्रच वाटतो
मात्र तोच लाईट क्रिम वर डोळे थंड करतो
पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,

तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,

पिवळ्यात जरासं निळ मिसळलं तर हिरवं होतं
हे भकास पिवळं गवत त्या निळ्या आकाशाच्या
बँकग्राऊंडवर किती उसळलं तरी हिरव काहि होईना
इतक्यात कोणी पेटवल कि ते काळं होऊ पाहतय

जख्खं काळं म्हणजे कोणत्याच रंगाचा आता मागमूस नाही
असं कसं काळा हा काही मूळ रंग नाही
सगळे रंग कुस्करून टाकावेत
तेव्हा कुठे हा अंधार बनतो

तशीच ती शुभ्रता तो सफेद हा ही काही मूळ रंग नाही
ना कोणा रंगांना कुस्करून ती बनते
थोडसं अलिप्त राहिलं कि आपोआपच उजाळते
मी ही काहिसं असंच ठरवलयं,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी अगोदर छान रग रग कोणता रग ........असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................
>>>
अनुस्वारांचा आणि तुमचा ३६ चा आकडा आहे का कवयित्री ताई??

शिला अजुन अंड्यात आहे....'जवान' व्हायला वेळ असेल...

कविता रंगीन आहे...

पण मी माझ्या प्रचिंच्या बाफ 'शेख बोक्याला' 'शिला की जवानी' असं नाव दिले तर अतिरंगीन वाचकांवर किती घोर अन्याय करण्या सारखं होईल..याचा अंदाज आहे का.....?

घ्या 'रेश्मा की जवानी' समजुन हा बाफ पहा.
http://www.maayboli.com/node/26441

मी अगोदर छान रग रग कोणता रग असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................ >>>

मस्तच. ! २० जण आले आता.

पुढचे शिर्षक - मुन्नी बदनाम हुइ का ?

'अंधार' शीर्षक योग्य राहील. मात्र शेवटच्या आणि त्यापूर्वीच्या कडव्यांची अदलाबदल करावी लागेल.अंधार शेवटी यायला हवा.कविता खरच चांगली आहे.

जान्हवी,
कविता मस्तच आहे!!

हे खास करून आवडलं..

पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,

तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,

शीर्षकाचं तेवढं मनावर घ्या..
"मी काहिसं असंच ठरवलयं.." हे पण चांगलं वाटू शकेल.. जस्ट अ सजेस्शन..