जलरंग प्रात्यक्षिक

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मागे काही मायबोलीकरांनी माझ्या चित्रावर प्रतिक्रिया देताना एखादे प्रात्यक्षिक टाकता येईल का असे विचारले होते. त्या साठी हे सोप्पे ( यात चित्र विषय आणि बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड हे ठळकपणे वेगळे दिसतेय) चित्र करता करता फोटो काढले.

१) हलकया हाताने आकार कळतील ईतपत चित्र काढुन घेतले

1_0.jpg

२) त्या आकरात रंग ब्लॉक करुन घेतले
2_0.jpg

३) त्यानंतर चित्र थोडे सुकल्यानंतर काही डिटेल्स टाकले
3.jpg

४)शेवटी डेप्थ तयार करायला सावलीचा भाग आणि काही डिटेल्स भरले
4.jpg

कमित कमी काम करुन परिणाम साधायचा प्रयत्न केलाय

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पाटील
सुरेख. प्रात्यक्षिकासाठी धन्यवाद. प्रत्येक जलरंगात सुरूवातीला वॉश वापरत नाहीत का?

छानच ! मनःपूर्वक धन्यवाद.
<< कमित कमी काम करुन परिणाम साधायचा प्रयत्न केलाय >> आमचं नेमकं उलटं होतं ! Wink

रुनी- दुसर्‍या स्टेप मधे वेट इन वेट वॉश दिलाय. पांढरा कागद सुटु नय म्हणुन काही प्लेन वॉश देतात. या चित्रात छपरा च्या वरचा भाग प्लेन निळ्या रंगात आणि छपरापासुन खालचा भाग पिवळ्या रंगात रंगौन नंतर काम करता आले असते,

सुरेख झालेय एकदम. आता वाकडे तिकडे जसे जमेल तसे मी करणार आहे. त्याशिवाय वॉर्टरकलर्सची जी भिती वाटते ती जाणार नाही.

वा सुंदरच. जलरंग खरच वापरायला शिकायचे आहे.
अजय कुठला पेपर वापरता तेही लिहीणार का प्लिज.

व्वा..सुरेखच.. प्रात्यक्षिकाचे स्टेप बाय स्टेप फोटो टाकल्याने नीट समजले. धन्स!!!
मलाही रूनी सारखा प्रश्न पडला होता..पण अश्याप्रकारेही वॉश देता येतो तर!!! Happy

धन्यवाद-
सशल- प्रदर्शन ,इतक्यात कुठे चांगली गॅलरी मिळ्णार नाही , त्यामुळे अजुन अवकाश आहे.
मिनोती- सरावाने फरक पडतो हे मी स्वःनुभवाने सांगु शकतो Happy
सावली हा पेपर ६०% कॉटन +४० % सिन्थेटीक आहे (स्वस्त आणि कामचलाउ)पण १००% कॉट्न, अ‍ॅसीड फ्री, ३०० GSM | रफ ग्रेन्स पेपर केव्हाही उजवा. मला आवडणारा पेपर म्हणाल तर saunders waterford आणि fabriano artistico. आर्चेस पेपर बराच महाग असल्याने कमी वापरतो. बाकी सरवा साठी इन्डीअन हॅन्ड्मेड पेपर वापरतो (बहुतेक लातुरला कुठेतरी पेपर चांगला बनतो)

नीधप- वॉटरकलर्स cotman (winsor and newton) च्या काही शेड्स आणि आपले कॅम्लीन वापरलेत. ग्वाश ची पांढरी शेड वापरतो कधितरी. किंवा पोस्टर सारखे काम करायचे तर वापरतो.

धन्यवाद अजय.
माझ्याकडे जो पेपर आहे त्यावर रंग स्प्रेड होत नाहीत, किंवा नीट मिक्स होत नाहीत. लगेच वाळुन पोस्टर कलरसारखा इफेक्ट येतो. - हि माझी वापरण्यातली चुक असण्याची शक्यताहि बरीच आहे पण तरीही हँडमेड पेपर शोधुन वापरुन बघेन. तुम्ही लिहिल्या त्या व्हरायटी इथे शोधणे कठीण आहे.

Pages