जलरंग प्रात्यक्षिक

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मागे काही मायबोलीकरांनी माझ्या चित्रावर प्रतिक्रिया देताना एखादे प्रात्यक्षिक टाकता येईल का असे विचारले होते. त्या साठी हे सोप्पे ( यात चित्र विषय आणि बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड हे ठळकपणे वेगळे दिसतेय) चित्र करता करता फोटो काढले.

१) हलकया हाताने आकार कळतील ईतपत चित्र काढुन घेतले

1_0.jpg

२) त्या आकरात रंग ब्लॉक करुन घेतले
2_0.jpg

३) त्यानंतर चित्र थोडे सुकल्यानंतर काही डिटेल्स टाकले
3.jpg

४)शेवटी डेप्थ तयार करायला सावलीचा भाग आणि काही डिटेल्स भरले
4.jpg

कमित कमी काम करुन परिणाम साधायचा प्रयत्न केलाय

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्तच Happy
तुमच्यासाठी हे चित्र अगदी साधं, सोपं असेल, पण आमच्यासारख्यांसाठी हे ही प्रचंड कठीण वगैरेच आहे!!
असं हळूहळू तयार होत जाणारं चित्र (पेंटिंग), त्याची प्रोसेस निरखायला मला अतिशय आवडतं. पण बहुतेक चित्रकार ते चित्र रंगवत असताना कुणाला निरखू देत नाहीत. अगदी माझा शाळकरी मुलगाही त्याला अपवाद नाही. (आणि ते साहजिकही आहे म्हणा... मलाही मी लेखन करत असताना मागे उभं राहून कुणी वाचत असेल तर अस्वस्थ व्हायला होतं.)

मला बरेच दिवसांपसून वॉटरकलर्,स्केचेस करायची खूप ईच्छा होत होती ती परत उफाळून आली. धन्यवाद!

<< पण बहुतेक चित्रकार ते चित्र रंगवत असताना कुणाला निरखू देत नाहीत >> ललिता-प्रितीजी, ग्रामीण भागात चित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रथितयश कलाकारांचे कँप घेतले जातात व तिथं तुम्हाला असे कलाकार प्रत्यक्ष काम करताना पहायला मिळतात. चिपळुणजवळ सावर्डे येथें कांही वर्षांपूर्वी असा आठ-दहा दिवसांचा कँप घेण्यात आला होता; प्रत्यक्ष पोर्ट्रेटस, लँडस्केप, मूर्ती इ. घडवताना अशा कलाकाराना पहाणं ही एक आनंददायी अनुभूतीच असते !

सुंदर.

खूपच सुरेख अजय्,अनेकानेक धन्यवाद.वाटायला एकदम सोपं वाटतं,पण करायला लागलं की दमछाक होते(अत्यंत ताजा स्वानुभव Happy ),पण प्रात्यक्शिक बघाययला मला खूप आवडतं,हे ही खूप आवडलं.पप्लीज असं काही केलंत की इथे जरूर शेअर करा,प्रेरणा मिळते..

अजय,
आज मि पहिल्यानदाच तुमचे सर्व लेखन वाचले, हे प्रात्यक्षिक खुपच आवडले, ईतर सर्व चित्र हि अपतिम आहेत. आपल्या बरोबर आऊट डोर स्केचिग ला यायचि सन्धि मिळाल्यास बरेच काहि मला शिकता यईल.

Pages