वर्षाविहार २०११ - संयोजक नोंदणी

Submitted by admin on 1 June, 2011 - 02:04

गेली ५/६ वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ववीला यायला उत्सुक आहे. Happy

संयोजन वगैरे कामे आमची नाहीत. आम्ही फक्त संयोजक कुठे चुकले, त्यांनी काय करायला हवे होते व. व. बडबड करत टीका करणार... Wink

मी साधना काय म्हणेल, त्याला दुजोरा देणार Proud
डूआया, नाही. Happy थेट समितीत वगैरे नाही, पण काही मदत हवी असल्यास करु शकेन.

मुंबईकर अजुन वविसाठी मानसिकरित्या तयार झालेले नाहीत कॉय??? संयोजन समितीत कोणच कस नॉय्????:हाहा:

मंजूडी, मूळ मुद्द्याच्या संबंधित पोस्टीही आहेत बघ. संयोजन समितीला मदत करायची तयारी दाखवलेय. Happy सयोजन समितीत काम करु इच्छिणार्‍यांच्याही पोस्टी आहेत.

आत्तापर्यंतच्या एकूण सोळा पोस्टींपैकी फक्त चार पोस्टी विषयाशी संबंधित आहेत. माझी ही सतरावी पोस्ट.

कृपया संयोजन समिती स्थापकांचे काम वाढवू नका.

मीन्वा होईल सवय हळूहळू Wink रामभौ या हो स्वागत आहे Happy कामं तर काय आहेतच.

मदत / पाठिंबा / टि / टीका/ दुजोरा / अनुमोदन वगैरे चांगलंच आहे! पण लक्षात ठेवा हे काही यूपीए सरकार नव्हे! Proud

आत्तापर्यंतच्या एकूण सोळा पोस्टींपैकी फक्त चार पोस्टी विषयाशी संबंधित आहेत>>> याचा अर्थ हे सगळे आयडी पुण्यातील आहेत.. Proud
पण तुझ्या पोस्ट ला अनुमोदन.. यापुढे प्रत्येकाने आपली पोस्ट विषयाशी संबंधीत राहील ही खबरदारी घ्या ही विनंती..

नवीन संयोजकांस शुभेच्छा Happy यावेळेस काही कारणांमुळे संयोजन जमणार नाही , ववीला नक्की येणार.
एक सूचना :- संयोजकांची टीम जुन्या काही मंडळींना घेउन बनवा,त्यांच्या अनुभवाचा बराच उपयोग होतो कामात.

टीशर्ट करणार आहात का?? करणार असाल तर तयार करुन घेण्याचे काम मी करीन पण बाकी सगळे काम टी-शर्ट समितीने करावे..

आत्तापर्यंतच्या एकूण सोळा पोस्टींपैकी फक्त चार पोस्टी विषयाशी संबंधित आहेत>>> याचा अर्थ हे सगळे आयडी पुण्यातील आहेत.>>>यावर्षी ववि पुण्याजवळ असणार आहे ....(?):स्मितः:

नमस्कार , हे बरंच झालं. सर्व नवीन संयोजकांचं स्वागत. मीही यावर्षी संयोजनात सहभागी होइन. माझ्या नावाची नोंदणी करायला हरकत नाही.
>>>>टीशर्ट करणार आहात का?? करणार असाल तर तयार करुन घेण्याचे काम मी करीन पण बाकी सगळे काम टी-शर्ट समितीने करावे.. हिम्या सर्व नेहेमीप्रमाणेच करावे लागेल.

चला उत्सुक संयोजकांनी खालील गृहपाठ करायला हरकत नाही.
http://www.maayboli.com/node/16397
http://www.maayboli.com/node/16427
सर्वच संयोजकांनी खालील पद्ध्तीने आपली नाव नोंदवायला हरकत नाही
मायबोली आयडी:-
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई/पुणे
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांकः-
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-वविसंयोजन/टीशर्ट् संयोजन /सांस संयोजन

मायबोली आयडी:-घारुआण्णा
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांकः-
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-वविसंयोजन/टीशर्ट् संयोजन /सांस संयोजन

यावर्षी ववि पुण्याजवळ असणार आहे ....>> अनिल नमस्कार .... पोस्ट कोठुन ही आल्या तरी सहसा वविचे ठिकाण हे मुंबै आणी पुणेकरांना सोयीचे असावे अशी साधारण कल्पना असते.

मायबोली आयडी:- डुआय
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :- ९८१९५९७१४५
कोणत्या समितीत काम करायला अधिक आवडेल :- वविसंयोजन / सांस संयोजन करेन म्हणतो.

एक - दोन अफलातून गेम्स आहेत माझ्या डोक्यात अन् वविची सुरूवातही जरा हटके करण्याचे योजले आहे!

Pages