Submitted by निवडुंग on 29 May, 2011 - 02:48
सुकून गेलेल्या कळ्यांत
फुलं शोधण्यात राम नाही.
नापीक जमिनीत बीजं अंकुरायाची
स्वप्नं पाहण्यात राम नाही.
दोन ध्रुवं सांधायाच्या
तुटेपर्यंतच्या प्रयत्नात राम नाही.
मधुशालाच सुखदुखात साथी तर,
मधुबालाच्या आसेत राम नाही.
या जिंदगीतून तूच वजा झाली
आता या जिंदगीत काही राम नाही.
रामालाच अवतरायला जागा सापडेना,
त्याचं नाव घेण्यात ही राम उरला नाही.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
निवडुंगा छान आहे कविता..
निवडुंगा
छान आहे कविता..
अंतरे एकापाठोपाठ एक मोठे होत
अंतरे एकापाठोपाठ एक मोठे होत गेलेत
छान आहे कविता
किरण, जागोमोहनप्यारेजी.. खूप
किरण, जागोमोहनप्यारेजी..
खूप आभार !