फक्त पुरूषांसाठी : विबासं जमलय का ? मग हे अवश्य वाचा. ( अल्पवयीन व सज्जन यांना प्रवेश निषिद्ध)

Submitted by Kiran.. on 24 May, 2011 - 16:09

अभिनंदन !

इथपर्यंत पोहोचलाय याचा अर्थ तुमचं जमलय कुठंतरी. ( आकडे सांगू नका :फिदी:)
विबासं मधे नवीन असल्याने ( असणारच) काही काळजीही घ्यायची असते हे तुमच्या गावीही नसणार. जसा पहिला खून केल्यावर खुनी घटनास्थळी येतो आणि पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकतो अशा चुका होणे स्वाभाविक आहे.

या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुचवत आहे.

१. विबासंग्रस्त पुरूष एकटेपंणात आनंदी दिसतो तर बायकोसमोर त्याला गिल्टी वाटत राहत. हे भाव बायकोच्या नजरेतून सुटणं कठीणच. संशयाची सुई फिरायला हे पहिलं कारण ठरू शकतं. तेव्हा नॉर्मल रहा. ( आधी कसे होतात हे आठवून पहा)

२. विबासं जमल्यापासून नवरा अत्यंत प्रेमळ होऊ लागतो. अचानक झालेल्या या परिवर्तनाने बायको खूष होईल असा तुमचा अंदाज असेल तर बायकोला तुम्ही अद्याप ओळखलेले दिसत नाही. इथच तुम्ही फसणार. तुमच्या या परिवर्तनाने बायकोला आता शंका येऊ लागते.

३. विबासंपात्रास काही भेटवस्तू दिली असेल तर मन खात राहतं. अशा वेळी बायकोलाही एखादी साडी घेऊन परिमार्जन करावं असे तीव्र विचार मनात येऊ लागतात. ही सगळ्यात मोठी घोडचूक होय. न विचारता साडी, ड्रेस आणून दिल्यास प्रकरण शंका किंवा संशय इथपर्यंत मर्यादित राहत नाही.

४. वरील तिन्ही काळज्या घेतलेल्या नसल्यास आता तुमच्यावर बारीक लक्ष असल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही हँगरला अडकवलेल्या शर्टाचा वास घेणे, कुठे लांब केस दिसतोय का याची तपासणी करणे असे उद्योग एव्हाना घरात सुरू झालेच असतील. कदाचित तुमचा कुत्रा एकवेळ गंडेल पण बायको तुम्हाला हल्ली कुठला सेंट मारता असा प्रश्न विचारल्याशिवाय रहायची नाही. तेव्हा विबासंपात्रास मला सेंट, लिपस्टिक आणि नेलपॉलिशची अ‍ॅलर्जी आहे असं सुचवून पहा.

५. घरी येण्याच्या वेळा बदलेल्या असतील तर फोन बंद ठेवू नका. बायकोचे फोन आले तर कट करण्याची चूक करू नका. त्याऐवजी, एखादं चायनीज मॉडेल खरेदी करा. त्यात फेक व्हॉईस नावचं सॉफ्टवेअर असतं. त्यातला मॅच्युअर्ड मेल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि निर्धास्त रहा.

६. अमक्या मित्राकडे गेलो होतो, हा भेटला वगैरे फालतू कारणात प्रतिभा वाया घालवू नये. त्याऐवजी आपलं आर्थिक गणित बिघडलय, त्यामुळं मी एमएलएम करायचं ठरवलय. रोज दोन तास तर द्यावेच लागतील असं सांगा. हे कारणही पटेलच असं काही नाही. पण मित्रांकडे चौकशी होऊन तोंडघशी पडण्यापेक्षा हा सुरक्षित उपाय आहे.

७. अचानक टापटीप रहायला सुरूवात झाल्याने विचारणा होईलच. त्यालाही अनु. क्रम ६ हेच उत्तर लागू पडते. एका दगडात दोन पक्षी !

८. एव्हढं करूनही तुम्ही पकडले जाणारच आहात. कसं ते नाही सांगता येत. कारण इथपर्यंतच्या खबरदा-या "मित्राच्या" अनुभवावरून दिलेल्या आहेत. त्याच्याकडून काय राहीलं हे अनुभवींनी नमूद करावं आणि इच्छुकांना लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती.

कळावे

आ. ज्येष्ठ समाजसेवक
किरण हजारे

गुलमोहर: 

तुम्हाला तीव्रतेन विबासं असावं असं वाटत असेल आणि पदरी सगळीकडून निराशाच येत असेल तर शेवटचा उपाय म्हणून पत्नीचीच मदत मागा.

याचे फायदे

१. आपला नवरा अगदीच "हा" आहे हा आपला अंदाज १००% खरा ठरल्याचा आनंद तिला होईल
२. आपला नवरा अगदीच "हा" आहे असं इतरांनी म्हणू नये म्हणून ती मोलाच्या टीप्स देईल

करून बघा आणि परिणाम इथं लिहा

किके, अहो हे म्हणजे पोलिसालाच चोरी कशी करू विचारण्यासारखे आहे.
काही न करताच शिक्षा मिळायची.
ना खुदा ही मिला ना विसाले सनम, ना इधर के रहे ना उधरके रहे असे व्हायचे. Sad

Biggrin

आमच्या ह्यांना का बिघडवता म्हणून लेखकाला बरेच धमकीचे इमेल्स आलेत. Sad
( इथं बरेच आयडी रोमात का असतात ते कळ्ळं ना ?) Proud

आमच्या परिचयात एक अति गबाळ, शामळू असे रिटायर झालेले आजोबा होते (ते इथे मायबोलीवर येत नाहीत.. उगाच गैरसमज नको)... ते युरोपात.. तिथे एक आणि पुण्यात एक विबासं ठेऊन होते (त्यांच्या सुनेने सांगितलेली माहीती)..
त्यांचा पत्ता देऊ का मार्गदर्शनासाठी.. Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

मित्रांनो

धन्यवाद. इथं केलेली गंमत आपण सर्वांनी एन्जॉय केली. निषेधसभा, चलेजाव आंदोलनं झाली नाहीत याचं सर्व श्रेय आपल्या सहनशक्तीला. Happy आता गंमत आटोपती घेतो.

( एक वय असतं. त्या वयात विरूद्धलिंगी व्यक्ति>शी चांगले संबंध प्रस्थापित झाले, सुसंवाद घडले, मैत्री झाली, विचारांना योग्य दिशा मिळाली तर पुढे विबासं वगैरे गोष्टींमधे रस राहत नाही या नोटवर थांबूयात.... )

<< करून बघा आणि परिणाम इथं लिहा >> सावधान ! " तुम्हाला मी दिलीय ना गाठून ती अप्सरा ! जा आतां तिच्याकडेच !! ", हे जर सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या बिछान्यापर्यंत रोज आयुष्यभर ऐकायचं असेल तरच हे करून बघा !! Wink
शिवाय, असं केल्याने "चोरी, चोरी" "छुपके, छुपके" हे मुख्य आकर्षणच गायब कीं !! Wink
[ शहाणपण स्वानुभवावरूनच शिकतां येतं असं नाही ; निरिक्षणावरूनही कांही निश्चित अंदाज बांधता येतात ! ]

>>पुढे विबासं वगैरे गोष्टींमधे रस राहत नाही
ह्म्म्म्म, आता थांबू म्हणताय म्हणुन
नाही तर मगाशी मी लिहिलेल्या माणसाचा तर प्रेमविवाह झालेला.
दोघे अगदी पाळण्यात असल्यापासुन एकमेकांना ओळखत होते.
तरी या बाबाला विबासं मधे रस आहे. Happy
असो, इति लेखनसीमा !

किरणजी विबासं जुळवण्यासाठीपण काही टिप्स द्या. स्त्री पुरुष दोघांनापण उपयोगी पडतील . अर्थात तेपण वाचायला मजेदार असेल
हे मात्र मान्य आहे बघा, उपयोगी पडेल कुठेतरी !
Happy

पण पुरुष जेंव्हा विबासं ठेवणार तेंव्हा ते एका स्त्रीशीच ठेवणार ना? म्हणजे प्रत्येक प्रकरनात जित्के बापे तितक्याच बाया... ( यात फक्त स्ट्रेट लोकांचाच विचार केलेला आहे. नाहीतर आकडेवारी बदलू शकते.)

", एखादं चायनीज मॉडेल खरेदी करा. त्यात फेक व्हॉईस नावचं सॉफ्टवेअर असतं. त्यातला मॅच्युअर्ड मेल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि निर्धास्त रहा."
रॉफल!

खूपच उशीरा वाचला..... पण पुढे मागे उपयोगी पडेल बहुतेक.. Wink

किरण्यके..... जरा अधिक तपशीलात शिरा, वरील माहिती त्रोटक वाटतेय. लेव्हल १ डन... Proud

आता लेव्हल २ वर जरा प्रकाश टाका. Wink

मुळ लेख जरा कमी वाटला, किरण्यके!
(अविवाहीत असण्याचा परिणाम असावा)

पण इथे आलेल्या प्रतिसादांनी चांगलीच करमणुक झाली. Happy

भुंग्या लेवल २ तुच प्रकाशीत कर्....'विबासं शिका - लेवल२'.

अप्रकाशित करण्याची सोय होती तेव्हां सत्यजित यांच्या सूचनेवरून (शटर डाऊन) आणि तेव्हां वाटलेलं म्हणून हा लेख अप्रकाशित केला होता. आता माबोवर रूळल्यावर वाटतंय.. यात काहीच झणझणीत नाही Lol

सबब - पुनःप्रकाशित ( संयुक्त गटाच्या कल्पनेला पुनःश्च उजाळा Proud )

मी तर म्हणतो कि विबासं असेल तर बायकोची आणि बायको असेल तर विबासं ची गम्मत आहे.......असो....या वर प्लिज कोणी कीस (म्ह्णजे मराठी कीस बर का...) पाडू नका....विषय मस्स्त आणि "जवळचा" वाटला म्हणून आपलं काही तरी आपलं बोलतोय्......कै च्य कै म्हणतात ना ते...ते... Happy

Pages