फक्त पुरूषांसाठी : विबासं जमलय का ? मग हे अवश्य वाचा. ( अल्पवयीन व सज्जन यांना प्रवेश निषिद्ध)

Submitted by Kiran.. on 24 May, 2011 - 16:09

अभिनंदन !

इथपर्यंत पोहोचलाय याचा अर्थ तुमचं जमलय कुठंतरी. ( आकडे सांगू नका :फिदी:)
विबासं मधे नवीन असल्याने ( असणारच) काही काळजीही घ्यायची असते हे तुमच्या गावीही नसणार. जसा पहिला खून केल्यावर खुनी घटनास्थळी येतो आणि पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकतो अशा चुका होणे स्वाभाविक आहे.

या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुचवत आहे.

१. विबासंग्रस्त पुरूष एकटेपंणात आनंदी दिसतो तर बायकोसमोर त्याला गिल्टी वाटत राहत. हे भाव बायकोच्या नजरेतून सुटणं कठीणच. संशयाची सुई फिरायला हे पहिलं कारण ठरू शकतं. तेव्हा नॉर्मल रहा. ( आधी कसे होतात हे आठवून पहा)

२. विबासं जमल्यापासून नवरा अत्यंत प्रेमळ होऊ लागतो. अचानक झालेल्या या परिवर्तनाने बायको खूष होईल असा तुमचा अंदाज असेल तर बायकोला तुम्ही अद्याप ओळखलेले दिसत नाही. इथच तुम्ही फसणार. तुमच्या या परिवर्तनाने बायकोला आता शंका येऊ लागते.

३. विबासंपात्रास काही भेटवस्तू दिली असेल तर मन खात राहतं. अशा वेळी बायकोलाही एखादी साडी घेऊन परिमार्जन करावं असे तीव्र विचार मनात येऊ लागतात. ही सगळ्यात मोठी घोडचूक होय. न विचारता साडी, ड्रेस आणून दिल्यास प्रकरण शंका किंवा संशय इथपर्यंत मर्यादित राहत नाही.

४. वरील तिन्ही काळज्या घेतलेल्या नसल्यास आता तुमच्यावर बारीक लक्ष असल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही हँगरला अडकवलेल्या शर्टाचा वास घेणे, कुठे लांब केस दिसतोय का याची तपासणी करणे असे उद्योग एव्हाना घरात सुरू झालेच असतील. कदाचित तुमचा कुत्रा एकवेळ गंडेल पण बायको तुम्हाला हल्ली कुठला सेंट मारता असा प्रश्न विचारल्याशिवाय रहायची नाही. तेव्हा विबासंपात्रास मला सेंट, लिपस्टिक आणि नेलपॉलिशची अ‍ॅलर्जी आहे असं सुचवून पहा.

५. घरी येण्याच्या वेळा बदलेल्या असतील तर फोन बंद ठेवू नका. बायकोचे फोन आले तर कट करण्याची चूक करू नका. त्याऐवजी, एखादं चायनीज मॉडेल खरेदी करा. त्यात फेक व्हॉईस नावचं सॉफ्टवेअर असतं. त्यातला मॅच्युअर्ड मेल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि निर्धास्त रहा.

६. अमक्या मित्राकडे गेलो होतो, हा भेटला वगैरे फालतू कारणात प्रतिभा वाया घालवू नये. त्याऐवजी आपलं आर्थिक गणित बिघडलय, त्यामुळं मी एमएलएम करायचं ठरवलय. रोज दोन तास तर द्यावेच लागतील असं सांगा. हे कारणही पटेलच असं काही नाही. पण मित्रांकडे चौकशी होऊन तोंडघशी पडण्यापेक्षा हा सुरक्षित उपाय आहे.

७. अचानक टापटीप रहायला सुरूवात झाल्याने विचारणा होईलच. त्यालाही अनु. क्रम ६ हेच उत्तर लागू पडते. एका दगडात दोन पक्षी !

८. एव्हढं करूनही तुम्ही पकडले जाणारच आहात. कसं ते नाही सांगता येत. कारण इथपर्यंतच्या खबरदा-या "मित्राच्या" अनुभवावरून दिलेल्या आहेत. त्याच्याकडून काय राहीलं हे अनुभवींनी नमूद करावं आणि इच्छुकांना लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती.

कळावे

आ. ज्येष्ठ समाजसेवक
किरण हजारे

गुलमोहर: 

मायबोलीवर विबासं शब्द वाचला त्याचा अर्थ गुगलवर शोधताना हा लेख हाती लागला. बऱ्याच वर्षापूर्वी लिहिलेला दिसतोय. पण फारच उथळ आणि उगच गम्मत म्हणून लिहिलंय बहुतेक लेखकानं. प्रत्यक्षात संसार मोडलेले पाहिलेत अशा गोष्टींमुळे. पण विशेष हणजे तरीही जे करू पाहतात ते तरीही करतातच. एक प्रतिक्रिया वाचली --- लग्न ही एक मानवनिर्मित अनैसर्गिक संस्था आहे -- ती पटली. विबांस कसे जमवावेत यासाठी हे लिखाण नाही. खरेतर ते सांगूनही होत नाही. केमिस्ट्री आहे. पण त्यासाठी लागणारी वैचारिक पोच तुमच्यात नसेल तर त्यांनी हे असले काही करू नये. लेख पुस्तके वाचून त्यानुसार काळजी घेणे हे सगळे हास्यास्पद प्रकार आहेत. अशा गोष्टींचा आधार वाटत असेल तर बेटर नादाला लागू नका. संसार मोडेल बाकी काही नाही.

भारतात राहा.किमान 9 तास नोकरी करा.किमान दीड तास ट्राफिक मध्ये काढा.घरी आल्यावर अचानक कांदे पूर्ण संपले किंवा गिरणी उद्या बंद म्हणून दळण आणायला जा.आल्यावर बदललेले कपडे काढले तिथेच ळ आकारात टाकले म्हणून स्वतःचा नवरा/मुले यांना चार शब्द ऐकवा.नवरा असलात तर तुमच्या चॉईस प्रमाणे वाय फाय बिल भरले नाही/रिमोट जागेवर नाही/गाडी मेन स्टँड ला लावली नाही म्हणून चार शब्द ऐकवा.झोपण्याच्या पूर्वी मुलांचे होमवर्क, वर्गातील टमक्याने टप्पल मारली आणि मॅडम मलाच ओरडल्या वाल्या तक्रारी ऐकून कौंसेलिंग करा.उद्या ऍक्टिव्हिटी मध्ये वाळक्या फुला पानांचे आर्ट कागदावर करून घ्यायचे आहे हे 10.30 ला ऐकून सोसायटीत फुलं पानं शोधायला बाहेर पडा. फुलं आणि कळ्या सर्व आबा आज्यानी आधीच पिशवीत भरून पूजेला नेल्याने मिळणार नाहीत.युनिफॉर्म आणि 2 सारख्या रंगाचे मोजे जागेवर आहेत का बघा.उद्याच्या डब्या साठी भाजी तयारी करा.हे सगळं करून स्टेशनरी पोझिशन वर आल्यावर व्हॉटसप उघडा.एक दोन ग्रुप वर वाद घाला.बायको किंवा नवर्याला ऑफिस मध्ये आज त्या कुत्र्याने माझं चांगलं प्रपोजल कसं मूर्खांत काढलं म्हणून सुख दुःखाच्या चार गोष्टी करा.सकाळी 6.3० पासून परत हेच टाइम टेबल रिपीट मारा.
बघूया शनी रवी विबास करता की घरी लोळून किंवा खाऊन पिऊन वेळ घालवता ते ☺️☺️☺️☺️☺️
(हे स्त्री पुरुष दोघांना लागू).

Pages