फक्त पुरूषांसाठी : विबासं जमलय का ? मग हे अवश्य वाचा. ( अल्पवयीन व सज्जन यांना प्रवेश निषिद्ध)

Submitted by Kiran.. on 24 May, 2011 - 16:09

अभिनंदन !

इथपर्यंत पोहोचलाय याचा अर्थ तुमचं जमलय कुठंतरी. ( आकडे सांगू नका :फिदी:)
विबासं मधे नवीन असल्याने ( असणारच) काही काळजीही घ्यायची असते हे तुमच्या गावीही नसणार. जसा पहिला खून केल्यावर खुनी घटनास्थळी येतो आणि पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकतो अशा चुका होणे स्वाभाविक आहे.

या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुचवत आहे.

१. विबासंग्रस्त पुरूष एकटेपंणात आनंदी दिसतो तर बायकोसमोर त्याला गिल्टी वाटत राहत. हे भाव बायकोच्या नजरेतून सुटणं कठीणच. संशयाची सुई फिरायला हे पहिलं कारण ठरू शकतं. तेव्हा नॉर्मल रहा. ( आधी कसे होतात हे आठवून पहा)

२. विबासं जमल्यापासून नवरा अत्यंत प्रेमळ होऊ लागतो. अचानक झालेल्या या परिवर्तनाने बायको खूष होईल असा तुमचा अंदाज असेल तर बायकोला तुम्ही अद्याप ओळखलेले दिसत नाही. इथच तुम्ही फसणार. तुमच्या या परिवर्तनाने बायकोला आता शंका येऊ लागते.

३. विबासंपात्रास काही भेटवस्तू दिली असेल तर मन खात राहतं. अशा वेळी बायकोलाही एखादी साडी घेऊन परिमार्जन करावं असे तीव्र विचार मनात येऊ लागतात. ही सगळ्यात मोठी घोडचूक होय. न विचारता साडी, ड्रेस आणून दिल्यास प्रकरण शंका किंवा संशय इथपर्यंत मर्यादित राहत नाही.

४. वरील तिन्ही काळज्या घेतलेल्या नसल्यास आता तुमच्यावर बारीक लक्ष असल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही हँगरला अडकवलेल्या शर्टाचा वास घेणे, कुठे लांब केस दिसतोय का याची तपासणी करणे असे उद्योग एव्हाना घरात सुरू झालेच असतील. कदाचित तुमचा कुत्रा एकवेळ गंडेल पण बायको तुम्हाला हल्ली कुठला सेंट मारता असा प्रश्न विचारल्याशिवाय रहायची नाही. तेव्हा विबासंपात्रास मला सेंट, लिपस्टिक आणि नेलपॉलिशची अ‍ॅलर्जी आहे असं सुचवून पहा.

५. घरी येण्याच्या वेळा बदलेल्या असतील तर फोन बंद ठेवू नका. बायकोचे फोन आले तर कट करण्याची चूक करू नका. त्याऐवजी, एखादं चायनीज मॉडेल खरेदी करा. त्यात फेक व्हॉईस नावचं सॉफ्टवेअर असतं. त्यातला मॅच्युअर्ड मेल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि निर्धास्त रहा.

६. अमक्या मित्राकडे गेलो होतो, हा भेटला वगैरे फालतू कारणात प्रतिभा वाया घालवू नये. त्याऐवजी आपलं आर्थिक गणित बिघडलय, त्यामुळं मी एमएलएम करायचं ठरवलय. रोज दोन तास तर द्यावेच लागतील असं सांगा. हे कारणही पटेलच असं काही नाही. पण मित्रांकडे चौकशी होऊन तोंडघशी पडण्यापेक्षा हा सुरक्षित उपाय आहे.

७. अचानक टापटीप रहायला सुरूवात झाल्याने विचारणा होईलच. त्यालाही अनु. क्रम ६ हेच उत्तर लागू पडते. एका दगडात दोन पक्षी !

८. एव्हढं करूनही तुम्ही पकडले जाणारच आहात. कसं ते नाही सांगता येत. कारण इथपर्यंतच्या खबरदा-या "मित्राच्या" अनुभवावरून दिलेल्या आहेत. त्याच्याकडून काय राहीलं हे अनुभवींनी नमूद करावं आणि इच्छुकांना लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती.

कळावे

आ. ज्येष्ठ समाजसेवक
किरण हजारे

गुलमोहर: 

Rofl मस्त मुद्दे.

यातले बरेचसे प्वाईंटस 'पति, पत्नी और वो' आणि 'रंगबिरंगी' या चित्रपटांनी व्हिज्युअली प्रूव्ह करून दाखवलेत.

इथपर्यंतच्या खबरदा-या "मित्राच्या" अनुभवावरून दिलेल्या आहेत. >>>>:D जसे वेंपणाचे किस्से मित्राच्या नावावर खपवले जायचे तसे आता हे पण... Proud

एकदा एका बाईला नवर्‍याच्या शर्टवर लांब केस सापडतो. मग संशय, चिडचिड, रडारड, इ.
नवरा म्हणतो तुझाच केस असेल तरी संशय कायम.
मग एक दिवस कमी लांब केस सापडतो, आता संशय असा की बॉयकट केलेल्या मुलीबरोबर विबासं असणार.
मग बरेच दिवस केस सापडतच नाही, तर संशय असा की टक्कल असलेल्या मुलीबरोबर विबासं असणार. Proud

अत्यंत उपयुक्त माहिती. विशेषतः चायनीज फोन संबंधी. Wink

एक खबरदारी राहिलीच की. विबासंपात्राला समस / फोन करण्याच्या वेळा ठरवुन द्या. शक्यतो ते नांव एकाद्या पुरुषाचे म्हणुन स्टोअर करा. (हे देखिल मित्राच्या अनुभवावरुन) Proud

Happy

भ्रमर, तुझ्या सुचना वाचुन "गेला माधव कुणीकडे" ची आठवण झाली.
मेडिकल स्टोअर्सची नावे आणि उद्धव कोंबडे Happy

शक्यतो ते नांव एकाद्या पुरुषाचे म्हणुन स्टोअर करा. >>> छ्या हा फारच जुना बालीश उपाय झाला ...बायका लगेच पकडतात हे आजकाल ...जेन्युईन उपाय सुचवा Proud

भन्नाट Happy

टायटल वाचुन आधी मला 'विबासं' काय ते क्लिक नाही झाल म्हणुन मी लेख ऊघडला मंग समद समझ्या ... विवाह बाह्य संबंध Happy

पुरूषाच्या नावाने, विबासं पात्राच नाव स्टोअर केल आणी एखादे दिवशी फोन बायकोने ऊचलला तर!!! घंटा नाही का वाजणार चांगली, तीकडुन बाईचा आवाज एकुन..... त्यापेक्षा डेजीगनेशन (like MB Manager) ने नंबर स्टॉअर करायचा MB for Mumbai Branch Wink .....हे मला आत्ताच सुचलेल, ते टाकलय Happy

आणी हो बायको UTV वर येणार्‍या शो बद्दल वा असल्या प्रकारच्या कार्यक्रमां बद्दल बोलु लागली की तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे हे लक्षात घ्याव... माझी मैत्रीण नेहमी तीच्या नवर्‍याला "आज कोणत्या चायनल वर कस कॅमेरा मॅन मागे लावुन बॉयफ्रेंड चिट करतोय ते पकडल" वै किस्से सांगत असते... तो बिचारा वैतागतो, कधी तीने त्याच्या मागे कुणाला कॅमेरा घेऊन सोडल तर!!! Happy

भ्रमर | 25 May, 2011 - 10:48 नवीन
बायका लगेच पकडतात हे आजकाल >> नाही पकडत

>>>>> नाही पकडत तीचा / त्यांचा नंबर दे की Wink Proud

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

अचानक टापटीप रहायला सुरूवात झाल्याने विचारणा होईलच.
--- ``कामावर एव्हढे टापटीप जायची काहीच अवशक्ता नाही आहे`` असा आदेश आमच्याकडे आहे.. Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

असे सार्वजनिक बाफ वर लिहून सगळींच भांडी फोडून टाकलीत की. निदान, "संयुक्त" गट तरी स्थापन करायचा आणि त्यावर मेंबरशिप बाय इन्वीटेशन ओन्ली, असे लिहायचे.. मग तिथे असले (अन काय्काय ) लिहिता आले असते.

आयला एवढी डोकेफोड करण्यापेक्षा आपापल्या बाय्कोशी एकनिष्ठ रहा ना.
ना कोई टेन्शन्.....मस्त लाईफ.... कसे ......

आयला एवढी डोकेफोड करण्यापेक्षा आपापल्या बाय्कोशी एकनिष्ठ रहा ना
ना कोई टेन्शन्.....मस्त लाईफ.... कसे ...... >> :ग्रेट.. ग्रेट.... खरचं..
अण्णा, मोहीम पुर्ण झाली, साक्षात स्वतः अवतिर्ण झाले आहेत हे.. धन्य झालो ..आता शटर खाली घ्या.
:आनंदश्रु ओघळता चेहरा: Happy

आयला एवढी डोकेफोड करण्यापेक्षा
---- साकेत पण सर्वां साठी डोकेफोड नसेल तर? Happy

असे सार्वजनिक बाफ वर लिहून सगळींच भांडी फोडून टाकलीत की. निदान, "संयुक्त" गट तरी स्थापन करायचा >>>>> Biggrin

दिनेशदा... "संयुक्त" लय भारी... वॉट अ‍ॅन आयडिया सरजी !

Pages