चॉकलेट नेस्ट अँड इस्टर एग्ज केक रेसिपी

Submitted by लाजो on 25 May, 2011 - 00:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक http://www.maayboli.com/node/25452

IMG_0338.jpg

केक करता साहित्य:

१५० ग्रॅम (@ १ कप) मैदा - २ वेळा चाळुन
४५० ग्रॅम (@ ३ कप) सेल्फ रेसिंग फ्लार - २ वेळा चाळुन,
२ कप बारीक साखर (पिठी साखर नाही),
३०० ग्रॅम सॉफ्ट अन्सॉल्टेड बटर,
१ + १/४ कप दुध
६ अंडी
व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा इसेंस आवडीप्रमाणे

सजावटीकरता:

चॉकलेट बिस्किट्स,
बटर आयसिंग http://www.maayboli.com/node/17973
कोकोपॉप्स
चॉकलेट एग्ज आणि पिल्लं

क्रमवार पाककृती: 

केक:

पूर्वतयारी:

- केकटीनला बटर लावुन ग्रीस करुन घ्या. त्यावर थोडा मैदा भुरभुरवा आणि तळाला बेकिंग पेपर लावुन घ्या.
- ओव्हन १८० डिग्री तापमानाला तापत ठेवा.

कृती:

१. चाळलेले मैदा आणि सेरेफ्ला + साखर + मऊ बटर एका मोठ्या मिक्सिंग बोल मधे घाला.
२. ६ अंडी + दुध हातानेच हलके मिक्स करुन घ्या. यातच व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट/इसेंस घाला.
३. अंड्याचे मिक्श्चर मैदा+साखरेच्या मिश्रणात हळुहळु ओता आणि इलेक्ट्रिक बिटर्/हँड मिक्सर ने लो स्पीडवर अर्धा मिनीट मिक्स करा.
४. सगळे मिश्रण एकत्र झाले की मिडियम स्पीडवर २ मिनीटे फिरवा. मिश्रण हलके आणि स्मूथ झाले पाहिजे. सगळे बटर नीट मिक्स व्हायला हवे.
५. मिश्रण टीनमधे ओतुन ४५-५० मिनीटे बेक करा.

सजावटीसाठी:

१. बेसिक बटर आयसिंग तयार करुन घ्या http://www.maayboli.com/node/17973

असेंब्ली:

१. थंड झालेल्या केकचा वरचा फुगलेला भाग कापुन फ्लॅट बेस करुन घेतला.

IMG_0329.jpg

२. केकच्या साईड्सना बटर आयसिंग लावुन कोकोपॉप्स्/चुरमुरे दाबुन चिकटवले.
३. केकच्या निमुळत्या साईड्स्वर आयसिंग लावुन त्यावर चॉक फिंगर बिस्कित्स चिकटवली.
४. वरच्या सपाट भागाला आयसिंग लावुन त्यावर कोकोपॉप्स चिकटवले.

IMG_0332.jpg

५. तयार नेस्ट थोडावेळ फ्रिज मधे ठेवले. त्यामुळे आयसिंग घट्ट होऊन कोकोपॉप्स, बिस्किटे केकला नीट चिकटली.

IMG_0333.jpg

६. तयार नेस्ट ट्रेवर ठेउन बाकीची सजावट केली.

IMG_0348.jpgIMG_0335.jpgIMG_0336.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढा :)
अधिक टिपा: 

१. केकचे बॅटर तयार झाल्यावर मी त्यातले थोडे बॅटर बोलमधे वगळले व त्यात मेल्टेड चॉकलेट घातले. हे चॉकलेटी मिश्रण टीनमधे शेवटी घातले व मेटल स्क्युअरने थोडा स्वर्ल इफ्फेक्ट दिला आणि चॉक व्हॅनिला केक केला.

मी साईड्ससाठी कोकोपॉप्स आणि चॉकलेट बिस्किट्स वापरली आहेत. ती नसतिल तर -

१. कुकिंग चॉकलेट मायक्रोवेव्हमधे किंवा डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करुन घ्या.
२. मेल्टेड चॉकलेट्मधे चुरमुरे घोळवुन बेकिंग पेपरवर वाळत ठेवा.
३. चॉक फिंगर बिस्किट्स नसतिल तर साधी बिस्किटे मोडुन चॉकलेट मधे कोट करुन वापरता येतिल. फक्त नेस्टचा इफेक्ट वेगळा येइल.

माहितीचा स्रोत: 
केकची पाकृ बेकिंग च्या मासिकातुन. सजावटीची आयडिया माझीच.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ रोचिन, अगं नाव वगैरे वेगळ कहि नाही. टीनचा शेप थोडा वेगळा आहे. मी घरी गेले की फोटो टाकेन.

धन्स साधना, मामी Happy

ओके!! एक भांड्याचा फोटो टाकण्यापेक्षा असे वेगळ्या शेपची आण्खी भांडी असतील तर त्या सगळ्यांचाच फोटो टाक ना!!!