फक्त पुरूषांसाठी : विबासं जमलय का ? मग हे अवश्य वाचा. ( अल्पवयीन व सज्जन यांना प्रवेश निषिद्ध)

Submitted by Kiran.. on 24 May, 2011 - 16:09

अभिनंदन !

इथपर्यंत पोहोचलाय याचा अर्थ तुमचं जमलय कुठंतरी. ( आकडे सांगू नका :फिदी:)
विबासं मधे नवीन असल्याने ( असणारच) काही काळजीही घ्यायची असते हे तुमच्या गावीही नसणार. जसा पहिला खून केल्यावर खुनी घटनास्थळी येतो आणि पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकतो अशा चुका होणे स्वाभाविक आहे.

या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुचवत आहे.

१. विबासंग्रस्त पुरूष एकटेपंणात आनंदी दिसतो तर बायकोसमोर त्याला गिल्टी वाटत राहत. हे भाव बायकोच्या नजरेतून सुटणं कठीणच. संशयाची सुई फिरायला हे पहिलं कारण ठरू शकतं. तेव्हा नॉर्मल रहा. ( आधी कसे होतात हे आठवून पहा)

२. विबासं जमल्यापासून नवरा अत्यंत प्रेमळ होऊ लागतो. अचानक झालेल्या या परिवर्तनाने बायको खूष होईल असा तुमचा अंदाज असेल तर बायकोला तुम्ही अद्याप ओळखलेले दिसत नाही. इथच तुम्ही फसणार. तुमच्या या परिवर्तनाने बायकोला आता शंका येऊ लागते.

३. विबासंपात्रास काही भेटवस्तू दिली असेल तर मन खात राहतं. अशा वेळी बायकोलाही एखादी साडी घेऊन परिमार्जन करावं असे तीव्र विचार मनात येऊ लागतात. ही सगळ्यात मोठी घोडचूक होय. न विचारता साडी, ड्रेस आणून दिल्यास प्रकरण शंका किंवा संशय इथपर्यंत मर्यादित राहत नाही.

४. वरील तिन्ही काळज्या घेतलेल्या नसल्यास आता तुमच्यावर बारीक लक्ष असल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही हँगरला अडकवलेल्या शर्टाचा वास घेणे, कुठे लांब केस दिसतोय का याची तपासणी करणे असे उद्योग एव्हाना घरात सुरू झालेच असतील. कदाचित तुमचा कुत्रा एकवेळ गंडेल पण बायको तुम्हाला हल्ली कुठला सेंट मारता असा प्रश्न विचारल्याशिवाय रहायची नाही. तेव्हा विबासंपात्रास मला सेंट, लिपस्टिक आणि नेलपॉलिशची अ‍ॅलर्जी आहे असं सुचवून पहा.

५. घरी येण्याच्या वेळा बदलेल्या असतील तर फोन बंद ठेवू नका. बायकोचे फोन आले तर कट करण्याची चूक करू नका. त्याऐवजी, एखादं चायनीज मॉडेल खरेदी करा. त्यात फेक व्हॉईस नावचं सॉफ्टवेअर असतं. त्यातला मॅच्युअर्ड मेल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि निर्धास्त रहा.

६. अमक्या मित्राकडे गेलो होतो, हा भेटला वगैरे फालतू कारणात प्रतिभा वाया घालवू नये. त्याऐवजी आपलं आर्थिक गणित बिघडलय, त्यामुळं मी एमएलएम करायचं ठरवलय. रोज दोन तास तर द्यावेच लागतील असं सांगा. हे कारणही पटेलच असं काही नाही. पण मित्रांकडे चौकशी होऊन तोंडघशी पडण्यापेक्षा हा सुरक्षित उपाय आहे.

७. अचानक टापटीप रहायला सुरूवात झाल्याने विचारणा होईलच. त्यालाही अनु. क्रम ६ हेच उत्तर लागू पडते. एका दगडात दोन पक्षी !

८. एव्हढं करूनही तुम्ही पकडले जाणारच आहात. कसं ते नाही सांगता येत. कारण इथपर्यंतच्या खबरदा-या "मित्राच्या" अनुभवावरून दिलेल्या आहेत. त्याच्याकडून काय राहीलं हे अनुभवींनी नमूद करावं आणि इच्छुकांना लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती.

कळावे

आ. ज्येष्ठ समाजसेवक
किरण हजारे

गुलमोहर: 

क्युरिओसिटी किल्स कॅट असं म्हणतात बरं का Wink

बाकी सल्ले लय भारीयेत. म्हंजे आता बायकांना विबासंग्रासित नवर्‍याचं नेमकं काय काय तपासायचं हे कळेल. हा साइडइफेक्ट Proud

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

जाहीर मोड - पुरुषांना विबासं ठेवायला उद्युक्त करणार्या या बाफचा तीव्र निषेध. अ‍ॅडमिन तुमचे इकडे लक्ष आहे का???
खासगी मोड -
अरे काय हे सगळीच सिक्रेट फोडून टाकलीत..आता बायकांनी हे वाचलं म्हणजे नविन युक्त्या-प्रयुक्त्या शोधाव्या लागतील. डोकेफोडीत अजून वाढ.... Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

zakki....aho vayakti kuthe...fakt vicharle ki aapala gat konta...? Happy ....aani lihile jyanchya sathi te sodun tumhalach jast kaalaji ...?..

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

<< ( ते विबासंपात्र आहे कि बायको ? ) >> किरण्यकेजी, अर्थात, बायको.
आणि, विबासंवाली 'पात्र' असली तरी विबासंवाल्याना नाही ना ती 'पात्र ' वाटत ! " एवढी सोन्यासारखी सुरेख बायको असताना काय म्हणून लागलाय ग तो त्या अवदसेच्या नादाला !", हे वाक्य नाही ऐकलं कधी ? Wink

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

ढकलपत्रातून आलेला एक सुविचार

प्रत्येकाच्या मनात कुठेतरी
एक बिल क्लिंटन असतो
आपल्या हिलरीबरोबर संसार करताना
मोनिकेच्या शोधात असतो Happy

किरणजी विबासं जुळवण्यासाठीपण काही टिप्स द्या. स्त्री पुरुष दोघांनापण उपयोगी पडतील . अर्थात तेपण वाचायला मजेदार असेल

मध्यंतरी मला एक जण भेटला, अगदी चार चौघांसारखा मध्यमवर्गीय पापभीरू, इ.
वय साधारण उशीराच्या तिशीत (चाळीशीच्या जवळ)
मला म्हणाला आयुष्यात एक विबासं असावा असे सारखे वाटते,
पण कसं आणि कुठे जमवावं तेच कळत नाही. Sad
मला वाटत हे एक प्रातिनिधीक उदा. आहे.
तात्पर्य : लग्न ही एक मानवनिर्मित अनैसर्गिक संस्था आहे.
(नविन वादाचा विषय वाटल्यास वेगळ्या ठिकाणी वाद घालावा)

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की अहो मी वि. झालेल्या मनुष्याबद्दल लिहिले आहे.
तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे अगदी "वाह क्या पते की बात कही है" असा आहे. Happy

Pages