दशकपूर्तीच्या निमित्ताने - ६ ("मंडळ आभारी आहे")

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मंडळ आभारी आहे...

दशकपूर्ती -१

दशकपूर्ती -२ पाऊलखुणा

दशकपूर्ती -३ झलक..

दशकपूर्ती -४ भाकर्‍या..

दशकपूर्ती -५ पार्ले

दशकपूर्तीनिमित्त लिहिलेले वरचे लेख ज्यांनी वाचले, प्रतिसाद दिले, मते कळवली त्या सर्व मायबोलीकरांचे आभार. इतके वेगवेगळे अनुभव जमतील असे व्यापक व्यासपीठ आणि उपक्रमांत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि प्रशसनाचे आभार. असे काही लिहिण्याची कल्पना जेव्हा मी काहींना बोलून दाखवली तेव्हा त्या सर्वांनीच याला पाठिंबा दिला. "यातून काहीतरी चांगलेही व्हायचे तर होईल" (LOL) असेही कोणी म्हटले. त्याबद्दल कल्पना नाही, पण काही नव्यांना जुन्या मायबोलीबद्दल माहिती मिळाली असेल. मायबोलीकरांच्या भेटीगाठी, गटग कशी होतात, काही उपक्रम आणि त्याचे संयोजन याबद्दल कल्पना आली असेल. अगदीच काही नाही तर पार्ल्याचा पत्ता तरी मिळाला असेल! Happy

मला माहीत आहे या लेखनात घटनाक्रम पुढेमागे झाले असण्याची शक्यता आहे, काही तपशील राहून गेले असतील. काहींची नावे राहून गेली आहेत. तरी ही मालिका लिहिताना, सगळं आठवताना मजा आली. काही गोष्टी लक्षात होत्या, काही जुन्यात शोधल्या. संदर्भ तपासताना नवीनच माहितीही हाती लागली... माझे मायबोलीवरचे प्रोफाईल आज सदस्यत्वाचा काळ "१० वर्षं ३ दिवस" दाखवते आहे. दशकपूर्ती झाली आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे कल्लोळाहून आल्यानंतरचा हा शेवटचा भाग.

तसं बरंच काही लिहायचं मनात होतं. "दशकपूर्ती म्हणजे दहा लेख हवेत", "पुढच्या लेखात मायबोलीवरच्या काही खटकलेल्या गोष्टी, किंवा भविष्यातली मायबोली याबद्दल काही लिहाल का" अश्या काही मागण्या/विनंत्या येत होत्या. "खटकलेल्या" म्हणण्यापेक्षा "या गोष्टी अश्या असत्या तर जास्त आवडलं असतं" या भाषेत (म्हणजे न खटकणार्‍या Wink ) काही लिहावं असा विचार आला पण त्या गोष्टी ज्या त्या वेळी संबंधितांना माझ्याकडून सांगितल्या गेल्या आहेतच. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या पसंतीने होईलच असे नाही तेव्हा कधी त्यात बदल झाले, कधी झाले नाहीत.

भविष्यातल्या मायबोलीबद्दल काय बोलावे? फक्त माझा अजून फक्त दहा वर्षांच्या विचार केला तरी सांगता येणार नाही. मला जोवर यावेसे वाटते, आनंद मिळतो तोवर मी येत राहीन. "स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे. पुनःपुन्हा इथे येण्यामागे आणि भाकर्‍या भाजण्यामागे तीच प्रेरणा आहे. यामुळे निगेटिव्ह विचार आपोआप बाजूला रहातात किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळते आणि ते कामाच्या आड येत नाहीत.

चालू घडामोडींकडे बघता एक मात्र वाटते की नजिकच्या भविष्यकाळात प्रत्येक मायबोलीकर कधी ना कधी कुठेतरी तुरुंगवास भोगून येणार! कानून के हाथ लंबे होते हैं! कुठल्यातरी देशातल्या कायद्याचा कुठेतरी बसून भंग केल्याने ते तुम्हाला उचलून त्या देशातल्या तुरुंगात टाकतील. एका वेळी कुठल्यातरी देशाच्या तुरुंगात (एकाच ठिकाणी) अनेक मायबोलीकर असतील त्यांचे "तुरुंग गटग" पण होऊ शकेल. म्हणजे "पुण्यातील बंगू गटग" सारखे "तिहारमधील एन्जे एवेएठी" किंवा "फ्रान्सच्या कारावासातील कल्लोळ". एरवी ड्रेस कोड कोणी पाळत नाही तो इथे आपोआप पाळला जाईल पण मेन्यूची फारशी अपेक्षा ठेवता येणार नाही. याचेही वृत्तांत येतील. "तुमच्यापेक्षा आमचे चांगले", "आम्ही पैले" वगैरे नेहमीचे टोले असतीलच. पण अश्या तुरुंग गटगमध्ये एकत्र असणारे लोक एकाच कारणासाठी, तत्त्वासाठी एकत्र आले असल्याने तेच खरे कंपू म्हणून ओळखले जातील.

दुसरं असं की बरेचसे लेखक/लेखिका 'माहेरी' निघून गेल्यामुळे (किंवा प्रताधिकार उल्लंघनासाठी 'आत' गेल्यामुळे) गुलमोहोरावर अगदीच तुरळक असतील (हे चांगले की वाईट माहीत नाही). "लग्नसंस्थेला रिटायर करा" असे आवाहन (आव्हान) झक्कींनी दिल्यामुळे भविष्यातील मायबोलीवरच्या "कोतबो" ची कल्पना येईल (खरं तर कल्पना करवत नाही हो!) मायबोलीचं सरासरी वय (म्हणजे मायबोलीकरांचं) मात्र वाढत चाललंय असं वाटतंय. माझ्याकडे काही आकडेवारी उपलब्ध नाही (हह?).

असो. 'जे जे होईल ते पहात रहावे..' एवढे लिहून मी माझी ही मालिका संपवते.

धन्यवाद.

विषय: 
प्रकार: 

शेवट हृद्य आणि चोख झाला आहे ..

छान झाली मालिका .. मला वाचायला आणि त्यानिमित्ताने ते सगळे दिवस पुन्हा जगायला मजा आली .. Happy

एका वेळी कुठल्यातरी देशाच्या तुरुंगात (एकाच ठिकाणी) अनेक मायबोलीकर असतील त्यांचे "तुरुंग गटग" पण होऊ शकेल. म्हणजे "पुण्यातील बंगू गटग" सारखे "तिहारमधील एन्जे एवेएठी" किंवा "फ्रान्सच्या कारावासातील कल्लोळ". एरवी ड्रेस कोड कोणी पाळत नाही तो इथे आपोआप पाळला जाईल पण मेन्यूची फारशी अपेक्षा ठेवता येणार नाही.>>> Lol

'कोतबो' म्हणजे काय हो? माझ्या लिहील्याने काही बरे वाईट तर होणार नाही ना? आधीच मी लिहीले की बीबी बंद असा पायंडा पडला आहे. पण सगळी मायबोलीच धोक्यात? आधीच सांगा म्हणजे मी हात आखडता घेईन नि फक्त रोमात राहीन.

लालू तुझा हा लेख आणि ही मालिकाही आवडली.
छान लिहीली आहेस पण लवकर संपवल्या सारखी वाटते.

एकदम धमाल Lol
"स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे.>>> प्र..चं..ड अनुमोदन.

छान.
"स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे.<<<
खरंय.

लालुबाई,तुमची पूर्ण लेखमालिका फार आवडली.
मी पण बर्‍याच वर्षांपासून इथे असल्याने (रोमात्,वाचन्मात्र आणि नंतर सदस्या )बरंचसं माहिती आहे इथलं स्थित्यंतर.
त्यात पुन्हा अधे मधे खोदकाम करू करून जुनं- पानं पण बरंच वाचून काढलेलं.
पण तुम्हाला एक गंमत वाटेल्,पार्ल्याचा खरा पत्ता तुमच्यामुळे कळला.
या आधी कित्येक वेळा 'पार्ल्यात हे ठरलं,पार्ल्यात हे झालं,पार्लं भरून वाहिलं' असं इथे तिथे वाचून मी मागची ३-४ वर्षे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण सार्वजनिक पार्ले गाव सापडलं,फोरबिडन सिटी त्यापूर्वी कधीच सापडली नव्हती.
मग पार्ले बहुधा "मायबोली पार्लमेंट" चा शॉर्ट्फॉर्म असेल आणि काही करामती करून तिथे फक्त इथल्या "निळ्या रक्ताच्या सदस्यांनाच" मर्यादित प्रवेश दिला असेल Happy अशी माझी समजूत मी करून घेतली (गणपती अंक्,दिवाळी अंक यांच्या कच्च्या आराखड्याचे स्वरूप तिथेच जास्त डिस्कस होत असे असं बाहेर कुठेतरी कळत असे,त्यामुळे हे पार्लमेंट म्हणजे इथल्या संपादक मंडळाची भेटण्याची गूप्त जागा असंच वाटायचं)

या लेखातील "जेल गटग" चा भाग मस्तच.
संपूच नये असं वाटणारी लेखमालिका संपवलीत.
अजून यापुढे दरवर्षी एकदा मागच्या वर्षाचा आढावा घेणारा लेख नक्की लिहा ही विनंती.

आँ? संपली मालिका?

>> "स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे.

१००% अनुमोदन. Happy

स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे>>>>
हेच एकमेव कारण आहे रोज इथे लॉगीन होण्यामागचं.
छान झाले सगळे लेख. मस्त मालिका. खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
शेवटचे २ परिच्छेद.. खतरा.. Lol

तुरुंग गटग Lol I am wondering, AMBA सारखाच हा मान भारतातल्या मायबोलीकरांना आधी मिळणार की इथे परदेशस्थ मायबोलीकर बाजी मारणार. Proud

तुरूंग गटग :फिदी:. हा खास लालू टच :).
"स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे.>>> या बद्दल अनुमोदन.

गणपती अंक्,दिवाळी अंक यांच्या कच्च्या आराखड्याचे स्वरूप तिथेच जास्त डिस्कस होत असे असं बाहेर कुठेतरी कळत असे>>> हे असे (गैर)समज पार्ल्याबद्दल अनेक असावेत (अजून कुठले गैरसमज असतील तर पार्ल्यात ऐकायला मजा येईल ;)). मला वाटतं म्हणूनच लालूने पार्ल्याबद्दल मुद्दाम लिहीलं.

लालू, छान मालिका आणि स्वतःचे अनुभव सांगितल्याबद्दल आभार.

"स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे.>>>>
अगदी १००% अनुमोदन!

मस्त झाली मालिका. तुमचे अनुभव वाचायला मिळाले.
Happy

पुन्हा अशीच एखादी छानशी मालिका लिहा. नवीन काहीतरी कळेल.

"स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे

हे माझे पण कारण मायबोलीवर येण्याचे. नि कित्येकांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्याशी बोलायला फारच आवडते.

आँ? संपली मालिका?>>>

बाई.. ही मालिका काय तुम्हाला केकता कपूरची वाटली होती की काय.. काहीही घडले तरी चालूच रहायला...

लालू.. मालिका चांगली झालीये.. सगळा आढावा एकदम मस्त..

लालु,तुमची संपूर्ण लेखमालिका फार आवडली.
मी इथे बहुतेक वेळा रोमात असते, त्यामुळे प्रत्येकवेळी प्रतिक्रीया देता नाही आली .
पार्ले पार्ले म्हणतात ते काय , त्याचा पत्ता तुमच्यामुळे मिळाला Happy

तुरुंगच काय थेट! आणखी कल्पनाविलास : त्या तुरुंगात बसून मग मायबोलीकर टिळक नेहरूं सारखे बरच काय काय लेखन करतील आणि सुटून परत आले की इथे साहित्याचे धबधबे सुरू होतील. (पण साहित्यच येईल ते एक बरय! फोटो पासून मात्र वाचतील तेव्हाचे मायबोलीकर :फिदी:)

पुर्वी सारखे मायबोलीकरांचे वय आता प्रोफाईल मधे नसते त्यामुळे सॅम्पल सर्वे करून सरासरी वय वगैरे मला काढता येणार नाही. Wink पण पुर्वी फ्रेन्डशिप सेन्टर, जनरल टाईमपास सारखे बीबी होते जिथे बरीच तरूण जनता पडिक असायची ते सगळे जाऊन आता लहान मुलांचे कार्यक्रम वगैरें जास्त जोरात सुरू असतात त्यावरून मायबोलीकरांचे सरासरी वय २५ वरून ३५ वर गेल्याचे अनुमान काढायला काहीच हरकत नाही. Happy

पण पुर्वी फ्रेन्डशिप सेन्टर, जनरल टाईमपास सारखे बीबी होते जिथे बरीच तरूण जनता पडिक असायची ते सगळे जाऊन आता लहान मुलांचे कार्यक्रम वगैरें जास्त जोरात सुरू असतात त्यावरून मायबोलीकरांचे सरासरी वय २५ वरून ३५ वर गेल्याचे अनुमान काढायला काहीच हरकत नाही.

>> HH, निषेध! :p

सर्व भाग वाचले. काय सुरेख लिहिल आहेस, आणि किती संगतवार आठवतय तुला सगळ. छान वाटलं वाचून.

भाग दोन मध्ये "तेव्हापासून Gs1(जीएस) माझा मित्र आहे." हे वाचल आणि स्क्रीनच धूसर झाला थोडावेळ. खरच, झिपलॉक की कसम Happy

बघता बघता नउ दहा वर्ष झाली की. पहिल अंबा अजून आठवत. आणि तेंव्हापासूनचा अनेकांबरोबर जपलेला जिव्हाळाही.
मध्ये तीन चार वर्ष मायबोलीवर येण खूप कमी झाल होत. तू खूपच छान आठवण करून दिलीस सगळ्यांची. तुझा एकंदर चौफेर वावर असायचा, मध्ये तुझ्याकडे रंगलेल्या जोरदार एवेएठी च वर्णन ऐकून, तेवढ्यासाठी तरी तिकडे असायला हव होत अस वाटल होत.

पुन्हा एकदा धन्यवाद.

Pages