कल्लोळातील उरलेसुरले - २

Submitted by लालू on 21 May, 2011 - 08:28

कल्लोळाचे तीन वृत्तांत आलेतच त्यामुळे गेल्या वेळचेच शीर्षक वापरुन लिहायला हरकत नाही. नंतर अजून काहींच्या नजरेतून, चष्म्यातून आणि किल्लेदार कल्लोळाला हजर असल्यामुळे 'पट्टीआडून' येण्याऐवजी 'आँखो देखा..' येईलच.

माहेरपणाला बोलावल्यामुळे मी निर्धास्त होते. काही फारशी तयारी इत्यादी नव्हती, नुसते हजर रहायचे होते तरी आठवड्याच्या सुरुवातीलाच तब्येत नरमगरम झाल्याने एकदम काळजी वाटायला लागली. मग आराम केला, मग नितीन येतो आहे असे कळल्यावर ड्रायव्हर मिळाल्यामुळे चिंता मिटली. शनिवारी पहाटे तीनलाच जाग आली आणि पाचला उठायचे असल्याने पुन्हा झोपही लागली नाही. शनिवारी सकाळी साडेसहाला मी रुनीकडे पोचले तेव्हापासूनच माहेरपणाला सुरुवात झाली. किन्वा खिचडी, चहा इ न्याहरी करुन आम्ही कॅरीच्या दिशेने निघालो. राहिलेली झोप मी कारमध्ये पुरी केली. त्यामुळे कारमध्ये गप्पा/गॉसिप झाले नाही आणि जीटीजीला सुरुवात कॅरीला पोचण्याआधी झाली नाही.

साडेनऊ-दहाच्या सुमारास आम्ही अंजलीला फोन केला तेव्हा जर्सी मंडळींचा ब्रेकफास्ट चालला होता, अंजलीने फोन स्पीकरवर थेवल्याने सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली त्यामुळे गोंधळात काही नीट ऐकू येईना, अंजलीकडे कल्लोळाची सुरुवात झाली होती..

आम्ही साडेअकराच्या सुमारास अंजलीकडे पोचलो. काही स्थानिक मंडळी सोडल्यास सर्वजण आले होते. ग्रिलवर तोंपासु गोष्टी तयार होत होत्या. त्यातल्या काही गरमागरम पोटात गेल्यावर बरे वाटले. योगीबेअरने 'मी योगेश' अशी मी गेल्यागेल्याच ओळख करुन दिली. मी स्वतःची करुन दिली नाही. खालिद, दैत्य, सौ दैत्य इ. नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. सौ दैत्य या अ‍ॅटलांटाकर मिनीसारख्या दिसत होत्या असं मला आणि रुनीला वाटलं. त्यांच्याकडे बघून मिनीची आठवण येत होती. मोहना, शिल्पा, मधुरिमा भेटली. मधुरिमा (सुमॉ) सुगृहिणी आहे हे नंतर कळलेच. मला ती तिच्या काही कथांमधल्या सोज्ज्वळ नायिकांसारखीच वाटली. Light 1

बुवांनी प्यायला पुदिना घातलेला सोडा आणून दिला. तो फारसा पसंत न पडल्याने दुसरे ड्रिन्क बनवण्याच्या आधी नितीनला सॅम्पल दिले ते त्याने फार स्ट्रॉन्ग आहे असे सांगितले. त्या फीडबॅकवर दुसरा लॉट बनवून दिला त्यात मी लिंबू, मीठ घालून घेतल्यावर ते चांगले लागले. पनीर, तंदुरी, व्हेज कबाब मस्तच होते. एवढं खाल्य्यवर लगेच कोणाला जेवणाची आठवण झाली नाही, मग गप्पा आणि सां. का. सुरु झाले.

पार्ल्यावरचा लेख मवाळ झालाय याबद्दल तिथे मला लोकांनी धारेवर धरले. (पण नंतर लोक तसे म्हणत असले तरी मला लेख आवडला असे काहींनी येऊन सांगितले.) पार्ल्याची अ‍ॅड्मिन झालीस का नाही असं कोणीतरी विचारलं तर मी 'नाही' म्हटलं आणि वेमांना सांगितलं तेवढं करुन टाका तेव्हा त्यांनी मान हलवली ('हो' की 'नाही' ते नक्की कळले नाही). आणि अजून कोणाला व्हायचे आहे पार्ल्याचे अ‍ॅडमिन असे विचारले तर कोणीच काही बोलले नाही. Proud (एकापेक्षा जास्त लोकांना होता येते हे माहीत नसावे.) नंतर रात्री योगीबेअर भविष्य सांगत होता तेव्हा त्यालाही मी विचारले की मी पार्ल्याची अ‍ॅडमिन होईन का, यावर त्याने ते असे सांगता येणार नाही, अ‍ॅड्मिन, वेमांचा हात पहावा लागेल असे सांगितले.

बाई, शोनू यांच्या सां का सोबत तिथे 'चालवा डोकं' कार्यक्रमही झाला. याबद्दल सांगावे की नको या विचारात होते. असलं काही करावं लागत असेल तर यापुढे लोक येताना विचार करतील अशी भीती वाटली. श्री. सुमंगल यांनी "२०, ४०, ६०, ८०. १००" अश्या वस्तू ५ भावांना दिल्या आणि त्यांनी त्या एकाच दराने विकून सारखेच पैसे आणले तर ते कसे? हे गणित घातले. कागद पेन नसल्याने हे कोणी सोडवले नाही पण श्री सुमंगल यांनी क्लू दिला. खालिदने ६२-६३=१ हे समीकरण एकच संख्या वा चिन्ह हलवून बरोबर करुन दाखवायला सांगितले. थोडा विचार केल्यावर मी 'घात करा, घात करा' म्हटले तर मी नेहमीप्रमाणे कोणालातरी 'ठोका, बडवा' म्हणतेय असे वाटून कोणी लक्षच दिले नाही. खालिद मात्र हसत होता. वेमांनी पांढरे प्लास्टिकचे आणि काही स्टीलचे चमचे वापरुन जमिनीवर काही सांकेतिक भाषेत आकडे तयार केले. ते ओळखून दाखवायचे होते. 'की' कळल्यावर ते उत्तर १ ते १० च्या मध्ये आणि पूर्णांक असणार होते हे कळले त्याआधी नितीनचे उत्तर एकदा साडेअकरा आले होते..

सुमंगल यांनी तयार केलेले एक गाणे त्यांच्या 'ह्यांच्या' सोबत म्हटले,

ए गोरी गोरी नार तुझे नाव काय
माझ्या नावाशी तुला रे करायचं काय
अमक्या तमक्या गावी तुला जायचे हाय
अमक्या तमक्या गावी नकोरे बाबा अमूक तमूक ची भीती वाटते..

यात हवे ते गावाचे (किंवा माबोवरच्या बाफचे) नाव आणि तिथल्या भीतीदायक गोष्टी/लोक घालू शकता.

मग कधीतरी अंजलीने सगळ्यांना जेवायची आठवण करुन दिली. चिकन करी, दहीवडे, बिर्याणी अजून काय काय.. त्या नंतरच्या ड्रिन्कचा उशीराने इफेक्ट सुरु झाला असावा कारण त्यानंतर संध्याकाळपर्यंत काय केले ते मला आठवत नाही. मध्येच एकदा सगळेजण बाहेर पावसात भिजत आहेत असे काहीतरी आठवते पण तो आपण वर्षाविहाराला गेलोय असा भास झालेला असू शकतो.

संध्याकाळी मधुरिमाकडे गेलो. भूक नसणार आहे, फार काही करु नको सांगूनही तिने बरेच काही केले होते आणि आम्ही ते बरेच काही बरेच खाल्ले! तिथे नाना नेने भेटले. त्यांना पार्ल्यात यायचे आमंत्रण (अर्थातच) दिले. सुमंगल मंडळी मधुरिमाकडे राहिली आणि आम्ही बाकी सर्वजण अंजलीकडे परत आलो. सुमंगलनी एक मेंदीचा कोन दिला होता, मग अंजलीनेही तिने भारतातून आणलेले कोन काढले आणि पुन्हा गप्पा सुरु झाल्या. वेमा मुलांसोबत रेण्वीय प्रयोगांत गुंतले होते, नंतर तेही आले.

खालील काही विषयांवर गप्पा झाल्या-

१. शनिवारी तेल का आणत नाहीत.
२. भविष्य वर्तवणे शक्य आहे का
३. psychic power असते का
४. वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टींसाठी करणी करता येते.

खोलीत ढेकूण झाले तर खोलीकडे न पाहता 'ढेकूण गेले का' असा प्रश्न विचारल्यावर 'हो' असे उत्तर दिले की ते जातात असे समजले. ढेकूण म्हणजे 'उपद्रव'. त्यामुळे नंतर पार्ल्यात लोक हा प्रश्न विचारु लागले. पण तो तिथे विचारुन इफेक्त होईल की पार्ल्याकडे न पहाता म्हणजे बारा किंव बेकरीत जाऊन विचारला पाहिजे ते अजून कळलेले नाही. मेधाने सांगितले की घरवर आरसा लावला की करणी करणार्‍यावरच ती रिफ्लेक्ट होऊन उलटते. त्याबद्दलही विचार झाला.

योगीला हात दाखवले गेले. पुरुषांचा उजवा, बायकांचा डावा पूर्वी पाहिला जात असे पण आता असे काही नाही असे योगी म्हणाला. मग सर्वांनी उजवेच दाखवले. (डाव्याला मेंदी लावली होती त्यामुळे इलाजही नव्हता).

रेण्वीय पदार्थ खाऊन झाल्यावर आणि १ वाजल्यानंतर मंडळी झोपायला पांगली. पण त्यातही रुमप्रमाणे कंपू तयार होऊन २ पर्यंत गप्पा झाल्या. त्या रात्री ज्यांना झोपेत उचक्या लागल्या त्या सर्वांची "आठवण" काढली गेली असे समजा.

दुसर्‍या दिवशी तशी लवकरच जाग आली. चहा बनवण्याचे एकमेव काम मी केले. सुमंगल निघण्यापूर्वी येऊन गेल्या. मधुरिमाने आठवणीने फोन केला. मसाला, झाडे वाटप इ. झाल्यावर एन्जेकर प्रथम जायला निघाले. "डोटपा" वर्णन दुसर्‍या वृत्तांतात आलेच आहे. अंजलीकडून साडेदहाच्या सुमारास आम्ही निघालो आणि नितीनच्या मित्राकडे लन्च करुन दुपारी डीसीला जायला निघालो. ट्रॅफिकमुळे घरी पोचायला ९ वाजले..

अश्या रितीने अजून एक कल्लोळ पार पडला. परंपरा चालू ठेवल्याबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल अंजलीचे आणि कुटुंबियांचे आभार! सगळे एकाच ठिकाणी राहिले त्यामुळे गप्पांना भरपूर वेळ मिळाला अणि धमाल आली. किती मजा येते याचा कल्लोळ कुठे आहे, किती आणि कोण लोक येतात याच्याशी काहीही संबंध नाही हेच सिद्ध झाले. वसंतसेनेत सामिल झालेले नेहमीच विजयी होणार!

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवांनी प्यायला पुदिना घातलेला सोडा आणून दिला. तो फारसा पसंत न पडल्याने दुसरे ड्रिन्क बनवण्याच्या आधी नितीनला सॅम्पल दिले ते त्याने फार स्ट्रॉन्ग आहे असे सांगितले.>>>>>>> Biggrin
आता माझ्या चष्म्यातून येइल तेव्हा माझी बाजू मी मांडेनच. Proud
योगी, वेबमास्तर, पार्ले अ‍ॅडमीन चर्चा>>>>> Lol

चांगलं लिहिलयस.
घात करा. घात करा.>>> Lol
बुवांनी प्यायला पुदिना घातलेला सोडा आणून दिला. तो फारसा पसंत न पडल्याने दुसरे ड्रिन्क बनवण्याच्या आधी नितीनला सॅम्पल दिले ते त्याने फार स्ट्रॉन्ग आहे असे सांगितले.>>> बुवा जनतेवर कसले कसले प्रयोग करत असतोस रे. Proud

'घात करा, घात करा' म्हटले तर मी नेहमीप्रमाणे कोणालातरी 'ठोका, बडवा' म्हणतेय असे वाटून कोणी लक्षच दिले नाही. >> Lol

Happy
कल्लोळाच्या आठवड्याच्या सुरवातीला लालू बरं नाही म्हणाली तेव्हा थोडी काळजी वाटली, पण लालवाक्का तब्येत नरम गरम असतानाही आल्या.

Happy

चला डीसी, बारा, एनसी वृत्तांत, फिली बुलेटीन आलेले आहेत.
खूप कल्ला केला. मायबोली गटग झाले आणि मजा आली नाही असे होणेच अशक्य.

सगळे एकाच ठिकाणी राहिले त्यामुळे गप्पांना भरपूर वेळ मिळाला अणि धमाल आली. किती मजा येते याचा कल्लोळ कुठे आहे, किती आणि कोण लोक येतात याच्याशी काहीही संबंध नाही हेच सिद्ध झाले. वसंतसेनेत सामिल झालेले नेहमीच विजयी होणार!>>>> धन्यवाद!
पुढचा कल्लोळ होस्ट करायचं कुणी ठरवलय?

सायो पुढचा कल्लोळ कोणी होस्ट करायचा हे अंजलीकडे आधीच ठरले आहे, आता फक्त होस्टांना तसे सांगायचे बाकी आहे. Proud

>> परंपरा चालू ठेवल्याबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल अंजलीचे आणि कुटुंबियांचे आभार! सगळे एकाच ठिकाणी राहिले त्यामुळे गप्पांना भरपूर वेळ मिळाला अणि धमाल आली. किती मजा येते याचा कल्लोळ कुठे आहे, किती आणि कोण लोक येतात याच्याशी काहीही संबंध नाही हेच सिद्ध झाले. वसंतसेनेत सामिल झालेले नेहमीच विजयी होणार!

अगदी अगदी! Happy

किती मजा येते याचा कल्लोळ कुठे आहे, किती आणि कोण लोक येतात याच्याशी काहीही संबंध नाही हेच सिद्ध झाले >> ज्जेबात !