बॉडीबिल्डींग - फिटनेस

Submitted by भूत on 19 May, 2011 - 07:23

बॉडीबिल्डींग- फिटनेस विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) परफेक्ट बॉडी कशी असावी ?
२) लूक्स महत्वाचे की बी एम आय ?
३) आयडीयल बी एम आय किती ?
४) परफेक्ट बॉडी कमवायला किती काळ रेग्युलर व्यायाम करावा लागतो ?
५) व्यायामात कंटीन्युटी आणणे हेच मोठ्ठे आव्हान असते ....ते कसे जमवता येईल ?
वगैरे वगैरे

मुकु कसली चित्रे बघायची आहेत तुला...
आपजिगाच्या कमावलेल्या बॉडीची....
नका रे असे हसवू..कालपासून हसून हसून बरगड्या दुखायला लागल्यात...आता म्हणू नका तो पण व्यायामात अंतर्भूत आहे म्हणून

आशु Biggrin

छ्या : काय राव तुम्ही लोकं ?

२/३ चेहरा दाढीने व्यापला आहे म्हणुन तिकडे उजळ कांती हवी या धाग्यावर बोलता येत नाही
अन
१/३ डोक्यावर उजळ कांती निर्माण व्हायला सुरुवात झालीये म्हणुन केसांचे आरोग्य या धाग्यावर बोलता येत नाही

म्हणुन खास हा धागा काढुन दिला तर इथे ही टीपी ?

छ्या : व्यायाम करायचा कंटाळा समजु शकतो पण व्यायामाविशयी बोलायचाही कंटाळा ...हे जरा जास्तच झाले Biggrin

हाहाहाहा...आपजिगा...समजू शकतो रे तुझ्या भावना...
चल मी जरा गांभिर्याने माहीती द्यायचा प्रयत्न करतो...
मी काही यातला तज्ञ नाही पण जेवढे थोडेफार कळले ते सांगतो..

१) परफेक्ट बॉडी कशी असावी ?
याला तसे काही नियम नाहीयेत..परफेक्ट बॉडीची व्याख्या ही सापेक्ष आहे. कष्टकरी किंवा पैलवानाची परफेक्ट बॉडी आणि एखाद्या धावपटूची परफेक्ट बॉडी यात खूप फरक असतो. त्यामुळे परफेक्ट बॉडी पेक्षा परफेक्ट तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
२) लूक्स महत्वाचे की बी एम आय ?
एक लक्षात घ्या चांगले दिसणे, कमावलेले शरीर दिसणे, बलदंड स्नायू उठून लोकांना त्याचा हेवा वाटणे हे सर्व व्यायामाचे साईड इफेक्ट आहेत. यासाठी म्हणून कोणी व्यायाम करत असेल तर तो व्यायामप्रकाराचा अपमान आहे. (बॉडी बिल्डर हे प्रकरण वेगळे आहे. मी बोलेन त्या बद्दल). व्यायाम हा आपले शरिर तंदुरुस्त रहावे, स्नायू बळकट व्हावेत, अंगात ताकत निर्माण व्हावी आणि उत्साही, ताजेतवाने वाटावे यासाठी करणे आवश्यक आहे. त्यामुळे लूक्सकडे नंतर लक्ष द्या..पहिले बीएमआय. तोही स्वतचा स्वत ठरवू नये..योग्य फिटनेस ट्रेनरला दाखवून त्यांच्याकडून माहीती करून घ्यावा.
३) आयडीयल बी एम आय किती ?
याचे उत्तर मी वरच्या प्रश्नात दिले आहे
४) परफेक्ट बॉडी कमवायला किती काळ रेग्युलर व्यायाम करावा लागतो ?
याचेही उत्तर सापेक्ष आहे. व्यायाम किती काळ करता याला महत्व नाही. तो कशा प्रकारे आणि किती नियमीतपणे करता याला महत्व आहे. जर क्रीडाक्षेत्रात किंवा अन्य काही विशेष प्रयोजन नसेल तर सर्वसाधारणपणे एक ते दीड तास व्यायाम पुरतो. तो ही प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली घेतलेला चांगला.
त्यातही पहिली १५-२० मिनिटे वॉर्मअप आणि शेवटची १५-२० मिनिटे स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेसशन अत्यावश्यक आहे.
५) व्यायामात कंटीन्युटी आणणे हेच मोठ्ठे आव्हान असते ....ते कसे जमवता येईल ?
वगैरे वगैरे
ते संपूर्णपणे तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे

१०० वर्ष आयुष्य आहे ...ह्या धाग्याला Proud

...आत्ताच अंजली मुखर्जीच्या डायेट प्लॅनचे शेड्युल्ड अन अ‍ॅव्हऑईड लिस्ट पहात होतो Happy

एक लक्षात घ्या चांगले दिसणे, कमावलेले शरीर दिसणे, बलदंड स्नायू उठून लोकांना त्याचा हेवा वाटणे हे सर्व व्यायामाचे साईड इफेक्ट आहेत. यासाठी म्हणून कोणी व्यायाम करत असेल तर तो व्यायामप्रकाराचा अपमान आहे. >>>> हे वाक्य बरोबर नाही. चूक आहे ईतपत म्हणण्यापर्यंतही ते बरोबर नाही.

व्यायामाने शरीर बेढब होत असेल तर कोण कशाला व्यायामाच्या नादी लागेल?
लोकांना हेवा वाटेल की नाही हे तुमच्या हातात नाही पण माझं शरीर छानंच दिसावं/असावं अशी अपेक्षा किंवा अगदी अट्टहास सुद्धा बाळगणं ह्यात वाईट किंवा साईड ईफेक्ट म्हणण्यासारखं काय आहे?

तंदूरुस्तीसाठी व्यायाम असा दहापैकी आठ जणांचा गोल असला तर तंदूरुस्तीपेक्षाही शरीर चांगलं दिसण्यासाठी व्यायाम असा दहापैकी दोन जणांचा असूच शकतो ना? त्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही.
एखाद्या सूपरमॉडेलपेक्षा दहा वर्षे कथ्थक करणारी जास्त तंदूरुस्त असू शकते म्हणून त्या मॉडेलचे सुंदर दिसणे आणि त्यासाठी डाएट, योगा अगदी मेकअपसुद्धा करणे हा साईडईफेक्ट कसा होऊ शकेल?

आशा आहे की मी तुमचं वाक्य चुकीच्या अर्थाने घेत नाहीये.

माझ्या बॉडीला खाज येते.त्यासथी काही घरगुती उपाय असतील तर सान्गा.

बीएमआय म्हणजे काय? बॉडी मास ?
मी मागल्या आठवड्यापासूनच पुन्हा जोर मारायला सुरुवात केली आहे. Happy
किती दिवसात किती जोरान्नी दन्डातली बेडकुळी पुन्हा फुगेल?
छातीच्या भात्याची ताकद वाढवायला उपाय काय?

माझ्या बॉडीला खाज येते.त्यासथी काही घरगुती उपाय असतील तर सान्गा.>>>>>
घरगुती उपाय - हाताशी असेल त्या वस्तुने म्हणजे चमचा, पळी, उलथणे, सुरी, लाटणे झालच तर मुलांची शाळेची पट्टी इइ. ने खाजवणे.

>>>> माझ्या बॉडीला खाज येते.त्यासथी काही घरगुती उपाय असतील तर सान्गा. <<<
आमसुलाचे पाणी लावून बघा, किन्वा कोकमतेल लावुन बघा. उतार पडला तर ठीके, नैतर तत्काळ डॉक्टर/वैद्य गाठा Happy

>>>माझ्या बॉडीला खाज येते.त्यासथी काही घरगुती उपाय असतील तर सान्गा.
एक रामबाण उपाय आहे...
गजकर्ण खाजविता बडा मजा आला....असं मोठमोठ्याने म्हणत खाजवत राहा. Proud

बीएमआय म्हणजे काय? बॉडी मास ?
येत्या आठवड्यापासूनच पुन्हा जोर मारायला सुरुवात करणार आहे. (आधिच्या आठवड्यातला जोर मारण्याचा जोर तिनचार दिवसातच ओसरला Sad )
किती दिवसात किती जोरान्नी दन्डातली बेडकुळी पुन्हा फुगेल?
छातीच्या भात्याची ताकद वाढवायला उपाय काय?

आम्ही body for life - Bill Phillips चे पुस्तक वचुन व्यायाम केला. ४ महिन्यात वजन ८ किलो कमी़ झाले. आता muscles हि toned दिसू लागल्या आहेत.

>>>माझ्या बॉडीला खाज येते.त्यासथी काही घरगुती उपाय असतील तर सान्गा.

ऑलिव्ह ऑईल वापरुन बघा. पन जर लौकर बर वाटल नाही तर सरळ डॉक्टर गाठा...

१) परफेक्ट बॉडी कशी असावी ?
परफेक्ट बॉडीपेक्षा तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. परफेक्ट बॉडी कमवण्यासाठी supplements च्या मागे लागू नका.

२) लूक्स महत्वाचे की बी एम आय ?
लूक्सने तुम्हाला confidence येतो आणि BMI स्वास्थ. तुम्हीच ठरवा तुम्हाला काय जास्त important आहे.

३) आयडीयल बी एम आय किती ?
आयडीयल BMI १८-२५ मधे असायला हवा.

४) परफेक्ट बॉडी कमवायला किती काळ रेग्युलर व्यायाम करावा लागतो ?
चुकिचा प्रश्न...
व्यायाम रेगुलर करत रहा.. परफेक्ट बॉडी आपोआप होईल. पण रोजच्या रोज कमीत कमी ४५ मिनीट weight traning करायला हवी.

५) व्यायामात कंटीन्युटी आणणे हेच मोठ्ठे आव्हान असते ....ते कसे जमवता येईल ?
मनापासुन ईच्छा असली की सगळ काही जमून जात. एकदा सवय लागली की कंटीन्युटी पण येउन जाईल.

स्वानुभव - एक दिवस १२ सूर्य नमस्कार आणि ५-५ जोर वाढवत नेत १०० पर्यंत जोर ( २५ जोर, ३० सेकंद विश्रांती असे ४ सेट) आणि एक दिवस कर्डिओ ( ४-५ मैल पळणे किंवा २०००-३००० दोरीच्या उड्या) असे रुटीन ६ महिने पाळून डिसेंट शरीरयष्टी कमावता येते.

कुठलीही जिम केली नाही. कुठलीही वजने उचलली नाही.

हेतू - मसल डेफिनिशन वाढवणे. मास नाही. कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. कुणालाही बॉडी दाखवायची नाही.

आहार- प्रोटीन्स थोडे वाढवणे, कार्ब्ज थोडे कमी करणे. भरपूर पाणी (९ मोठे ग्लास) आणि भरपूर झोप (८ तास)

तुनळीवर अ ग णि त माहिती आहे आणि चक्क उपयुक्त आहे.