अंडी १) अंडा मसाला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 July, 2010 - 06:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ अंडी (उकडून सोलून त्याला सुरीने चिरा द्याव्यात.)
१ सिमला मिरची बारीक चिरुन
१ मोठा कांदा बारीक चिरुन
१ टोमॅटो चिरुन
थोडा कोबी चिरुन
३-४ मिरच्या लांबट कापुन
१ चमचा मिरची पुड किंवा मसाला
१ चमचा आल लसूण पेस्ट
चवीपुरते मिठ
कढीपत्ता
हिंग, हळद
अर्धा चमचा गरम मसाला
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेलावर मिरची, कढीपत्ता टाकुन फोडणी द्यावी मग कांदा गुलाबी रंगावर शिजवावा. आता टोमॅटो टाकुन थोडा शिजवुन मग हिंग, हळद, आल लसूण पेस्ट, मसाला किंवा मिरची पुड, गरम मसाला,सिमला मिरची, कोबी, घालून थोडे परतवावे. ग्रेव्ही हवी असल्यास अगदी थोडे पाणी घालावे व मिठ घालून थोडे शिजवावे. नंतर अंडी घालुन त्यात चांगली परतवुन एक वाफ आणून गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

अंडी अर्धी करू शकता. पण त्याने मधला बलक मिक्स होतो.

हाच प्रकार चायनिज पण करु शकता चायनिज सॉस घालुन व आले लसूण ची पेस्ट न करता चिरुन फोडणी देउन मग त्यात हिंग, हळद, मसाला घालायची गरज नाही.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, मस्तच रेसिपी गं. मी व्हेजिटेरियन + एजीटेरियन आहे, त्यामुळे ही नक्कीच करून बघेन.

अंड्याला अश्या प्रकारे चिरा द्याव्यात.
a.JPG

हे चिरलेले साहीत्य.
a1.JPG

चिरलेले सर्व टाकुन तयार केलेला मसाला.
a2.JPG

अंडी टाकुन वाफवुन तयार अंडा मसाला.
a3.JPG

मस्तच गं..
तु एकदम झपाटाच लावलाय एकेक रेसिपीजचा.... आता अंड्याचे प्रकार टाक भरपुर. मला खुप आवडतात अंडी..

मी आधी एका कंपनीत कामाला होते तिथे कँटिनमध्ये अंड्याच्या तळलेला एक प्रकार करायचे. उकडलेले अंडे मधुन उभे कापायचे, आतला अर्धा बलक तसाच, त्या कापलेल्या भागावर एक दोन-तिन मिलीमिटर जाड असे मसाला मिश्रण लावायचे आणि मग त्या मिश्रणासकट अंडे कसल्यातरी डिप (बेसन नव्हते, पण पिठाचेच कसलेतरी, मला ओळखता नाही आले तेव्हा, पण बेसन असले की भज्यासारखा एक फिल येतो तो नसायचा) मध्ये बुडवुन तळायचे (की शॅलो फ्राय करायचे?? आता आठवत नाही) असला भन्नाट लागायचा तो प्रकार. मी नेटवर शोधायचा प्रयत्न केला पण एकदम त्यासारखे काही सापडले नाही. तुला माहित असल्यास टाक इथे Happy

मिळाल्या तशा रेसिपीज, एग पकोड्याच्या. पण मला जी हवी होती ती नाही मिळाली.. तो एका बाजुला मसाला लावुन मग तळायची रेसिपी नाही मिळाली कुठेच. आता मीच घरी ट्रायल एरर करुन पाहते... Happy त्याची चव एकदम जालिम होती. काय टाकायचे देवजाणे... Happy

काय टाकायचे देवजाणे... >>>दुसरं एक अंडं फोडून त्यात तो उकडलेल्या अंड्याचा अर्धा भाग बुडवून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करायचा Happy करून बघ मस्त क्रिस्पी लागतं.

आउटडोअर्स, बारिशकर, साधना, भ्रमर, लाजो, डॅफोडिल्स धन्यवाद.
साधना तु घरी रेसिपी केलीस की इथे पण टाक.

अंडा मसाला:

>> मी व्हेजिटेरियन + एजीटेरियन आहे : आऊटडोअर्स ला अनुमोदन माझे.

ओह्हो अगदी मला पाहिजे अशी तिच रेसिपी मिळाली म्हणजे बर्‍याचशा वस्तू होत्याच फ्रीजमध्ये.
काही नव्हत्या नी काही माझ्या अ‍ॅडिशन्स असे करुन केले. अप्रतिम झाले होते! (म्हणजे मी एकट्यानेच खाल्ले Happy पण मला आवडले. कोणाला शंका असेल तर या ईथे. अजून आहे शिल्लक ;))

मला हिरवी मिरची व्यर्ज्य सांगितलेय त्यामुळे ती घातली नाही. लाल तिखट जास्त घातले.
कढिपत्ता वाळवून ठेवलेला आहे तो नुसता चुरुन घातला. एकट्यासाठीच बनवायचे असल्याने २ च अंडी घेतली.
चिरा न पाडता फोडी केल्या. सिमला मिरची केव्हापासुन चिरुन ठेवली होती ३-४ दिवसान्पासुन - पटकन भाजी करता यावी म्हणून. ती आयती मिळाली. आलं लसूण पेस्ट अगदी कमीच लागणार नि मिक्सरमध्ये वाटल जाणार नाही म्हणून त्यात थोडा कांदा सुद्धा घालून पेस्ट केली. ती भाजीत टाकल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा फिरवून भाजीत घातले. त्यामुळे मिक्सरचे भांडे एकदम स्वच्छ आणि थोडी ग्रेव्ही ही मिळाली. माझी अ‍ॅडिशन म्हणजे भाजीत थोडे तीळ घातले. बहुतेक कमी पडले पण छान लागले.
कोबी नसल्याने घातली नाही.

जागू रेसिपीबद्दल धन्यवाद!

डॅफो, हे सही वाटतेय.

किरण, मस्त. मला हे असच आवडत. काय असेल नसेल ते टाकुन पदार्थ बनवायचा कशासाठी थांबायच नाही.
मी ही तिळ टाकुन बघेन. आणि कांद्याच्या पेस्ट्ची आयडीयाही आवडली. त्याने चांगली ग्रेव्ही होईल.

साधना,तू एका बाजूला मसाला लावला होता असे लिहिले आहेस.पूर्वी एका क्लास मधे मी एक पदार्थ शिकले होते,(नाव-Scoch eggs) त्यात उकडलेल्या अंडयाला बाहेरून खिमा-बटाटा मिश्रणाचे कोटिंग करून मैद्याच्या बॅटर मधे बुडवून शेवयांमधे घोळवून तळायचे व मग ते अर्धे करायचे असे होते.त्यात मसाला एकाच बाजूला दिसतो.
जागु,मस्त! फक्त फोटो मला दिसत नाहित.

आताआताच अंडी खायला लागलोय. आज ही रेस्पी आज केली होती. मस्त झाली. सगळ्यांना खूप आवडली. पण मला चित्र दिसत नाहीयेत आणि अंडी कशी बनवतात याची कल्पनाही नव्हती. मी अंडी उकडुन ती होरिझॉट्ली स्लाईस केली. पण काय लागत होती म्हायतीये! Wink

अगं झाल्या झाल्या गरगरम जेवायला घेतलं. फोटो वगैरे काढायचं सुचलच नाही. पुन्हा करीन तेव्हा टाकते नक्की.