न्यूजर्सीमधली खादाडी

Submitted by admin on 20 June, 2009 - 19:00

न्यूजर्सीमधली खादाडी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे कुणीच लिहिलं नाही म्हणून बाराबाफ वरचे इथे कॉपी करून टाकते!
एडिसन :
सौदिन्डियन मधे सर्वणा ला पर्याय नाही! देसी चायनीज खायचे असेल तर मिंग मस्त आहे, गुड आंबियन्स, ग्रेट फूड!! स्नॅक्स हवे तर हॉट ब्रेड्स, मिठास आहे. एका छताखाली अनेक पर्याय असे हवे तर गॅलॅक्सी - तिथे साउथ इंदियन, पंजाबी, बाँबे चाट/ पावभाजी असं सगळं मिळतं. पण गर्दी फार असते तिथे. बसायला जागा मिळणे अवघड.बफे हवा असेल तर रसोई, मुघल. गुज्जु थाळी आवड्त असेल तर झुपडी. हो अन रूट १ ने पुढे जाणार असेल तर एडिसन मधे नाही पण साउथ ब्रुन्स्विक मधे रूट १ साउथ वर चटनी मनॉर आहे त्यांचा पण बफे चांगला असतो.

मी स्पोक्सपर्सन आहे "बाँबे चाट" चा. ओकट्री च्या सबजी मंडी, राजभोग समोरच आहे. छोले भटूरे नक्की खा!!

खासियत , मुघल(दुपारी बफे छान), मोक्ष(सो, सो- मला नाही आवडलं पण अँम्बियन्स चांगलाय). गुजराती हवं असेल तर सुखाडीया, झुपडी वगैरेही आहेतच.

भाऊ लोक New York ची खादाडी टाकायाची का?

'हलवा' मिळत असलेली दुकाने (माझ्या माहीतीतली)

Asian Food Center 1723 State Route 27, Edison, NJ 08817 (732) 819-8139

Kam Man Food Inc 511 Old Post Rd, Edison, NJ 08817 (732) 248-9611

Great Wall Supermarket 3151 Rt 27, Franklin Park, NJ 08823 (732) 940-0685

Asian Food Center of Princeton 660 Plainsboro Rd, Plainsboro, NJ 08536 (609) 799-1828

फक्त फोन करून विचारण्याचा प्रयत्न करू नये.. Lol

वा!! ही चांगली सोय झाली!!

वरील दुकानांत पापलेट (Pampino), हलवा (Black Pampino) , सुरमई (Spanish Macaral) हे पण मिळते (इती विनय)

चिन्यांच्या दुकानात , Asian Grocery कुठेही जवळपास असेल तर त्यांच्या Fish Section मध्ये गेल्यास मिळेल..
------------------------------------------
तु कहां ये बता, इस नशिली रात में

हॉट ब्रेड्स मधे दाबेली खाल्ली. इतकी खास नाहीये. तिथल्या पेस्ट्रीज आवडल्या. कॅरमल केक पण चविष्ठ.
जर्सी सिटीत आहे ब्वॉ कुठेतरी Happy

जर्सी सिटीत त्या देसी रस्त्यावर आहे ' हॉट ब्रेडस' ते नाही का सिंडे?

हो तेच ते, राजभोगपासून जवळच आहे ना ? त्या रस्त्यावर मला ह्यावेळी चक्क २-३ गोरे दिसले Proud

पूर्वी खासियत मधे भरपूर प्रकारचे वेगवगळे चित्र-विचित्र डोसे मिळायचे, २००० च्या आसपास. आता ते दुकान आहे कि नाहि तेहि माहित नाहि. पण एकदम वैशाली types वाटयचे तेंव्हा तिथे .... Happy

खासियत म्हणजे ओक ट्री वालं ना?

खासियत आहे रे. आम्ही बीएमएमवरून येताना तिथेच थांबलो होतो. पण वैशाली टाईप..? अरे केवढसं आहे ते खासियत! Happy

सिन्डे , हेच काते शिंचं हॉट ब्रेड?
hot_breads.jpg

आणि राजभोगही...

rajbhog.jpg

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

रसोई वाला चितळ्यांसारखं दुपारचं झोपायला गेला असेल... Happy

हा रस्ता अगदी एम जी रोडच्या शेवटी शेवटी पूलगेटावर सोलापूर् बाजार जसा दिसतो तसाच आहे...
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

<<हा रस्ता अगदी एम जी रोडच्या शेवटी शेवटी पूलगेटावर सोलापूर् बाजार जसा दिसतो तसाच आहे...>>

नाही, नाही. पूर्वी तो चांगला स्वच्छ, चकचकीत, असा होता. पण अनेक वर्षे भारतीय लोकांनी तिथे राहून, ओक ट्री ला सोलापूर बाजार बनवला. रस्त्यावर कचरा केल्यास इथे शंभर डॉ. दंड असतो, पण त्या भागात दोनशे डॉ. दंड ठेवला तेंव्हा कुठे जरा सुधारला. तरी अजून तो सोलापूर बाजार, किंवा हिंजेवडीचा मेन रोडच वाटतो. आम्ही कधीच तिकडे जात नाही.

<<रसोई वाला चितळ्यांसारखं दुपारचं झोपायला गेला असेल... >>

आता कोण कुठे केंव्हा कसा कुणाबरोबर झोपायला गेला या चांभारचौकश्या तिथे बसून तुम्ही कशाला करताहात? काही आहे का देणेघेणे तुम्हाला? का सध्या पुण्यात आहात?

Happy Light 1

Hot Bread च्या बर्‍याच शाखा आहेत. आमच्या शेजारी पण एक आहे..

विनय

विनय त्यांची वेबसाईट आहे का? आमच्या गावात पण एक शाखा उघडणार आहेत असं बरेच दिवसांपासून ऐकत आहे.

हुडा, ज्याचे फोटो टाकलेस वरती, तो जर्नल स्क्वेअर म्हणून रस्ता अतिशय गलिच्छ आहे. करी रोड टाईप एरियात आल्यासारखं वाटतं.

सोलापूर बाजार न्यू जर्सी. Proud
so_bazar.jpg

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

पार्ल्यात वाचलं. माझ्या लक्षात रहाव म्हणुन इथेच सेव्ह केलं. Happy
स्वाती आंबोळे:
बुवा, 'मिठास'मधली शाही कुल्फी खा पुढच्या वेळी. आणि त्याआधी तिथलीच राज कचोरी. आणि मूड असेल तर शेजारी 'मुघल'मधून मछली काली मिर्च आणि लॅम्ब कबाब. स्मित

वैद्यबुवा:
मी "जस्सी स्वीट्स" मधुन कधी कधी कुल्फी आणतो. साध्याच असतात पण घरगुती बनवल्या सारख्या लागतात. तिथे एक वयस्क सरदारजी आहेत ते उसाचा रस आणि कुल्फ्या ह्या दोन गोष्टीच विकतात.

गेल्या आठवड्यात Raaz - Specialty Indian Cuisine न्यु पोर्टमध्ये जेवलो. तिथे धाबा चिकन फार मस्त होतं म्हणे. नवर्‍याने नुसतं चिकन घेऊन चापलं.

पार्सिपेनी मधे घरगुती जेवणाचा डबा पुरवणारी एखादी सर्वीस माहीत असल्यास कुणाला सांगता येईल का? जवळपास ५-६ महिन्यांसाठी गरज आहे. धन्यवाद !!

प्रॅडी, हसूबेन पटेल ( 973-402-7470) ह्या नं. वर चौकशी कर. पार्सिपेनीत रहाणारी गुज्जू बाई आहे. डबा पुरवते की नाही कल्पना नाही पण उंधियो, पोळ्या वगैरे करुन देते.

धन्यवाद सायो, स्वाती. सुलेखावर पण पाहाते आहे. कुणाला अनुभव असल्यास आणी खात्रीशीर चव असल्यास विचारावं म्हणून ईथे पण पोस्ट केलं.

प्रज्ञा, वर उल्लेख केलेल्या बाईचा उंधियो मस्त असतो चवीला. मी केला आहे ऑर्डर, पोळ्यांचं माहित नाही पण माझ्या इथल्या बर्‍याच जणी घ्यायच्या तिच्याकडून पोळ्या.

प्रॅडी, मला वाटतं या राजभोगवाल्यांची डबा सर्विस आहे. तसंच दोसा हाऊसवालेही दाक्षिणात्य लंच पुरवतात असं आठवतंय.
(ही दुकाने आहेत - टेक्निकली 'घरगुती' नव्हे, पण चव घरगुती असते दोन्हीकडे.)

गल्ली चुकून इथे आलो.
नात्या, तुम्ही असे अगदी डोळ्यात तेल घालून कुठे कुणाचे चुकले बघायला बसले असाल असे वाटले नव्हते.
तुम्ही मुंबईत रहा, म्हणजे पुनः कसाबसारखे लोक येणार नाहीत!
Light 1

गल्ली चुकलं का हो झक्की? Happy इथे खाण्याबद्दल लिहा..

हा बाफ माहीत नव्हता. आता लिहीतो..

विंडसर भागातील लोक... डोसाई प्लेसचा बफे एकदम मस्त आहे.. १३० वर आहे. नक्की ट्राय करा.

सर्वाणा भवनात गेलो होतो विंडसरातील. चमचा चमचा जेवण दिलं पण बिल मात्र भरभक्कम लावलं. Happy

Pages